Friday, November 22, 2024
Home ताज्या रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने येत्या गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी डॉ.प्रकाश...

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने येत्या गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी डॉ.प्रकाश आमटे डॉ.मंदाकिनी आमटे यांच्याशी”संवाद दिलखुलास गप्पा”कार्यक्रमाचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने येत्या गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी डॉ.प्रकाश आमटे डॉ.मंदाकिनी आमटे यांच्याशी”संवाद दिलखुलास गप्पा”कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने येत्या गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी संवाद दिलखुलास गप्पा हा संस्मरणीय अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राजारामपुरी येथील व्ही. टी .पाटील सभागृह येथे सायंकाळी ५.१५ वाजता होत आहे अशी माहिती प्रेसिडेंट रो.कल्पना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.रोटरी क्लब ने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत अनेक वेगवेगळे विधायक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून येत्या २५ जानेवारी २०२४ रोजी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविलेल्या डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या सोबत *संवाद दिलखुलास गप्पा* हा संस्मरणीय ठरेल असा कार्यक्रम आयोजित केला आहे.हा कार्यक्रम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नासिर बोरदसवाला यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच पंधरा वाजता संपन्न होत आहे.

डॉ.प्रकाश आमटे यांच्याविषयी 

प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते याठिकाणी उपचार करतात.
प्रकाशवाटा (२०१३ सालापर्यंत २५ आवृत्त्या)
रानमित्र (२०१३) ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.तर
१९८४ – आदिवासी सेवक पुरस्कार, महाराष्ट्र सरकार,
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ’डॉ. एम.जे. जोशी आय.एम.ए.भूषण’ पुरस्कार
२००९ – गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार,
२००२ – पद्मश्री पुरस्कार, भारत सरकार,
२००८ – मॅगसेसे पुरस्कार
२०१४ – मदर तेरेसा पुरस्कार
श्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार
२०१२ – लोकमान्य टिळक पुरस्कार
पिंपरी (पुणे) येथील संस्कार प्रतिष्टानतफे श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार (२०१७)
आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा सन्मान समारंभ (१२ डिसेंबर २०१८) करण्यात आला आहे. डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांचे कार्य खूपच मोठे आहे.त्यांच्या या कार्याची माहिती होण्यासाठीच हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी पत्रकार परिषदेला सुजाता लोहिया, मेघना शेळके, रेणुका सप्रे, वृंदन घाटगे,बिना जनवाडकर,साधना घाटगे,अंजली मोहिते, सुरेखा इंग्रोले, सविता पेढ्ये ,दीपिका कुंभोजकर, रेश्मा शहा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments