Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे – किरीट सोमय्या

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप कोल्हापूर/प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे – किरीट सोमय्या

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे – किरीट सोमय्या कोल्हापूर/प्रतिनिधी :…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरावृक्षारोपण, सहकार विषयावरील व्याख्यानातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरावृक्षारोपण, सहकार विषयावरील व्याख्यानातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन   कोल्हापूर, ता. ६/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी: डॉ. आर. के. शर्मा

१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी: डॉ. आर. के. शर्मा -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनार उत्साहात डॉ.…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :  संजय घोडावत विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस’ मधील विद्यार्थी पराग भोपाळे…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद या पुस्तकाची सौ. अरूंधती महाडिक यांच्याकडून निर्मिती

फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद या पुस्तकाची सौ. अरूंधती महाडिक यांच्याकडून निर्मिती, शाही पाककलांच्या माहितीसह इतिहासाला…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार

थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर येथे अनुसूचित जाती व जमाती (अ.प्र.) कायद्याच्या प्रभावी अंमलबाजावणी आणि जनजागृतीच्या अनुषंगाने नागरीक कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर येथे अनुसूचित जाती व जमाती (अ.प्र.) कायद्याच्या प्रभावी अंमलबाजावणी आणि जनजागृतीच्या अनुषंगाने नागरीक कार्यशाळा संपन्न कोल्हापूर /प्रतिनिधी : नागरी…

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले .
यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी –

लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली.
माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली.
ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे.
गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे.
परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना.
गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले.हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.
या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले .
यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी –

लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली.
माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली.
ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे.
गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे.
परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना.
गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले.हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.
या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूर यांच्या वतीने आज आदर्श विद्या मंदिर, नागदेववाडी येथे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.
शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अनेक गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमास हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरचे सेंट्रल ओनर शुभम तुपे यांच्यासह हॅप्पी मेडिकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत अशा सामाजिक उपक्रमांमध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केले.
हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर हे आरोग्य सेवेसोबतच सामाजिक उत्तरदायित्व जपत शिक्षण, आरोग्य आणि समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत असून, भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, हॅप्पी मेडिकर परिवारातील सदस्य, शिक्षकवृंद आणि उपस्थितांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे – किरीट सोमय्या

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे – किरीट सोमय्या

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रनायक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. मुखर्जी यांच्या जीवनचरित्रावरील विशेष प्रदर्शनीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते मा. किरीट सोमय्या, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर, पृथ्वीराज पाटील, राहुल चिकोडे, अमर साठे, विराज चिखलीकर, सुशीला पाटील, डॉ. आनंद गुरव, रमा पाठक, माधुरी नकाते, विश्वजित पवार, रवीश पाटील यांच्यासह भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना मा. किरीट सोमय्या म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच काश्मीरच्या संपूर्ण एकात्मतेचा विचार देशभर जिवंत राहिला. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात “जहाँ हुए मुखर्जी बलिदान, वो कश्मीर हमारा है” हा घोष सातत्याने दिला जात होता. कलम ३७० हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डॉ. मुखर्जी यांच्या बलिदानाला न्याय दिला. आज जम्मू-काश्मीर विकासाच्या नव्या वाटेवर असून येत्या काळात प्रत्येक काश्मीरी अभिमानाने “हम हिंदुस्तानी हैं” असे म्हणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची स्थापना भारतीय संस्कृती, हिंदुत्व आणि राष्ट्रीय स्वाभिमान या विचारांवर झाली आहे. वंदे मातरम्‌ला पुन्हा योग्य सन्मान मिळवून देण्यापासून ते राष्ट्रहिताच्या विविध निर्णयांपर्यंत भाजपाने सातत्याने राष्ट्र प्रथम ही भूमिका घेतली आहे. देशाच्या पुनर्निर्माणासाठी आणि विकसित भारताच्या संकल्पनेसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पित भावनेने कार्य करणे आवश्यक आहे.
मतदार यादी विशेष पुनरावलोकन (SIR) मोहिमेबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, मतदार यादी शुद्ध, पारदर्शक आणि अचूक ठेवणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. प्रत्येक पात्र भारतीय नागरिकाचे नाव मतदार यादीत असावे आणि प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन मतदार पडताळणीचे काम जबाबदारीने पूर्ण करावे. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून कार्यकर्त्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा, राष्ट्रनिष्ठा आणि अखंड भारताच्या ध्येयासाठी समर्पित होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, पश्चिम बंगाल भारतात कायम राहण्यासाठी त्यांनी बजावलेली भूमिका, निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी केलेले प्रयत्न, तसेच केंद्रीय मंत्री म्हणून देशाच्या पहिल्या औद्योगिक धोरणातील त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी आहे. “एक देशात दोन विधान, दोन प्रधान आणि दोन निशाण चालणार नाही” या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले, असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी विराज चिखलीकर, राहुल चिकोडे, हेमंत आराध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर साठे यांनी केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनचरित्रावरील विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनीत त्यांच्या बालपणापासून शिक्षण, सार्वजनिक जीवन, राष्ट्रहितासाठी केलेले संघर्ष, भारतीय जनसंघाची स्थापना, अखंड भारतासाठीचे योगदान आणि सर्वोच्च बलिदान यांचा छायाचित्रे व माहितीच्या माध्यमातून सविस्तर आढावा मांडण्यात आला.याप्रसंगी भाजपा लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरावृक्षारोपण, सहकार विषयावरील व्याख्यानातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरावृक्षारोपण, सहकार विषयावरील व्याख्यानातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

कोल्हापूर, ता. ६/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित सहकार सप्ताह तसेच दि.०४ जुलै रोजीचा आंतरराष्ट्रीय सहकार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या “सहकारातून समृद्धी” या संकल्पनेला अनुसरून पर्यावरण संवर्धन, सहकाराची मूल्ये, कर्मचारी विकास आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यात आले.
सहकार सप्ताहानिमित्त गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या प्रांगणात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे व सागर बलकवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तसेच गोकुळचे प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव, गोगवे, बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी या शीतकरण केंद्र व सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी तसेच कागल येथील प्रकल्प परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी प्रशासक सागर बलकवडे म्हणाले, “सहकार ही केवळ संस्था चालविण्याची संकल्पना नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. सहकार सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेले उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सहकाराची मूल्ये अधिक मजबूत करण्यास मदत करतील. भविष्यातही गोकुळच्या माध्यमातून असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”सहकार सप्ताहानिमित्त संघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.डॉ.अनिल कारंजकर यांचे “सहकार व्यवस्थापन व त्यापुढील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. बदलत्या काळात सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने, प्रभावी व्यवस्थापन, संस्थेची कार्यपद्धती आणि कर्मचारी यांची भूमिका याविषयी त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. तसेच संस्था, सहकार आणि कर्मचारी यांच्यातील विश्वास व समन्वय अधिक मजबूत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षारोपण, मार्गदर्शनपर व्याख्यान या उपक्रमांच्या माध्यमातून सहकाराची मूल्ये अधिक बळकट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.
यावेळी संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे प्रा.डॉ.अनिल कारंजकर, आनंद यादव, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, संघाचे अधिकारी हिमांशू कापडिया, बाजीराव राणे, डॉ.दयावर्धन कामत, सुधाकर पाटील, डॉ. विजय मगरे, उदय पाटील, भरत मोळे, प्रताप पाटील, अमोल गडकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी: डॉ. आर. के. शर्मा

१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी: डॉ. आर. के. शर्मा

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनार उत्साहात

डॉ. अजित पाटील यांनी दिली विविध करिअर संधींची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : १२ वी विज्ञान (PCB) नंतर केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे, हेल्थकेअर, अलाईड हेल्थ सायन्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमध्ये करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आरोग्य क्षेत्र हे भविष्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र असून मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी १२ वी PCB नंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींचा सविस्तर माहिती दिली.
कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये रविवारी झालेल्या “१२ वी PCB नंतरच्या करिअर संधी” या विषयावरील सेमिनाराला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी व पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सेमिनारचा शुभारंभ करण्यात आला.डॉ. शर्मा म्हणाले, आरोग्य क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. विद्यार्थांनी आवड, क्षमता व संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडावे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक सुविधा, संशोधनाच्या संधी आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, योग्य करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होऊन आत्मविश्वासाने भविष्याचा निर्णय घेण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांना योग्य दिशा मिळेल.                      प्रमुख मार्गदर्शक डॉ. अजित पाटील यांनी फार्मसी, फिजिओथेरपी, नर्सिंग, हॉस्पिटॅलिटी, संशोधन क्षेत्र, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट तसेच देश-विदेशातील उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पर्यायांवर अवलंबून न राहता बदलत्या काळातील नव्या करिअर क्षेत्रांचा अभ्यास करून योग्य दिशा निवडावी, असे आवाहन केले.आरोग्य क्षेत्र हे सर्वात मोठा सन्मान देणारे आणि सर्वाधिक संधी असलेले क्षेत्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधन या माध्यमातून डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून उत्तम करिअर घडविण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यापीठातील योग्य अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, क्लिनिकल प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली.                                                          यावेळी फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अमृत कुंवर रायजादे, नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य प्रा. मनिषा बिजापूरकर, फार्मसी कॉलेजचे डॉ. अभिनंदन पाटील, स्कूल ऑफ हॉस्पीटलीटीचे प्राचार्य रुधिर बारदेसकर, स्कूल ऑफ इंजिनिआरिंग अँड मॅनेजमेंटचे विभागप्रमुख प्रा. अभिजित मटकर, सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरीचे अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे यांनी विद्यापीठात उपलब्ध अभ्यासक्रम, सुविधा, करिअर संधी याबाबत मार्गदर्शन केले.सेमिनारनंतर विद्यार्थी व पालकांनी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि कॅम्पसमधील विविध विभागांना भेट दिली.अत्याधुनिक सिम्युलेशन लॅब, आधुनिक प्रयोगशाळा, अध्यापन सुविधा आणि रुग्णसेवेची कार्यपद्धती जवळून पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधत प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधींबाबतच्या शंकांचे निरसन करून घेतले.                                                               प्रा. सुरज यादव व प्रा मैथिली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजित पाटील यांनी आभार मानले.यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, स्कूल ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव, नर्सिंग प्राचार्य डॉ. उमाराणी जे., उपकुल सचिव संजय जाधव, जयदीप पाटील, यांच्यासहविद्यार्थी, पालक, विविध विभागांचे अधिकारी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

अतिग्रे/प्रतिनिधी :  संजय घोडावत विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस’ मधील विद्यार्थी पराग भोपाळे याला लक्झेंबर्गमधील नामांकित ‘फार्मासी हॅमिलुअस’ येथे नोकरीची संधी मिळाली आहे. त्याला वार्षिक ३८.४३ लाख रुपयाचे पॅकेज प्राप्त झाले आहे.फार्मसी विभागातील आतापर्यंतचे हे सर्वोच्च पॅकेज आहे.                                                                 या यशावर भाष्य करताना विद्यापीठ प्रशासनाने नमूद केले की, हा टप्पा म्हणजे विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उद्योगधंद्यांना आवश्यक असणारे व्यवहारिक शिक्षण, त्यानुसार रोजगाराभिमुख कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यावर भर,प्लेसमेंट विभागाचे विविध उपक्रम, त्याद्वारे जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, टीपीओ संचालक डॉ. नितीन पुजारी आणि प्राध्यापक वर्गाने परागचे अभिनंदन केले आहे.

फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद या पुस्तकाची सौ. अरूंधती महाडिक यांच्याकडून निर्मिती

फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद या पुस्तकाची सौ. अरूंधती महाडिक यांच्याकडून निर्मिती, शाही पाककलांच्या माहितीसह इतिहासाला उजाळा

कोल्हापूर/प्रतिनिधी : भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून, मराठी पुस्तक विश्वात नवी भर पडली आहे. सौ. महाडिक यांचे माहेर असलेल्या फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद… या नावाचे एक सुंदर आणि माहितीपूर्ण पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात सौ अरुंधती महाडिक यांच्या घरातील एकत्र कुटुंब पद्धती, शिस्त – संस्कृती- माणुसकी आणि एकोपा यांची शिकवण तर आहेच. शिवाय त्याचवेळी नाईक निंबाळकर घराण्यातील ऐतिहासिक आणि खानदानी पाककलांना उजाळा मिळाला आहे. नाईक निंबाळकर घराण्यातील शाही पाककलेची सविस्तर माहिती देऊन, विविध शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ कसे बनवले जातात, याबद्दल तपशीलवार साहित्य आणि कृतीसह या पुस्तकात लिखाण केले आहे. त्यामुळे अस्सल दर्दी खवय्ये आणि पाककला प्रेमींना हे पुस्तक नक्कीच आवडेल. सौ. अरुंधती महाडिक यांचे वडील हैबतराव नाईक-निंबाळकर आणि आई सौ. विजयश्री नाईक-निंबाळकर यांच्यासह, संपूर्ण नाईक-निंबाळकर परिवार, त्यावेळची जीवन पद्धती, वाठार मधील त्यांचे भव्य वाडे, नाईक-निंबाळकर घराण्यातील कर्तुत्ववान पुरुष आणि अभिमानास्पद घटना, तत्कालीन मराठा साम्राज्यामध्ये वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्याचे आणि परिवाराचे योगदान, अशा अनेक विषयांची या पुस्तकात खुमासदार मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे केवळ ऐतिहासिक दस्तावेज न राहता, इतिहासकालीन सत्यतेची मांडणी करत वाचकांना गुंग करते. सौ. अरुंधती महाडिक यांच्या मातोश्री सौ. विजयश्री नाईक-निंबाळकर यांच्यासह, त्यांच्या घराण्यातील काकी, आजी, बहिणी, भावजय आणि नव्या पिढीतील सुनां आणि नातवंडांपर्यंतचा वंशवेल आणि नाईक-निंबाळकर घराण्याची पिढ्यान पिढ्यांची पारंपारिक खाद्य संस्कृती, या पुस्तकातून उलगडली आहे. फलटण वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील १६ व्या शतकापासूनच्या अनेक पिढ्यांनी पारंपारिक महाराष्ट्रीय जेवणाचा थाट आणि संस्कृती जपली आहे. काळाच्या ओघात अनेक पदार्थ लुप्त पावत आहेत. अशावेळी या पुस्तकामुळे, चवीचा हा अनमोल ठेवा नव्या पिढीतील अन्नपूर्णा गृहिणींना समजणार आहे. सौ. अरुंधती महाडिक जेव्हा माहेरी जायच्या, त्यावेळी त्यांच्या आई आणि कुटुंबातील अन्य महिलांशी स्वयंपाकाबद्दल चर्चा व्हायची. अत्यंत स्वादिष्ट आणि शाही पदार्थ घरी कसे बनवले जातात, त्यात कोणते घटक असतात, याबद्दल गप्पागोष्टी व्हायच्या. पाककलेचा हा इतिहास आणि वैशिष्ट्यं जतन व्हावीत, नव्या पिढीला हे चविष्ट पदार्थ बनवण्याची माहिती आणि प्रेरणा मिळावी, यासाठी हे रेसिपी बुक बनवण्याची सुरुवातीची भावना होती. त्यासाठी सौ. अरुंधती महाडिक यांनी आपल्या माहेरच्या परिवारातील सर्व ज्येष्ठ महिलांची संपर्क साधून, पाठपुरावा करून, प्रत्येक पाककृतीची माहिती संकलित केली आणि हे सर्व शाही आणि तृप्त करणार्या पदार्थांचे उत्तम छायाचित्रांसह रेसिपी सांगणारे पुस्तक आकारास आले.
असे म्हणतात, की नात्यांचा आणि स्नेहाचा मार्ग पोटातून जातो. उत्तम खाद्यपदार्थ बनवणे, ही सर्वोत्तम कला आहे. अशावेळी सौ. अरुंधती महाडिक यांनी पुढाकार घेऊन, वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्याची पाककलेची परंपरा, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, स्वयंपाकातील बारकावे आणि त्याचवेळी नाईक-निंबाळकर घराण्याचा संपूर्ण इतिहास एका जबाबदारीच्या भावनेतून पुस्तक रुपात आणला आहे. या पुस्तकासाठी इतिहास लेखन, कोल्हापूरचे सुपुत्र आणि शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम तथा राजू राऊत यांनी केले आहे. तर इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनीही वाठारकर नाईक-निंबाळकर घराण्याचे इतिहासातील महत्त्व आणि वाठार गावाचे भौगोलिक स्थान महात्म्य, याबद्दल लेखन केले आहे. तर राज्यसभेचे खासदार श्री धनंजय महाडिक यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. कोल्हापुरातील सुचित्र ऍडवर्टाइजिंगचे विशाल कुमठेकर यांनी या पुस्तकाची रचना, सजावट आणि छायाचित्रणाची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली. तर अक्षरदालनचे श्री. अमेय जोशी यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या चित्रमय रेसिपी पाहिल्यानंतर, दर्दी खवय्याला आणि सुगरण गृहिणीला नक्कीच एक खजिना मिळाल्याचा आनंद होईल. हे पुस्तक कोल्हापुरातील मंगळवार पेठ मधील अक्षरदालनमध्ये मो. ७७९६६४६४२३ आणि छत्रपती ताराराणी चौकानजीकच्या भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयामध्ये ९६७३८१९२९२ विक्रीसाठी उपलब्ध आहे, असेही यावेळी सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शाहीर राजू राऊत, विशाल कुमठेकर, अमेय जोशी उपस्थित होते.

कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार

थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील कोपार्डे गावचा गुणी पैलवान आणि सेना केसरी पैलवान गौरव पाटील हा कोपार्र्डेच्या कुस्ती संकुल केंद्रात सराव करतो. गौरव पाटील यानं थायलंडमध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना ७५ किलो वजन गटात ग्रीको रोमन प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. कोपार्डे गावच्या मातीत घाम गाळून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिणार्‍या पैलवान गौरवचे कुस्तीप्रेमींसह विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पैलवान गौरवचा आज सत्कार करण्यात आला आणि जागतिक पातळीवरील कुस्त्यांसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. मेहनत, चिकाटी आणि अखंड देशप्रेमाच्या जोरावर मिळवलेलं गौरवचं यश केवळ कोपार्डे गावाचीच नाही, तर संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचवणारं आहे. गौरवनं आणखी यश संपादन करावं, यासाठी महाडिक परिवार त्याच्या पाठीशी असेल, असे उद्गार खासदार महाडिक यांनी काढले. यावेळी पैलवान गुंडाजी पाटील, मारुती ऊर्फ बट्टू जाधव, बाबा शिरगांवकर, प्रा. सिकंदर कांबळे, अथर्व पाटील, समर्थ शिरगांवकर, राजू सूर्यवंशी, सर्वेश कांबळे, समर वाडेकर, शंतनू खोमडे, आर्यन मांडवे उपस्थित होते.

कोल्हापूर येथे अनुसूचित जाती व जमाती (अ.प्र.) कायद्याच्या प्रभावी अंमलबाजावणी आणि जनजागृतीच्या अनुषंगाने नागरीक कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर येथे अनुसूचित जाती व जमाती (अ.प्र.) कायद्याच्या प्रभावी अंमलबाजावणी आणि जनजागृतीच्या अनुषंगाने नागरीक कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर /प्रतिनिधी : नागरी हक्क संरक्षण विभाग, म.रा. मुंबई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने “अनुसुचित जाती व जमाती (अप्र) अधि. १९८९, सुधारीत अधि. २०१५ या कायद्याच्या प्रभावी अंमलबाजावणी, जनजागृतीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयामधील नागरीकांच्या करिता दि.०२/०७/२०२६ रोजी नागरीक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
आज २ जुलै रोजी सकाळी ०९.३० ते ०५.३० या वेळेत छत्रपती ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर या विभागाच्या वतीने दुस-या एक दिवसीय नागरीक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, सदर कार्यशाळा ही श्रीमती अश्वती दोर्जे, मा.अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती, या नागरीक कार्यशाळेसाठी अॅड. श्री गणेश शिरसाट, सदस्य बार कौन्सील, महाराष्ट्र व गोवा राज्य हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, अॅड. श्री गणेश शिरसाट, यांनी प्रशिक्षणार्थी नागरीक यांना अनुसूचित जाती व जमाती (अ.प्र.) कायद्याची व अनुषांगिक कायद्याच्या प्रभावी अंमलबाजावणी, जनजागृतीच्या अनुषंगाने मौलीक मार्गदर्शन केले, तसेच श्रीमती ज्योती क्षीरसागर, पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी स्वागत आणि प्रस्तावना करुन, कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी नागरीक यांना “कायद्यातील तरतुदीनुसार पिडीतांना केले जाणारे अर्थ सहाय्य व संरक्षण याबाबत माहिती देउन, “सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे स्वातंत्र आणि हाताने मैला साफ करण्यापासून प्रतिबंध” या कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळया पोलीस पाटील २२, महिला बचत गट सदस्या ४०, विद्याथी ३३ व इत्यादी प्रशिक्षणार्थी नागरीक म्हणून उपस्थित होते. उपस्थितांना (१) श्री. सचिन साळे, सहा. अयुक्त समाजकल्याण विभाग, कोल्हापूर (२) श्री. निहाल निजामुदीन अत्तार, संचालक व व्यवसस्थापक, बिजनेस सस्केस मंत्रा, कोल्हापूर, (३) अॅड. श्री. सिध्दार्थ राजेंद्र कांबळे, विधी अधिकारी गट अ, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालय, (४) डॉ. श्री. मनोहर दादु कोळी, सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक, कोल्हापूर, असे विधी तज्ञ व अनुभवी, तसेच शासकीय सेवेतील वक्ते या कार्यशाळेस लाभले.
कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक वक्ते यांचे मार्गदर्शनानंतर प्रशिक्षणार्थी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले, त्यामुळे “अनुसुचित जाती व जमाती (अप्र) अधि. १९८९, सुधारीत अधि. २०१५ या कायाद्याच्या प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती व गुणवत्तापूर्ण तपासाबाबतचा” मुख्य हेतु साध्य झाल्याचे व गुणवत्तापूर्ण तपासामुळे दोषसिध्दी प्रमाणामध्ये वाढ होण्यासाठी अशा कार्यशाळांची मदतच होईल असे प्रशिक्षणार्थीनी मत व्यक्त केले आहे.