Friday, October 24, 2025
spot_img
Home Blog Page 5

जी पी ए, निमा व निहा या असोसिएशनतर्फे संयुक्तपणे ७९ वा स्वातंत्र्य दिन निमा हॉल येथे साजरा

0

जी पी ए, निमा व निहा या असोसिएशनतर्फे संयुक्तपणे ७९ वा स्वातंत्र्य दिन निमा हॉल येथे साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : ध्वजारोहण सोहळा डॉ सुस्मिता गाडगीळ माजी नगरसेवक काकासाहेब पाटील, जीपीए अध्यक्ष डॉ. वर्षा पाटील, निमा कोल्हापूर अध्यक्ष डॉ. मुकुंद मोकाशी, निहा उपाध्यक्ष डॉ. सचिन भादवणकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी जीपीए, निमा, निहा या संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम जीपीए अध्यक्ष डॉ वर्षा पाटील यांच्या हस्ते पार पडला.
डॉ सुस्मिता गाडगीळ मॅडम यांचा त्यांना शोधन लेप गोळी याला भारतीय सरकारचे पेटंट मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार जी पी ए अध्यक्ष डॉ वर्षा पाटील मॅडम , निमा अध्यक्ष डॉ मुकुंद मोकाशी सर व निहा उपाध्यक्ष डॉ सचिन भादवणकर सर यांच्यातर्फे करण्यात आला. त्यानंतर देशभक्तीपर गाण्याचा प्रोग्रॅम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजेश सोनवणे यांनी केले व सर्व सभासदांचे आभार डॉ दीपक पवार व डॉ राजेश कुंभोजकर यांनी मानले.
या स्वातंत्र्यदिनानिमित्त जीपीए, निमा व निहा या असोसिएशनचा एक अनोखा संगम पहावयास मिळाला.

अँथे २०२५ ची आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम घोषणा;इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹२५० कोटींपर्यंत शिष्यवृत्ती

0

उद्याच्या समस्यांचं समाधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अँथे २०२५ ची आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम घोषणा;इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹२५० कोटींपर्यंत शिष्यवृत्ती

कोल्हापूर/प्रतिनिधी : मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) या देशातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेटरी संस्थेने आपल्या प्रतिष्ठित उपक्रमाची – अँथे २०२५ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम) – घोषणा केली आहे. भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रतीक्षित वार्षिक परीक्षा असलेल्या अँथे २०२५ चा उद्देश इयत्ता ५वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्यास आणि खर्‍या अर्थाने प्रॉब्लेम सॉल्व्हर्स होण्यासाठी सक्षम करणे हा आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अँथे २०२५ द्वारे विद्यार्थ्यांना ₹२५० कोटींपर्यंतचे १००% स्कॉलरशिप्स आणि ₹२.५ कोटींच्या रोख पारितोषिकांची संधी दिली जात आहे. ही संधी क्लासरूम, आकाश डिजिटल आणि इन्विक्टस कोर्सेससाठी उपलब्ध आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना NEET, JEE, राज्य CETs, NTSE आणि ऑलिंपियाड्ससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आकाशच्या अनुभवी मार्गदर्शकांकडून दर्जेदार मार्गदर्शन घेण्याचा मार्ग खुला होतो.
या वचनबद्धतेला पुढे नेत, ‘आकाश’ आता इन्व्हिक्टस एस टेस्ट नावाची एक शिष्यवृत्ती परीक्षा देखील सुरू करत आहे. ही परीक्षा ८ वी ते १२ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश इन्व्हिक्टस JEE Advanced तयारी कार्यक्रमात प्रवेश देण्यासाठी आयोजित केली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता व शिष्यवृत्ती परीक्षा २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाणार आहे. तीन तासांची ही परीक्षा (सकाळी १० ते दुपारी १) ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असेल.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ आणि एमडी  श्री. दीपक मेहरोत्रा यांनी सांगितलं की, “अँथे हा आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचं प्रतीक बनला आहे. मागील १६ वर्षांपासून आम्ही हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा यासाठी मदत करत आलो आहोत.या वर्षापासून आम्ही ‘इन्व्हिक्टस एस टेस्ट’ देखील सुरू करत आहोत, जो स्कॉलरशिप आणि आकाश इन्व्हिक्टस कोर्समध्ये प्रवेशासाठी घेतला जाईल. हा कोर्स JEE Advanced च्या तयारीसाठी खास डिझाईन केला असून विद्यार्थ्यांची कोर संकल्पनांवरची पकड आणि परीक्षेची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे.”
अँथे २०२५ ची ऑनलाइन परीक्षा ४ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होईल आणि विद्यार्थी त्यांना सोयीच्या वेळेत एक तासाचं स्लॉट निवडून परीक्षा देऊ शकतील. ऑफलाइन परीक्षा ५ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४१५ पेक्षा जास्त आकाश सेंटर्सवर होणार आहे.
अँथे २०२५ साठी नोंदणी सुरू झाली आहे. या पत्रकार परिषदेत असिस्टंट डायरेक्टर अमित कुमार शर्मा,ॲकॅडमीक हेड मेडिकल विंग चे अमजद अली, ॲकॅडमीक हेड इंजिनिअर विंगचे मनिष कुमार, ब्रॅंच मॅनेजर कोल्हापूर मोहन शिंदे, ब्रॅंच मॅनेजर सांगली कुमार चव्हाण माहिती देण्यासाठी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर गुन्हेगारांच्यावर मोकासह तडीपारीचे प्रस्ताव दाखल करा. पोलिस अधीक्षक मा.गुप्ता

0

गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर गुन्हेगारांच्यावर मोकासह तडीपारीचे प्रस्ताव दाखल करा. पोलिस अधीक्षक मा.गुप्ता

कोल्हापूर/प्रतिनिधी : सार्वजनिक यंदाचा गणेशोत्सव उत्साहात मात्र नियम व अटींचे पालन करूनच पार पडला पाहिजे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मंडळांच्या बैठका घ्या, समन्वयासाठी कर्मचारी नेमा, प्रभारी अधिकाऱ्यांनी ११ दिवस चोख बंदोबस्ताचे नियोजन करावे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा अशा सुचना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुरुवारी झालेल्या क्राईम आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी सकाळी चालू झालेली क्राईम आढावा बैठक सांयकाळ पर्यत चालू होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, बंदोबस्त, प्रतिबंधात्मक कारवाया, आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, डीजे व लेसर किरणांचा वापर टाळला जावा याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
गणेशोत्सवाच उत्साहाचे वातावरण असते. पण या उत्साहाच्या भरात जिल्हयात कुठेही अनुचित घडणा करणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. गणेशोत्सवात महिला, तरुणी देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत असतात, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. गर्दीच्या ठिकाणी जादा बंदोबस्त नेमावा, साध्या वेषातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून टिंगळ टवाळी, दंगा घालणाऱ्या तरुणांवर तातडीने कारवाई करा.प्रतिबंधात्मक कारवाई करून सराईतांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.प्रलबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा केला जावा. अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. गेल्या महिनाभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या आढ़ावा बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, शहर पोलीस उपअधीक्षक, यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी हजर होते.

मोबाईल चोरी करण्यारया टोळीला अटक.साडे तीन लाख रुपये किमंतीचे ४६ मोबाईल जप्त

0

मोबाईल चोरी करण्यारया टोळीला अटक.साडे तीन लाख रुपये किमंतीचे ४६ मोबाईल जप्त

कोल्हापूर/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोबाईल चोरी करण्यारया टोळीला अटक करून त्यांच्या कडील ३ लाख ५८ हजार ५००/ रुपये.किंमतीचे ४६ मोबाईल जप्त करण्यात यश आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी गणेश अनिल माने (वय २३ रा.नागोबावाडी पेठ वडगांव) महादेव राजाराम पाटील (वय ३४ रा.साजणी) आणि गणेश शिवाजी माने (वय २७.रा.सोलापूर) या तिघांना अटक केली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांचे तपास पथक नेमले.या पथकाने मोबाईल चोरट्याचा शोध सुरु केला असता पोलिस अंमलदार संदिप पाटील व शिवानंद मठपती यांना माहिती मिळाली कि,अनोळखी तिघांनी मध्यवर्ती एसटी स्टँड परिसरात आणि रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरले असून ते तिघे जण शाहुपुरी येथील भाजी मंडईत फिरत असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी आणि त्यांच्या तपास पथकाने दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास त्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गणेश अनिल माने,महादेव पाटील आणि गणेश शिवाजी माने यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विविध कंपनीचे ३ लाख ५८ हजार ५०० रुपये.किंमतीचे ४६ मोबाईल आढ़ळून आल्याने ते जप्त करून या तिघांना पुढ़ील तपासासाठी शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.याचा तपास शाहुपुरी पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस अंमदार संदिप जाधव,वसंत पिंगळे,शिवानंद मठपती,सचिन जाधव,अमित सर्जे,अनिकेत मोरे,संजय पडवळ,विलास किरोळकर,संजय हुंबे ,सतीश सुर्यवंशी आणि अरविंद पाटील यांनी केली.

स्मॅक आयटीआयचे गुणवंत विद्यार्थी ठरले महापारेषणसाठी योग्य* ! भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण

0

स्मॅक आयटीआयचे गुणवंत विद्यार्थी ठरले महापारेषणसाठी योग्य* ! भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण

 

शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी :
औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या स्मॅक आयटीआयने यंदा आणखी एका अभिमानाची भर घातली आहे.या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी [महापारेषण] मध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन,कोल्हापूर (स्मॅक) संचलित श्रीमती सोनाबाई शंकरराव जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र आणि स्व. जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन या व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी – महापारेषण मध्ये विद्युत साहाय्यक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल गुुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले .
या समारंभास स्मॅक चे चेअरमन मा. राजू पाटील व आयटीआय कमिटी चेअरमन प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ट्रेनिंग कमिटी सदस्य एम. वाय. पाटील, भीमराव खाडे, कोयना वीज निर्मिती संचलन विभागाचे उपकार्यकारी अभियंता अभिजीत वाघमोडे हे ही उपस्थित होते.
विद्युत साहाय्यकपदी नियुक्त झालेले संकेत कणिरे, सुजित भोसले, स्वालिया जमादार, मंजुषा घोडके आणि सानिया जमादार या विद्यार्थ्यांचा तसेच मर्चंट नेव्ही मध्ये निवड झालेल्या कार्तिक मोकाशी याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमात ड्राफ्ट्समन मेकॅनिकल कोर्समधील रिया गुरव हिच्या प्रशिक्षणासाठी उद्योजक राजुल लायन्सवाला यांनी ५०% फीचा प्रायोजकत्व वाटा उचलला. या उपक्रमातून ‘एक उद्योजक – एक प्रशिक्षणार्थी’ ही संकल्पना मूर्त रूपात राबवली जात असल्याचे अधोरेखित झाले. राजुल लाईन्सवाला यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेला पुढाकार व मार्गदर्शन इतर उद्योजकांसाठी प्रेरणादायक ठरले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत प्राचार्य प्रसन्न वरखेडकर म्हणाले, आजच्या औद्योगिक युगात कौशल्यसंपन्न मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. मात्र दुसरीकडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अपुरी असल्याचे चित्र आहे. या विसंगतीतून मार्ग काढण्यासाठी स्मॅक आयटीआय ही संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. ते पुढे म्हणाले, संस्थेमध्ये आज अत्याधुनिक यंत्रसामग्री,अनुभवी प्रशिक्षक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सुसज्ज वातावरण स्मॅकने उपलब्ध करुन दिले आहे. यामुळेच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना १००% नोकरीची हमी देऊ शकतो.स्मॅक चे चेअरमन राजू पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ शिक्षण असून चालत नाही, तर योग्य दिशा आणि व्यावसायिक कौशल्य आवश्यक आहे. आयटीआयमधून प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. स्मॅक आयटीआय ही केवळ संस्था नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायाभरणी करणारी प्रयोगशाळा आहे व पुणे प्रादेशिक विभागात बेस्ट आयटीआय पुरस्कार प्राप्त
नामांकन मिळवणारी संस्था ठरली आहे.
आयटीआय कमिटी चेअरमन प्रशांत शेळके म्हणाले, ही संस्था उद्योजकांनी तयार केलेली असल्याने प्रशिक्षणाची गुणवत्ता अत्युच्च असून, विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील वास्तवाशी जुळवून घेण्यास मदत होते. पीएलसी मशीनद्वारा प्रशिक्षण, कमिन्सद्वारे उपलब्ध यूएसए निर्मित अँमेट्राँल किट,तसेच इंडस्ट्रीयल प्रात्यक्षिक अनुभव व उद्योजकांचे मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते विद्युत साहाय्यक परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवडीत चमकतात. संंस्थेेत दरवर्षी प्रवेशासाठी यासाठी चुरस होत असते.कार्यक्रमाचे सुरळीत आयोजन व संयोजन स्वरूप धने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. स्नेहल धने यांनी केले.हा सोहळा केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव नव्हता, तर भविष्यातील अनेकांना प्रेरणा देणारा आदर्श ठरला.

शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्यदिना दिवशी तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात.. हे अभिनव आंदोलन करण्यात येणार

0

शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्यदिना दिवशी तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात.. हे अभिनव आंदोलन करण्यात येणार

बारा जिल्ह्यातील ज्या शेतामधून शक्तिपीठ जातोय, त्या शेतामध्ये तिरंगा झेंडा लावण्यात येणार

१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये शक्तीपीठविरोधी ठराव आणि गावागावांमध्ये सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला

कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्ग विरोधात १५ ऑगस्टला अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. ज्या शेतातून शक्तिपीठ जात आहे त्या शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच असा संदेश सरकारला देण्यासाठी, तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. १२ जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी हे आंदोलन करण्यात येणार आहे.शक्तीपीठ महामार्ग विरोधात, आज शनिवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. शक्तीपीठ विरोधातील बारा जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर शेतकरी या बैठकीसाठी ऑनलाइन सहभागी झाले होते. या बैठकीत बोलताना अनेकांनी आक्रमक भूमिका मांडली. शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतात नको हा संदेश देण्यासाठी येत्या १५ ऑगस्टला शेतातच तिरंगा झेंडा लावून तिरंगा झळकतोय आमच्या शेतात.. शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शेतात बाराही जिल्ह्यांत शेतातच मेळावे घेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, आमदार अरुणआण्णा लाड, माजी आमदार वैभव नाईक, नंदाताई बाभुळकर, महेश खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीपीठ बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्गापासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतातच तिरंगा लावून हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या वावरात नको हे सरकारला ठणकावून सांगूया. असे आवाहन त्यांनी केले. ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग आता १ लाख ६ हजार कोटींवर गेला आहे. सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही तो होऊ देणार नाही. या बदलात राज्यात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी रस्ते करा शेतकऱ्याला कर्जमाफी द्या अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली.माजी खासदार राजू शेट्टी यांनी, देशातील पिकाऊ जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. अशा काळात जमीन वाचणवे काळाची गरज असल्याचे सांगितले. शक्तीपीठ महामार्गा विरोधात उभे राहून आपण खऱ्या अर्थाने जमिनीला स्वातंत्र्य करत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी शेतामध्येच मेळावे घेऊन या महामार्गाविरोधात लढा उभारुया. असे त्यांनी सांगितले.
आमदार अमित देशमुख यांनी,
शक्तीपीठ विरोधात हिवाळी अधिवेशनादरम्यान धडक मोर्चा काढूया अशी भूमिका त्यांनी मांडली.
आमदार कैलास पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असे म्हटले जाते. मात्र हा प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांसाठी ड्रीम आहे की क्रीम आहे. हे त्यांनाच माहीत. असा टोला लगावला. माजी खासदार विनायक राऊत यांनी, शक्तीपीठ विरोधात संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलाय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तीपीठ नको. ठेकेदार आणि राज्यकर्त्यांची खिसे भरणारा हा शक्तिपीठ हाणून पाडू. असा इशारा त्यांनी दिला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दहा गावांमधून हा महामार्ग जात आहे. मात्र शेतकऱ्यांचा विरोध सरकार आणि जनतेसमोर यावा त्यासाठी पुढील तीन दिवसांमध्ये सह्यांच्या माध्यमातून शक्तीपीठविरोधी आवाज अधिक बळकट करण्याचा प्रयत्न असून हा लढा ताकतीने लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दहा गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असल्याचही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार अरुण लाड, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह बाराही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये शक्तीपीठविरोधी ठराव तसेच गावागावांमध्ये सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने बुधवारी १३ ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन होणार आहे यामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकरीही मोठ्या संख्येने बिंदू चौक येथे सहभागी होणार आहेत.

अवकारिका’ सिनेमा महापालिकेच्या ४९२ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाहिला

0

अवकारिका’ सिनेमा महापालिकेच्या ४९२ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाहिला

शारंगधर देशमुख फाउंडेशन व आजरेकर फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : शारंगधर देशमुख फौंडेशन व आजरेकर फौंडेशन कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या सामाजिक जाणीवेत वाढ करण्याच्या उद्देशाने, ‘अवकारिका’ या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आज शुक्रवारी दुपारी ३ वाजता शाहू चित्रमंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा चित्रपट महापालिकेच्या ४९२ सफाई कर्मचाऱ्यांनी पाहिला.
हा चित्रपट सफाई कामगार आणि समाजातील विषमता यावर भाष्य करणारा असून, त्यांच्या जीवनातील संघर्ष, आत्मसन्मान व सामाजिक भावनावर प्रकाश टाकतो. समाजाचा अविभाज्य घटक असलेला, नेहमीच दुर्लक्षित राहिलेला व आपल्या आरोग्याची काळजी करणारा सफाई कर्मचारी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये विराट मडके हा कोल्हापूरचा कलाकार प्रमुख आहे.
“सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान समाजासाठी अमूल्य आहे. वास्तवात आपण सर्व नागरिक कचरा निर्माण करतो त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना कचरेवाला न म्हणता आपण त्यांना स्वच्छता दूत असे म्हटले पाहिजे. त्यांच्या सन्मानार्थ’अवकारिका’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख माजी महापौर निलोफर आजरेकर, कलाकार विराट मडके दिग्दर्शक अरविंद भोसले म्युझिक डायरेक्टर श्रेयस देशपांडे माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, दिगंबर फराकटे तात्या खेडकर रशीद बारगीर अभिजीत चव्हाण संभाजी जाधव, संजय सावंत, अरुण बारामते नगरसेविका रीना कांबळे अशपाक आजरेकर उपायुक्त कपिल जगताप परितोश कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील किरण पाटील इस्माईल बागवान पार्थ मुंडे सचिन मोहिते विक्रम कांबळे सुशांत पवार सर्व आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासाबाबत झाली सकारात्मक चर्चा

0

कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासाबाबत झाली सकारात्मक चर्चा

नवी दिल्लीतील बैठकीत विमानतळाच्या अनेक मुद्यांबद्दल झाले निर्णय, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत आज नवी दिल्लीमध्ये बैठक झाली. नागरी हवाई वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी पहिल्या टप्प्यात २३०० मीटर करणे, त्यानंतर धावपट्टीचा विस्तार ३ हजार मीटर करणे, कोल्हापूरहून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित आणि योग्य वेळेत विमानसेवा सुरू व्हावी, कोल्हापूर विमानतळाच्या कॅटॅगिरीमध्ये सुधारणा करावी, उच्च दर्जाची तंत्र सामुग्री कोल्हापूर विमानतळावर कार्यान्वित व्हावी, याबद्दल आज सविस्तर चर्चा झाली. नामदार मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर विमानतळाच्या गतीमान विकासाबद्दल, विमानतळ प्राधिकरणाला स्पष्ट सूचना दिल्या.
कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आणि विस्तारीकरणासाठी आज नवी दिल्लीत बैठक झाली. हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक मुद्दयाचा आढावा घेतला. विमानतळ प्राधिकरणाचे संयुक्त महासंचालक सुरज मल, सदस्य एम. सुरेश, कार्यकारी संचालक सुजय डे, ए.एस. महेशा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. कोल्हापूर विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे कोल्हापूरातून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित आणि सोयीस्कर वेळेत विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. कोल्हापुरातून दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू करता येईल, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा अधिक विकसित कराव्यात, विमानतळावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. त्याला विमानतळ प्राधिकरणाने अनुकुलता दर्शवून, लवकरच त्याबद्दलची चाचणी घेतली जाईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सध्या कोल्हापूर विमानतळावर १९३० मीटरची धावपट्टी आहे. पहिल्या टप्प्यात ही धावपट्टी २३०० मीटर होणे गरजेचे आहे. पण त्यासाठी विमानतळ परिसरातील एका रस्त्याला पर्यायी रस्ता देवून, आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी हीच धावपट्टी ३ हजार मीटरपर्यंत न्यावी, अशी स्पष्ट सूचना नामदार मुरलीधर मोहोळ यांनी केली. तसेच कोल्हापूर विमानतळाला श्रेणी पाचमधून, श्रेणी सहामध्ये वर्ग करावे, ज्यामुळे मोठया क्षमतेची विमाने कोल्हापुरात येवू शकतील. तसेच जगाच्या नकाशावर कोल्हापूर विमानतळाचे नाव येण्यासाठी अत्याधुनिक सामुग्री आणि पायाभूत सुविधा कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध व्हावी, त्यातून नजीकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी, या दृष्टीने खासदार महाडिक यांनी मागण्या आणि सूचना केल्या. त्याला नामदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाच्या सर्वच वरिष्ठ अधिकार्‍यांनी मान्यता दिली. त्यामुळे आजच्या बैठकीतून कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासासाठी चालना मिळाल्याचे स्पष्ट झाले.

आमदार सतेज पाटील यांनी केले कोल्हापूरकरांचे अभिनंदन

0

आमदार सतेज पाटील यांनी केले कोल्हापूरकरांचे अभिनंदन

कोल्हापूर/प्रतिनिधी : सर्व कोल्हापूरकरांचे अभिनंदन! माधुरी हत्तीणीच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापूरातील लोकांच्या एकजूटीचा आणि लोकभावनेचा आहे. या सामुहीक लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. माधुरीला कोल्हापुरात पुनर्वसन करण्याचा वनतारा व्यवस्थापनेच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.

आमदार सतेज पाटील
विधान परिषद गटनेते.

कोल्हापूर दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये वनताराची टीम दुसऱ्यांदा दाखल

0

कोल्हापूर दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये वनताराची टीम दुसऱ्यांदा दाखल

कोल्हापूर/प्रतिनिधी : नांदणी येथील माधुरी हत्तीला गेल्या आठवड्याभरापूर्वी वनतारा संस्थेने नांदणी करांच्या प्रचंड रोशाला सामोरे जात घेऊन जाण्याची प्रक्रिया केली होती. याचा उद्रेक झाला आणि नांदणीकरांसह कोल्हापूर कर्नाटक,सांगली सह सर्व ठिकाणच्या नागरिकांनी याला तीव्र विरोध केला. नांदणीकरांनी तर जिओची सिम कार्ड बंद करून पोर्ट करण्यास सुरुवात केली याचा परिणाम झाला आणि प्रचंड दबाव नांदणी करांनी वनतारावर आणला. कोल्हापूरमध्ये नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी मूक पदयात्रा काढून हजारोंच्या संख्येने राष्ट्रपती यांच्या नावे दयेचा अर्ज सादर करण्यात आला होता संपूर्ण लांगणी कर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले होते ज्यावेळी माधुरी हत्तीला घेऊन जाण्यात येत होते. त्यावेळीही नांदरीकरांनी रस्त्यावर उतरून प्रचंड रोष दाखविला होता मात्र तरीही माधुरी नेण्यात आला. वनताराची टीम नांदणी मध्ये दाखल झाली होती. आताही वनतारा संस्थेने माफी नाम्याचे पत्र इंस्टा पेजवर पोस्ट केल्याने पुन्हा एकदा माधुरी हत्ती आपल्या गावी परत येणार अशी आशा आता नांदणीकरांना कोल्हापूरकरांना वाटत आहे. आता वनताराची दुसऱ्यांदा टीम कोल्हापूरमध्ये दिगंबर जैन बोर्डिंग येथे दाखल झाली आहे.