Wednesday, October 22, 2025
spot_img
Homeताज्याअँथे २०२५ ची आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम घोषणा;इयत्ता ५ वी ते...

अँथे २०२५ ची आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम घोषणा;इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹२५० कोटींपर्यंत शिष्यवृत्ती

उद्याच्या समस्यांचं समाधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अँथे २०२५ ची आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम घोषणा;इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹२५० कोटींपर्यंत शिष्यवृत्ती

कोल्हापूर/प्रतिनिधी : मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) या देशातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेटरी संस्थेने आपल्या प्रतिष्ठित उपक्रमाची – अँथे २०२५ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम) – घोषणा केली आहे. भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रतीक्षित वार्षिक परीक्षा असलेल्या अँथे २०२५ चा उद्देश इयत्ता ५वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्यास आणि खर्‍या अर्थाने प्रॉब्लेम सॉल्व्हर्स होण्यासाठी सक्षम करणे हा आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अँथे २०२५ द्वारे विद्यार्थ्यांना ₹२५० कोटींपर्यंतचे १००% स्कॉलरशिप्स आणि ₹२.५ कोटींच्या रोख पारितोषिकांची संधी दिली जात आहे. ही संधी क्लासरूम, आकाश डिजिटल आणि इन्विक्टस कोर्सेससाठी उपलब्ध आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना NEET, JEE, राज्य CETs, NTSE आणि ऑलिंपियाड्ससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आकाशच्या अनुभवी मार्गदर्शकांकडून दर्जेदार मार्गदर्शन घेण्याचा मार्ग खुला होतो.
या वचनबद्धतेला पुढे नेत, ‘आकाश’ आता इन्व्हिक्टस एस टेस्ट नावाची एक शिष्यवृत्ती परीक्षा देखील सुरू करत आहे. ही परीक्षा ८ वी ते १२ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश इन्व्हिक्टस JEE Advanced तयारी कार्यक्रमात प्रवेश देण्यासाठी आयोजित केली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता व शिष्यवृत्ती परीक्षा २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाणार आहे. तीन तासांची ही परीक्षा (सकाळी १० ते दुपारी १) ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असेल.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ आणि एमडी  श्री. दीपक मेहरोत्रा यांनी सांगितलं की, “अँथे हा आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचं प्रतीक बनला आहे. मागील १६ वर्षांपासून आम्ही हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा यासाठी मदत करत आलो आहोत.या वर्षापासून आम्ही ‘इन्व्हिक्टस एस टेस्ट’ देखील सुरू करत आहोत, जो स्कॉलरशिप आणि आकाश इन्व्हिक्टस कोर्समध्ये प्रवेशासाठी घेतला जाईल. हा कोर्स JEE Advanced च्या तयारीसाठी खास डिझाईन केला असून विद्यार्थ्यांची कोर संकल्पनांवरची पकड आणि परीक्षेची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे.”
अँथे २०२५ ची ऑनलाइन परीक्षा ४ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होईल आणि विद्यार्थी त्यांना सोयीच्या वेळेत एक तासाचं स्लॉट निवडून परीक्षा देऊ शकतील. ऑफलाइन परीक्षा ५ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४१५ पेक्षा जास्त आकाश सेंटर्सवर होणार आहे.
अँथे २०२५ साठी नोंदणी सुरू झाली आहे. या पत्रकार परिषदेत असिस्टंट डायरेक्टर अमित कुमार शर्मा,ॲकॅडमीक हेड मेडिकल विंग चे अमजद अली, ॲकॅडमीक हेड इंजिनिअर विंगचे मनिष कुमार, ब्रॅंच मॅनेजर कोल्हापूर मोहन शिंदे, ब्रॅंच मॅनेजर सांगली कुमार चव्हाण माहिती देण्यासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments