गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर गुन्हेगारांच्यावर मोकासह तडीपारीचे प्रस्ताव दाखल करा. पोलिस अधीक्षक मा.गुप्ता
कोल्हापूर/प्रतिनिधी : सार्वजनिक यंदाचा गणेशोत्सव उत्साहात मात्र नियम व अटींचे पालन करूनच पार पडला पाहिजे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मंडळांच्या बैठका घ्या, समन्वयासाठी कर्मचारी नेमा, प्रभारी अधिकाऱ्यांनी ११ दिवस चोख बंदोबस्ताचे नियोजन करावे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा अशा सुचना पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुरुवारी झालेल्या क्राईम आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी सकाळी चालू झालेली क्राईम आढावा बैठक सांयकाळ पर्यत चालू होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, बंदोबस्त, प्रतिबंधात्मक कारवाया, आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, डीजे व लेसर किरणांचा वापर टाळला जावा याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
गणेशोत्सवाच उत्साहाचे वातावरण असते. पण या उत्साहाच्या भरात जिल्हयात कुठेही अनुचित घडणा करणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. गणेशोत्सवात महिला, तरुणी देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत असतात, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. गर्दीच्या ठिकाणी जादा बंदोबस्त नेमावा, साध्या वेषातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून टिंगळ टवाळी, दंगा घालणाऱ्या तरुणांवर तातडीने कारवाई करा.प्रतिबंधात्मक कारवाई करून सराईतांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.प्रलबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा केला जावा. अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. गेल्या महिनाभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या आढ़ावा बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, शहर पोलीस उपअधीक्षक, यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी हजर होते.