मोबाईल चोरी करण्यारया टोळीला अटक.साडे तीन लाख रुपये किमंतीचे ४६ मोबाईल जप्त
कोल्हापूर/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोबाईल चोरी करण्यारया टोळीला अटक करून त्यांच्या कडील ३ लाख ५८ हजार ५००/ रुपये.किंमतीचे ४६ मोबाईल जप्त करण्यात यश आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी गणेश अनिल माने (वय २३ रा.नागोबावाडी पेठ वडगांव) महादेव राजाराम पाटील (वय ३४ रा.साजणी) आणि गणेश शिवाजी माने (वय २७.रा.सोलापूर) या तिघांना अटक केली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांचे तपास पथक नेमले.या पथकाने मोबाईल चोरट्याचा शोध सुरु केला असता पोलिस अंमलदार संदिप पाटील व शिवानंद मठपती यांना माहिती मिळाली कि,अनोळखी तिघांनी मध्यवर्ती एसटी स्टँड परिसरात आणि रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरले असून ते तिघे जण शाहुपुरी येथील भाजी मंडईत फिरत असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी आणि त्यांच्या तपास पथकाने दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास त्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गणेश अनिल माने,महादेव पाटील आणि गणेश शिवाजी माने यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विविध कंपनीचे ३ लाख ५८ हजार ५०० रुपये.किंमतीचे ४६ मोबाईल आढ़ळून आल्याने ते जप्त करून या तिघांना पुढ़ील तपासासाठी शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.याचा तपास शाहुपुरी पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस अंमदार संदिप जाधव,वसंत पिंगळे,शिवानंद मठपती,सचिन जाधव,अमित सर्जे,अनिकेत मोरे,संजय पडवळ,विलास किरोळकर,संजय हुंबे ,सतीश सुर्यवंशी आणि अरविंद पाटील यांनी केली.