वृक्षमित्र पंडित माने यांना आविष्कार फौंडेशनचा राजर्षी शाहू महाराज राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर, आज पुरस्कार दिला जाणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : वृक्षमित्र पंडित माने रा.केरली यांनी सन २००० सालापासून पर्यावरण कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी वृक्षमित्र पंडीत माने. व माने परिवार प्रयत्नशील आहे.श्रीसंत सद्गुरू बाळूमामा वृक्षारोपण संकल्प केर्ली मार्फत आतापर्यंत २० लाख वृक्षलागवड यशस्वी केली आहे. गिरणार परिक्रम गुजरात वृक्ष लागवड यशस्वी केली आहे. शिवाय जोतिबा डोंगर, महालक्ष्मी कोल्हापूर श्रीसंत बाळुमामा.आदमापूर या ठिकाणाहून उभ्या महाराष्ट्रात
मलबारी कटिग कढीपत्ता लागवड साधली आहे. या कार्याची दखल घेऊन आविष्कार फौंडेशन महाराष्ट्र मा संजय पवार यानी राजर्षी शाहू महाराज राज्य स्तरीय पुरस्कार
वृक्षमित्र पंडीत माने याना जाहीर केला आहे त्याचे आज २५ जून २०२३ रोजी व्ही. टी.पाटील सभागृह कमला काॅलेज
कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण केला जाणार आहे.श्रीसंत बाळुमामा वृक्षारोपण संकल्प केर्ला मार्फत वृक्षमित्र पंडीत माने सुनीता माने सन
२००० सालापासून पर्यावरण कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न शील आहे कार्य यशस्वी होण्यासाठी अनेक हात लागतात तो मदतीचा हात दिल्याने पर्यावरणाचे अनेक आराखडे बांधले व यशस्वी झाले आहेत याच कार्याची दखल ही आविष्कार फौंडेशनने घेतली आहे.