Friday, October 24, 2025
spot_img
Homeताज्यादेशातील आघाडीच्या १५० संस्थामध्ये - डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ ‘एनआयआरएफ’...

देशातील आघाडीच्या १५० संस्थामध्ये – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ ‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये विद्यापीठाचे स्थान कायम

देशातील आघाडीच्या १५० संस्थामध्ये – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ

‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये विद्यापीठाचे स्थान कायम

कसबा बावडा/ प्रतिनिधी :  राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क अर्थात ‘एन.आय.आर.एफ.- २०२३ ची क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. या क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने देशातील आघाडीच्या १५० शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी ही माहिती दिली.
विविध निकषांवर उत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातील शैक्षणिक संस्थांची एन. आय.आर. एफ. क्रमवारी सन २०१६ पासून केंद्रीय शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाते. सुरुवातीपासूनच या क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने १०१ ते १५० या बँड मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीमध्ये यावर्षी देशभरातील ८.६८६ विद्यापीठे व संस्था सहभागी झाल्या होत्या. विद्यापिठातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, संशोधन कार्य, विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण, मुलींचे प्रमाण, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांची संख्या, विविध समाज घटकापर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी केलेले कार्य, विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय आदी विविध निकषांवर आधारित गुणांकनानुसार एन. आय.आर. एफ. रँकिंग जाहीर केले जाते. २०२० व २०२१ मध्येही विद्यापीठाने एन. आय.आर.एफ. रँकिंगमध्ये १०१ ते १५० या बँडमध्ये स्थान मिळवले होते.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना २००५ मध्ये झाली असून गेल्या १८ वर्षात विद्यापीठाने विविध पातळ्यावर यशाची चढती कमान कायम ठेवली आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत मेडिकल कॉलेज, कॉलेज ऑफ फिजीओथेरपी, स्कूल ऑफ हॉस्पीटीलीटी, कॉलेज ऑफ नर्सिंग, कॉलेज ऑफ फार्मसी, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस आणि सेंटर ऑफ इंटरडीसीप्लेनरी स्टडीज या संस्थांच्या माध्यमातून ५७ हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात.

 

चौकट

बदलते निकष आणि दरवर्षी वाढणारी स्पर्धा यामध्येही विद्यापीठाने उत्तम सामुहीक कामगिरीच्या जोरावर आघाडीच्या १५० संस्थामध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एन.आय.आर.एफ. रँकिंगमध्ये विद्यापीठाचे स्थान आणखी उंचावण्याचा प्रयत्न राहील.असा विश्वास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कुलगुरु -डॉ राकेश कुमार मुदगल यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments