Friday, May 9, 2025
spot_img
Homeताज्याविश्वच्या विद्यार्थिनीला जॉर्जियामध्ये मिळाला वैद्यकीय शास्त्राचा सराव करण्याचा परवाना

विश्वच्या विद्यार्थिनीला जॉर्जियामध्ये मिळाला वैद्यकीय शास्त्राचा सराव करण्याचा परवाना

भारतातून जॉर्जियामधील MBBS च्या वैद्यकीय कोर्ससाठी विश्वमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विश्वकडून विद्यार्थी पालकांसाठी अतिशय आनंदाची बातमी मिळाली आहे. जॉर्जियात MBBS चे शिक्षण पूर्ण केलेल्या ममता मायटी या विद्यार्थींनीला आता जॉर्जियामध्ये प्रॅक्टीस करण्याची संधी मिळाली आहे. मिस ममता मयती जॉर्जियामधील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यापीठांपैकी एक असलेल्या ग्रिगोल रोबाकिड्झे युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती.NMC च्या 18th November 2021 च्या राजपत्रानुसार, परदेशात MBBS शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा सहा वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या देशात सराव करण्यासाठी परवाना मिळणे आवश्यक आहे. मिस ममता मयती यांना मिळालेला परवाना मिळवणे हे कोणत्याही परदेशी वैद्यकीय पदवीधरासाठी एक स्वप्न पूर्ण होणे आहे, जे जॉर्जियामध्ये शिक्षणासाठी जाणार्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी विशेषतः खरे आणि प्रेरणादायी आहे.
दरवर्षी हजारो विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जात असतात पण भारतात परतल्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रॅक्टीस करण्याची संधी ज्या-त्या देशामधून घ्यावी लागते. मात्र विश्वकडून पाठविलेल्या महाराष्ट्रातील या विद्यार्थींनीला आता जॉर्जियात प्रॅक्ीस करण्याची संधी मिळालेली आहे.
त्यामुळे भारतातून जॉर्जियामधील MBBS च्या वैद्यकीय कोर्ससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षी कोरोनासारखी बिकट परिस्थिती असताना देखील जॉर्जिया हा जगातील सर्वात सुरक्षित म्हणून चौथ्या क्रमांकाचा देश म्हणून गणला गेला. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांची जॉर्जिया प्रथम पसंती मानली जात आहे. यावर्षी जॉर्जिया गर्व्हमेंटने विद्यार्थी पालकांना आनंदाचा धक्का दिला आहे. तो म्हणजे 29 सप्टेंबर 2022 रोजी जॉर्जिया गर्व्हमेंट मार्फत वैद्यकीय शिक्षणाविषयीचा कायदा आता बदलून त्यामध्ये काही बदल सुचविले होते मात्र त्यावर फेरविचार करुन जॉर्जिया गर्व्हमेंटच्या एज्युकेशन डिपार्टमेंटने तो जीआर पुर्वीच्या म्हणजेच 18 नोव्हेंबर 2021 नुसार सुरु ठेवण्याचे आदेश पारित करीत त्याबाबतचा जीआर काढलेला आहे. त्यामुळे आता भारतातील विद्यार्थ्यांना इतर देशातील शिक्षणाप्रमाणेच जॉर्जियातील MBBS शिक्षण घेण्याची संधी दिली जाणार आहे.
जॉर्जियातील मेडिकल प्रवेशासाठी विश्व ही महाराष्ट्रातील अग्रगण्य असणारी संस्था आहे. विश्व मार्फत याही वर्षी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी जॉर्जिया पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी जॉर्जियाला पसंती दर्शविली असल्याची महिती विश्वचे संस्थापक श्री. ज्ञानेश्वर भस्मे, आणि संचालक श्री. प्रमोद कमलाकर यांनी दिली आहे.
विश्व संस्था गेल्या 24 वर्षापासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मेडिकलच्या प्रवेशासाठी लागणारे परिपुर्ण मार्गदर्शन मोफत करत आहे. गेल्यावर्षी सुमारे 3000 हून अधिकविद्यार्थ्यांनी याचा लाभ घेवून आपला प्रवेश निश्चीत केला. यावर्षीही नीट परिक्षेच्या निकालाआधी विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशासाठी विश्वने मोफत मार्गदर्शन केले आणि त्याला विद्यार्थी पालकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभत आहे. भारतात आणि परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ही संस्था मार्गदर्शन करते. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना विश्व संस्थेमार्फत मोफत मार्गदर्शन दिले जाते. 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवले आहे. कमी बजेट मध्ये सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण, परदेशातही मराठी मुलांसाठी संस्थेचे हॉस्टेल, महाराष्ट्रीयन आचारी तसेच शिक्षक या सुविधा विश्व तर्फे परदेशातही पुरविल्या जातात. या विद्यार्थ्यांसाठी विश्वचे 6 संचालक, 200 कर्मचारी अगदी 365 दिवस कार्यरत असतात. विश्व महाराष्ट्रात 16 कार्यालय आहेत. आता कोल्हापूर शहरामध्ये विश्वची दुसरी आणि महाराष्ट्रात 17 वी शाखा सुरु झाली आहे. विश्वची भारतातील तसेच परदेशातील विद्यापीठांमध्ये पार्टनरशिप आहे. विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन लोन व्यवस्था, पासपोर्ट सेवा, विमानतिकीट आणि करंसी एक्चेंज या सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. त्याचप्रमाणे भाषेचा अडथळा येवू नये यासाठी विश्वमार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेल्या देशाची ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीत शिकविले जाते.
त्यामुळे MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना विश्व मार्फत कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेंगलोर, बेळगाव, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी मोफत मार्गदर्शन सुरु ठेवले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या स्टुडंट हेल्पलाईन क्र. 7030306611 यावर सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत संपर्क साधावा आणि आपली भेटीची वेळ निश्चित करावी असे आवाहन संचालक ज्ञानेश्वर भस्मे,आणि प्रमोदसर यांनी केले आहे. https://www.vmap.co.in/mbbs-in-georgia

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments