प्रसिद्ध रंगावलीकार महेश पोतदार यांनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात साकारल्या रांगोळीद्वारे नवदुर्गेची नऊ रूपे
कोल्हापूर/(श्रद्धा जोगळेकर) : प्रसिद्ध रंगावलीकार महेश पोतदार यांनी यावर्षी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवी अंबाबाईची नऊ रूपे ही आपल्या रांगोळीद्वारे साकारली होती या नवदुर्गांच्या छटा रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब महेश पोतदार यांनी आपल्या हातातून निर्माण केल्या होत्या.
यामध्ये नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुर्गेचे पहिले रूप ‘शैलीपुत्री‘ या नावाने ओळखले जाते. या शैलीपुत्री दुर्गेचे रूप साकारले होते.शैलीपुत्री ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले आहे.नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला ‘मूलाधार’ चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव ‘सती’ असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता. हिचे वाहन वृषभ आहे.
दुसरी रांगोळी ही “ब्रम्हचारिणी” या नवदुर्गेची काढण्यात आली होती.दुर्गा देवीचं दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. ही देवी भक्तांना अनंत कोटी फल प्रदान करणारी आहे. या देवीची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयमाची भावना जागृत होते. अत्यंत शांत दिसणारे देवी श्वेत वस्त्रात आहे एका हातामध्ये रुद्राक्ष व दुसऱ्या हातात कमंडलू व गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केलेली ही देवी मनाला प्रसन्नता देते.
तिसरी रांगोळी ही “चंद्रघंटा” या नव दुर्गेची साकारण्यात आली होती. दुर्गा देवीचं हे तिसरं स्वरूप चंद्रघंटा शांतिदायक आणि कल्याणकारी आहे. या देेेेवीची उपासना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. वीर गुणांची वृद्धी होते. स्वरात माधुर्य येते आणि आकर्षक वाढतं. या देवीचे वाहन सिंह आहे.
चौथी रांगोळी ही “कुष्मांडा” या नवदुर्गेची काढण्यात आली होती. दुर्गा देवीचं चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. या देवीची उपासना केल्याने सिद्धी, निधी प्राप्त होते आणि सर्व रोग-शोक दूर होऊन आयू आणि यशात वृद्धी होते. अष्टभुजा असणारी ही देवी सर्व रोग नष्ट करणारी ही देवी ला कुष्माण्ड अर्थात कोहळा याचा नैवेद्य फार आवडतो.
पाचवी रांगोळी ही “स्कंदमाता” या नवदुर्गेची काढण्यात आली होती.स्कंदमाता हे
दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. देवी पार्वतीचे हे पाचव्या रुपान आपला पुत्र षडानन अर्थात मयुरेश कार्तिकेय हा गणेशचाभाऊ याला बाल रूपातील मुलाला आपल्या मांडीवर घेतले आहेे .रूपमोक्षाचे दार उघडणारी आई परम सुखदायी आहे. देवी आपल्या भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करते.
सहावी रांगोळी ही कात्यायानी देवीची काढण्यात आली होती.
दुर्गेचे सहावे रूप म्हणजे “कात्यायनी” देवी या देवीचे पूजन केल्याने अद्भुत शक्तीचा संचार होतो. कात्यायनी साधकाला दुश्मनांचे संहार करण्यास सक्षम करते आणि या देवीचं संध्याकाळी ध्यान करणे अधिक फलदायी असते.
सातवी रांगोळी ही “कालरात्रि” या नवंदुर्गेची काढण्यात आली होती.
दुर्गा देवीचे सातवे रूप कालरात्रि असे आहे. कालरात्रि देवीचे रूप अतिशय भितीदायक जरी असले तरी हि देवी शुभदायीनी आहे, म्हणूनच ह्या देवीला “शुभंकारी” असे देखील संबोधण्यात येते. कालरात्रीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शत्रूंचा नाश होतो तसेच तेज वाढतो. गदर्भ तिचे वाहन असून अतिशय उग्र रूपातील ही देवी आहे .
आठवी रांगोळी ही “महागौरी” या देवीची काढण्यात आली होती.दुर्गा देवीचे आठवे रूप महागौरी हे आहे. महागौरीचे पूजन केल्याने सर्व पापांचा क्षय होऊन चेहर्यावरील कांति वाढते. सुखात वृद्धी होते तसेच शत्रूंवर विजय मिळते. वृषभ तिचे वाहन आहे .
नववी रांगोळी हो “सिद्धीदात्री” या देवीची काढण्यात आली होती.माता दुर्गाचे नववे रूप सिद्धिदात्री हे आहे सिद्धिदात्रीची आराधना केल्याने अणिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, सर्वकामावसांयिता, दूर श्रवण, परकाया प्रवेश, वाक् सिद्धी, अमरत्व, भावना सिद्धी आदि समस्त नव-निधींची प्राप्ती होते.
कोरोनामुळे सण २०२० साली यावर्षी मंदिरात भक्तांना प्रवेश नव्हता तरीही अत्यंत भक्तिभावाने श्री महालक्ष्मी अंबा माताची सेवा म्हणून महेश चंद्रकांत पोतदार यांनी या नवदुर्गांची च्या रांगोळ्या रेखाटलेल्या होत्या. फेसबुक, व्हाट्सअप, इंटरनेट विविध प्रसार माध्यम पत्रक यांच्यातून या कलेचे दर्शन सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचले १९८६ सालापासून रंगाने रांगोळीच्या माध्यमातून कला सादर करणारा कलाकार सातत्याने गणेशोत्सव नवरात्रोत्सव असू देत आपली कला सादर करत असतो याचीही अखंड सेवावृत्ती आज नवरात्रीचा रूपाने महालक्ष्मी अंबामाता मंदिरात पाहावयास मिळाली रांगोळीच्या माध्यमातून गालीचा रांगोळी असेल अथवा व्यक्ती चित्र रांगोळी असेल पानाफुलांची रांगोळी असेल पाण्यावरील पाण्याच्या आतील असेल अशा विविध माध्यमातून संपूर्ण भारतभर कलेचा उपासक ,कलाकार एक देवीचा भक्त या रूपाने महेश पोतदार यांनी आपली कला सादर करून देवीची सेवा करण्याचा हा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
गेले पंचवीस वर्ष कोल्हापुर महालक्ष्मी अंबाबाई चा रथ उत्सवाच्या वेळी सातत्याने सर्वात मोठी गालीचा रांगोळी आतापर्यंत त्यांनी सादर केलेली आहे याच बरोबर गेले बारा वर्ष ओरिसा येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा याठिकाणी २० ते २२ लाख भक्तांच्या मध्ये हा कोल्हापूरचा कलाकार अभिमानाने आपली कला सादर करतो आहे.त्यांच्या या अखंडित कार्याला माय मराठी न्यूज कडून शुभेच्छा व सलाम.!!