Thursday, October 23, 2025
spot_img
Homeताज्यापुणे पदवीधरची उमेदवारी भैय्या माने यांना द्या,कोल्हापुरातील बैठकीत प्रमुख नेते मंडळींसह कार्यकर्त्यांची...

पुणे पदवीधरची उमेदवारी भैय्या माने यांना द्या,कोल्हापुरातील बैठकीत प्रमुख नेते मंडळींसह कार्यकर्त्यांची मागणी

पुणे पदवीधरची उमेदवारी भैय्या माने यांना द्या,कोल्हापुरातील बैठकीत प्रमुख नेते मंडळींसह कार्यकर्त्यांची मागणी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या  पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांना द्या, अशी मागणी प्रमुख नेते मंडळीसह कार्यकर्त्यांनी केली आहे. कोल्हापुरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील होते.
यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, प्रताप उर्फ भैय्या माने समाजकारण आणि शैक्षणिक कार्याचा वारसा सक्षमपणे पुढे चालवित आहेत. गेल्या ४० वर्षांपासून पक्षीय संघटनेसह सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षासाठी अहोरात्र झटणारे श्री. माने हे आहेत.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, देशाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या  विचारधारेने काम करणारे भैय्या माने हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर त्यांची गाढ श्रद्धा आहे.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, कागलच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, माजी महापौर ॲड. सौ. मंजिरी लाटकर, दलितमित्र प्रा. डी.डी. चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे व  काशिनाथ तेली, केडीसीसीचे संचालक असिफ फरास,  बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर व संतोष पाटील, गडहिग्लजचे माजी नगराध्यक्ष किरण कदम वसंतराव यमगेकर, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजेश लाटकर, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदिल फरास,  आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुधीर देसाई, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवानंद माळी, राष्ट्रवादीचे करवीरचे अध्यक्ष मधुकरराव जांभळे, भुदरगड राष्ट्रवादीचे अध्यक्ष पंडितराव केणे, राधानगरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष किसनराव चौगुले, पन्हाळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष धुमाळ, इचलकरंजी शहर राष्ट्रवादी अध्यक्ष प्रकाश पाटील, आजरा राष्ट्रवादी अध्यक्ष मुकुंद देसाई, कागल तालुका राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अजित कांबळे, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ शितल फराकटे, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील -कुरुकलीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष किरण पास्ते, स्थायीचे सभापती सचिन पाटील, माजी  उपमहापौर प्रकाश पाटील, नगरसेवक अजित राऊत, शेतकरी संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रामेश्वर पत्की, कागलचे उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, नगरसेवक नितीन दिंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रसाद उगवे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अभय देसाई- अडकूरकर, राष्ट्रवादी ओबीसी संघटनेचे अध्यक्ष श्री. पुजारी आदी प्रमुख उपस्थित होते.

चौकट –
कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी ९० हजारांवर
पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान संख्या ही सर्वात जास्त म्हणजेच ९० हजारावर आहे. कोल्हापूरचा उमेदवार असल्यावर कोल्हापूरकर त्यांना भरभरून मते देतात, हा इतिहास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments