आधी टिकली लाव मग प्रश्नाचे उत्तर देतो असे वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजींचा कोल्हापूरच्या महिला पत्रकारांनी केला निषेध
कोल्हापूर/प्रतिनिधी : आधी टिकली लाव मग प्रश्नाचे उत्तर देतो असे वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजींचा महिला पत्रकारांनी केला निषेध कोल्हापूर प्रतिनिधी आधी टिकली लाव मग प्रश्नाचे उत्तर देतो असं म्हणणाऱ्या संभाजी भिडे यांचा कोल्हापुरातील सर्व प्रसार माध्यमातील महिला पत्रकारांनी आज दसरा चौक येथे निषेध केला.यावेळी टिकली लावणे हा प्रत्येक महिलेची वैयक्तिक गोष्ट आहे.त्यामुळे भिडे गुरुजींनी महिलांना माफी मागावी व विधान मागे घ्यावे अशी मागणी महिला पत्रकारांनी केली आहे.यावेळी भिडे गुरुजींचा धिक्कार असो,आधी टिकली लाव मग मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो असे म्हणणाऱ्या भिडे गुरुजींचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.यावेळी क्रांतिशिहच्या संपादिका सुनंदा मोरे मॅडम,शुभांगी तावरे,श्रद्धा जोगळेकर, अश्विनी खोंद्रे,सीमा पवार,दीक्षा घोरपडे,अहिल्या परकाळे