५ ते ९ जानेवारी २०२३ ला इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो (IIJS) “सिग्नेचर २०२३” हे भव्य प्रदर्शन मुंबई येथे भरविण्यात येणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) यांच्यावतीने दि. ५ ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो (IIJS) “सिग्नेचर २०२३” हे भव्य प्रदर्शन मुंबई येथे भरविण्यात येणार आहे. भारतासह अनेक मोठ्या देशातून या प्रदर्शनात ज्वेलर्स सहभागी होत असतात तर विविध देशातून ही या प्रदर्शन पाहण्यासाठी ज्वेलर्स येत असतात.आज कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि GJEPC यांच्या संयुक्त विद्यामानाने कोल्हापुरातील दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग येथे या प्रदर्शनाचे रोड शो चे आयोजन करण्यात आले होते, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. राजेश राठोड, उपाध्यक्ष श्री. विजय हावळ, सचिव श्री. प्रीतम ओसवाल, GJEPC चे हेड ऑफ मेम्बरशीप आणि MSME ऑल इंडिया हेड श्री. मिथिलेश पांडे, असिस्टंट डायरेक्टर मिस नाहीद सुंके, असिस्टंट मॅनेजर अनु कोडगुले, एक्सिकटिव्ह शितल केसरकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. राजेश राठोड आणि उपाध्यक्ष श्री. विजय हावळ यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्यानंतर gjepc चे मिथिलेश पांडे यांनी प्रदर्शनाची संपूर्ण माहिती सांगितली व असिस्टंट डायरेक्टर नाहीद सुंके यांनी प्रदर्शनचे रजिस्ट्रेशन बद्दल माहिती, visitor यांना प्रदर्शनचे फायदे या बद्दल माहिती दिली, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे उपाध्यक्ष श्री. विजय हावळ यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव श्री. प्रीतम ओसवाल यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे सचिव तेजस धडाम, संचालक कुलदीप गायकवाड, किरण गांधी, अशोक ओसवाल, ललित ओसवाल, सिदार्थ परमार, ललित ओसवाल, संजय रांगोळे, विजयकुमार भोसले, भैरू ओसवाल, शिवाजी पाटील, शितल पोतदार आणि सराफ व सुवर्णकार कारागीर उपस्थित होते.