अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई करा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींना प्रेमप्रकरणामध्ये अडकवून पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे.गेल्या चार महिन्यापासून ग्रामीण भागातील करवीर तालुक्यातील केर्ली येथील मुलगी बेपत्ता आहे,पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारून वैतागलेल्या आई वडिलांना अद्याप त्या मुलीचा ताबा मिळाला नाही.पोलीस थातुरमातुर उत्तरे देऊन तिच्या आईवडिलांना पोलिस ठाण्यातून हाकलून लावतात अशी माहिती आहे. त्याचबरोबर आणखी एक १४ वर्षांची मुलगी अशाच फसवीगिरीमुळे बेपत्ता आहे,
अशा प्रकरणांमध्ये पोलीस खाते, गृहखाते, काय करते हा संशोधनाचा विषय आहे. अशा आरोपींना व त्यांना ज्यांनी मदत केली अशाना,त्याचबरोबरीने अशा प्रेमी युगुलाना निवारा देणाऱ्या, घर असो वा लॉजिंग असो या सर्वांवर तपासणी करून पोक्सो कायद्याखाली कारवाई होणे आवश्यक आहे.तसेच अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या तरुणांवर जुजबी कारवाई न करता पोक्सो कायद्याखाली सर्वांना अटक होणे आवश्यक आहे. अशी मागणी मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलींच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत त्याकरता पन्हाळा रोडवर लॉजिंग व इतर ठिकाणी पोलिसांनी कारवाई सुरू केली तर निश्चितपणे यावर आळा बसेल, अशा कुठल्याही अल्पवयीन मुलींच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कडक कारवाई करावी असे आवाहन गणी आजरेकर चेअरमन मुस्लिम बोर्डिंग,कादर मलबारी, प्रशासक रफिक शेख ,रफिक मुल्ला, मलिक बागवान, लीयाकत मुजावर जहांगीर आतार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे