आमदारकी खासदारकी पेक्षा हिंदू रक्षक हेच माझ्यासाठी सर्वाच्च पद -भवानी मंडपातील जिहाद विरोधातील मोर्चात आमदार नितेश राणे यांचे घणघणती प्रतिपादन
त्या मुली सत्वर घरी न आल्यास पुढील आंदोलनास पोलीस जबाबदार – राणे यांचा इशारा
कोल्हापूर/प्रतिनिधी : सार्वजनिक जीवनात महाराष्ट्राच्या जनतेने राणे परिवाराला भरपूर प्रेम आणि सन्मान दिला आहे. आमदार खासदार या पदापेक्षा त्याच्या मनातील आदरभाव आणि हिंदू रक्षक म्हणूनच आपण नेहमीच प्राधान्य देत असून त्या पुढे आमदार खासदार पद गौण आहे,असे आग्रही प्रतिपादन करत भाजप आमदार नितेश राणे यांनी करत मुस्लिम युवकांनी पूस लावून पळवलेल्या मुली सत्वर त्यांच्या पालकांकडे सुखरूप न पोहोचल्यास होणाऱ्या तीव्र आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी पोलिसांची राहील असा इशाराही त्यांनी दिला. भवानी मंडप राजवाडा पोलीस स्थानकासमोर झालेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या मोर्च्या समोर ते बोलत होते.त्यांच्यासह सचिन तोडकर,विहिंपचे जोशी-वंदूरकर,पावसकर, संभाजी सांळुखे,सुजाता पाटील,महेश जाधव,राहूल चिकोडे, श्रीकांत पोतनीस,अनिरुद्ध कोल्हापुरे,अशोक पोतनीस यांच्या नेतृत्वा खाली लव्ह जिहाद विरोधात भवानी मंडप – राजवाडा पोलिस स्टेशन समोर आक्रमक आंदोलन छेडण्यात आले. हिंदूंनी आता आक्रमक होण्याची गरज आहे असे आग्रहाने नमूद करत राणे म्हणाले कि, “मुस्लिमांना आंदोलन करण्याची वेळ आली अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तिकडे किंवा धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते त्याला जीवंत ठेवत नाही. अशी असंख्या उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. मात्र, आपल्याला टोप्या घालाव्या लागतात, गमछे घालावे लागतात, घोषणा द्याव्या लागतात. हे चित्र वेळीच बदलावे असेही त्यांनी नमूद करत “आम्ही भाषणं देण्यासाठी इथं जमलेलो नाही. चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही. मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत. म्हणून हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात, हिंदू म्हणून आपल्या धर्माचं कसं रक्षण करणार आहात हे आज ठरवण्याची गरज आहे,” असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.आक्रमण हाच सर्व श्रेष्ठ बचाव असतो असे नमूद करत राणे यांनी नगरमध्ये एका हिंदू मुलाने एका मुस्लीम तरुणीशी लग्न केलं. त्यानंतर तिकडच्या सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन त्या मुलाला ठेचून काढलं. कारण तो मुलगा हिंदू होता. ते लोक धरणं देत बसली नाही, टोप्या घालत घोषणा देत बसली नाही. घरात माता-भगिणी सुरक्षित नसतील तर तुम्हाला जय श्रीराम म्हणण्याचा आणि भगव गमछा घालण्याचा काय अधिकार आहे?” असा अंतर्मख करणारे प्रतिपादन हि त्यांनी केले.
निव्वळ हिंदू म्हणून एकत्र याच राणेंची साद “विविध भेदा पलीकडे जाऊन हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे नितेश राणे पाहून घेईल. मी तुम्हाला शब्द देतो. कारण तिथं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून बसले आहेत हे लक्षात ठेवा. एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत.त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका. फक्त हिंदू समाज म्हणून भीती निर्माण करणं गरजेचं आहे,” असंही साद आमदार नितेश राणें यांनी घातली.
या नंतर राजवाडा पोलीस स्थानकात शिष्टमंडळासह जाऊन त्यांनी गेली सोळा दिवस बेपत्ता असलेल्या हिंदू अल्पवयीन मुलीच्या शोधा संदर्भात सर्वाना आक्रमकपणे धारेवर धरत जाब विचारला आणि त्यांनी गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळासह जाऊन या प्रकरणी प्रशासनाने युद्धपातळीवर तपास करून वाढता सामाजिक तणाव कमी करावा असे आग्रहाने मागणी केली. या आंदोलनात मुकुंद भावे,महेश उरसाल,विद्या बनसोडे,वर्षा कुंभार,विवेक मंद्रुपकर,रवी मिसाळ,धनश्री तोडकर,सुजाता पाटील,माझी नगरसेविका माधुरी नकाते,प्रज्ञा मालकर,किशोरी स्वामी,सुलभा मुजुमदार,भारती जोशी, अवधुत भाटे,ओंकार खाडे, अशोक देसाई,मारुती भागोजी,गणेश देसाई,संदीप कुंभार,दिलीप मैत्रानी,प्रीतम यादव हिंदुराव शेळके,सुलोचना नार्वेकर,जयश्री वायचळ,दीपाली नार्वेकर,संपदा मुळेकर,पद्मीनी हार्डेकर यांच्या सहा विविध पक्ष संघटना ,महिला बचत गट,आदींचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनाच्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर हे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाचे व्यापक आंदोलन ठरले.