वारकऱ्यांवर काळाचा घाला; करवीर तालुक्यातील ७ वारकऱ्यांचा मृत्यू
कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील विठ्ठल भक्त मंडळाच्या वतीने पायी दिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ आज सायंकाळच्या सात वाजता एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहेत.अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. वारकऱ्यांना धडक देणाऱ्या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवाशी आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जठारवाडी गाव शोकसागरात बुडालंय. काही ग्रामस्थ अपघाताची माहिती मिळताच सांगोल्या कडे रवाना झाले आहेत.
मयत खालीलप्रमाणे
शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार,
गौरव पवार, सरामराव श्रीपती जाधव
, सुनिता सुभाष काटे,शांताबाई सुभाष जाधव, रंजना बळवंत जाधव
सर्व राहणार जठारवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर
हे सर्व ग्रामीण रूग्णालय सांगोला येथे आहेत.
जखमी खालीलप्रमाणे आहेत.
अनिता गोपीनाथ जगदाळे वय ६०,
अनिता सरदार जाधव वय ५५,सरिता अरुण सीयेकर वय ४५,शानुताई विलास सीयेकर वय ३५,सुभाष केशव काटे वय ६७ इत्यादी जखमी असून त्यापैकी सांगोला तालुक्यातील गावडे रुग्णालय येथे १ व ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे २ असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत.तसेच पंढरपूर लाईफलाईन येथे २ शिफ्ट केले आहेत.