Saturday, December 21, 2024
Home ताज्या शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य नवरात्र...

शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य नवरात्र उत्सव होणार साजरा

शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य नवरात्र उत्सव होणार साजरा

कोल्हापूर /प्रतिनिधी : साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणून करवीर काशी म्हणजेच कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी आई अंबाबाई साऱ्या देशात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक यावेळी दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ‘शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य व सर्वात मोठा नवरात्र उत्सव साजरा होणार आहे अशी माहिती आयोजिका पूनम राकेश (गणेश) काटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरवर्षी हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. पण कोरोनानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव साजरा होत आहे. त्यामध्ये नवरात्रातील नऊ दिवस भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. यामध्ये २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मारुती मंदिर चौक , शाहुपुरी, पाचवी गल्ली येथे स्टॅंडिंग लाईट शो, ॲडव्हान्स शार्पी, ॲडव्हान्स एलईडी, एलईडी वॉल, डीजे, स्मोक, लेजर आधुनिक लाईट शो, करवीर ढोल पथक तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये देवी मूर्ती आगमन सोहळा, मूर्ती प्रतिष्ठापना, रास दांडिया, श्रीसूक्त पठण, कुंकूमार्चन सोहळा, नवचंडी महायज्ञ सोहळा, माता पायपूजन सोहळा,विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मुलींसाठी दांडिया स्पर्धा, लहान मुलामुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दररोज रात्री साडे आठ वाजता आरती व राष्ट्रगीत असणार आहे.
भागातील महिला मुलींसाठी रोज रास दांडिया, स्पोर्ट गेम्स आणि रोज लकी ड्रॉ मध्ये मानाची साडी आणि उल्लेखनीय सहभागासाठी हॉटेल चे फॅमिली पास मिळवण्याचा मान महिला वर्गाला मिळणार आहे. तसेच २५ सप्टेंबर २०२२ आणि ४ ऑक्टोबर २०२२ च्या लकी ड्रॉ मधील विजेत्यास दोन व्यक्तींसाठी कोल्हापूर तिरुपती विमान तिकीट मोफत मिळण्याची संधी उपलब्ध असणार आहे. देवी मूर्ती उद्घाटन कार्यक्रमास सौ. मधुरिमाराजे छत्रपती आणि आमदार जयश्री चंद्रकांत जाधव तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ.श्वेता पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न होईल. तरी सर्वात मोठा भव्य नवरात्र उत्सव साजरा करणारे शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळ हे एकमेव मंडळ आहे. तरी या उत्सवांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस कीर्ती खाडे, स्वाती चोरगे, पूजा आरेकर, अर्चना मेढे, सुजाता नलवडे, ललिता शिंदे आदी उपस्थित होते.

Previous articleविश्वची फिलीपिन्समधील एमबीबीएसच्या शिक्षणासाठी बॅच रवाना
Next articleआदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने मंजुळा जाधव सन्मानित कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मंजुळा जाधव यांना इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे (इम्सा) आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक यांच्या प्रमुख उपस्थित मंजुळा जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंजुळा जाधव म्हणाल्या, सिम्बॉलिकचे गीता पाटील व गणपतराव पाटील यांनी दाखवलेला विश्वास, सर्व सहकारी शिक्षकांनी दिलेली साथ यांच्यामुळेच चांगल्या पद्धतीने काम करता आले. या कामाची दखल घेत इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनने हा पुरस्कार दिला. मला मिळाला हा सन्मान फक्त माझा नसून संपूर्ण सिम्बॉलिकच्या टीमचा आहे. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नायकुडे, क्रेडोच्या सीईओ मृदुला श्रीधर आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments