Thursday, December 26, 2024
Home ताज्या डेक्कन स्पोर्ट्स क्लब आजोजित पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला होणार,मॅरेथॉनची तयारी...

डेक्कन स्पोर्ट्स क्लब आजोजित पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला होणार,मॅरेथॉनची तयारी पूर्ण

डेक्कन स्पोर्ट्स क्लब आजोजित पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला होणार,मॅरेथॉनची तयारी पूर्ण

२७ ऑगस्टला सहभागी स्पर्धकांना किटचे केले जाणार वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर या करवीर नगरीतील ऐतिहासिक पन्हाळा या ठिकाणी कोल्हापूरकरांसाठी देश विदेशातील स्पर्धकांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लब व शांतिनिकेतन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित “पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन” ही स्पर्धा येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे.या स्पर्धेची स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून दिल्ली, लातूर,सोलापूर,हुबळी,धारवाड,बेळगाव, नाशिक,सांगली,विटा अशा विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी नाव नोंदणी केलेली आहे. एकूण १५०० स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे.अशी माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागठिळक, उदय पाटील,आयर्नमॅन वैभव बेळगावकर,राजीव लिंग्रस,समीर चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राख असा संदेश मॅरेथॉन मधून दिला जाणार आहे.                    या स्पर्धेचे उदघाटन हे रविवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मालोजीराजे छत्रपती,जिल्हाधिकारी राहुल रेखावर,डी.वाय पाटील मेडिकल कॉलेजचे संजय. डी. पाटील,पोलीस अधीक्षक. श्री शैलेश बलकवडे,आम.विनय कोरे यांच्या हस्ते होणार आहे.शिवाय या मॅरेथॉनमध्ये २५ शासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत.

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर असे आहे

स्पर्धा ही सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. ही मॅरेथॉन २१,११ व ५ किलोमीटर अंतराची असून यातील २१ किलोमीटर स्पर्धा ही सकाळी ६ वाजता तबक उद्यान पन्हाळा येथून सूरु होणार आहे. ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा, वाघबीळ,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,लता मंगेशकर बंगला,पावनगड, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,जाधव बंगला, सज्जाकोटी परत तबक उद्यान येथे समाप्त अशी होणार आहे.
तर ११ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन ही तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,लता मंगेशकर बंगला, पावनगड,बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान समाप्त होणार आहे.आणि ५ तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान अशी होणार आहे.

मॅरेथॉनचे वयोगट असे आहेत

या हाफ मॅरेथॉन मधील ५ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये १३ वर्षांपासून पुढील वय व ११ किलोमीटरची मॅरेथॉन ही १६ वर्षांपासून पुढील वय आणि २१.१किलोमीटरची मॅरेथॉन ही १८ वर्षांपासून पुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे.

सहभागी सर्व स्पर्धकांना मिळणार किट

दिनांक २७ ऑगस्ट २०२२ रोजी शांतीनिकेतन स्कुल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत स्पर्घेमघ्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना किट दिले जाणार आहे.जवळजवळ दोन हजार स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना गुडी बॅग,टी. शर्ट, फीनीशर मेडल,टाईम चिप (११ किलोमीटर व २१.१ किलोमीटर स्पर्धकांसाठी )ई – सर्टिफिकेट नाश्ता आदी दिले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी एकूण ७५ व्हॅालेंटीयर्स मॅरेथॉन मार्गावर कार्यरत असणार आहेत.डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे राजीव लिंग्रस,अभिषेक मोहिते,जयेश कदम,अश्कीन आजरेकर,अमर धामणे,अतुल पोवार,मनीष सूर्यवंशी,संजय चव्हाण,वैभव बेळगावकर,उदय पाटील ,समीर चौगुले,अँड.अनुजा मेहेंदळे,मधुकर बिरंजे आदी पदाधिकारी उपस्थित होते. वरील सर्वजन स्पर्धेचे संयोजन करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments