Monday, July 15, 2024
Home ताज्या प्रसिद्ध हल्दीराम यांच्या स्वीट पदार्थाना कोल्हापूरमधील ग्राहकांचा प्रतिसाद मिळणार - श्रीमंत छत्रपती...

प्रसिद्ध हल्दीराम यांच्या स्वीट पदार्थाना कोल्हापूरमधील ग्राहकांचा प्रतिसाद मिळणार – श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

प्रसिद्ध हल्दीराम यांच्या स्वीट पदार्थाना कोल्हापूरमधील ग्राहकांचा प्रतिसाद मिळणार – श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

हल्दीरामच्या कोल्हापूरमधील स्वीट मिठाई शॉपीचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते उदघाटन

भारतातील प्रमुख शहरांबरोबर आता कोल्हापूरमध्ये हल्दीराम दाखल

हल्दीरामच्या विविध उत्पादनाची चव आता कोल्हापूरमध्ये चाखायला मिळणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या हल्दीराम यांच्या स्वीट पदार्थाना ग्राहकांचा कोल्हापूर मध्ये चांगला प्रतिसाद मिळणार आहे. असे उदगार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी काढले.कोल्हापूरमध्ये पुणे – बेंगलोर हायवेवर हल्दीराम यांच्या नवीन स्वीट मिठाई शॉपीचे उदघाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाले.यावेळी हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​ संचालक नीरज अग्रवाल,राजवर्धन निगडे,यशराज निगडे,जयेश कदम,राजीव लिंग्रस यांच्यासह विविध मान्यवर यांची उपस्थिती होती.१९३७ साली सुरू झालेल्या हल्दीराम या छोट्याश्या दुकानाचा विस्तार आता जगभरात झाला असून कोल्हापूर मध्येही आता हल्दीरामने पाऊल टाकले आहे.ग्राहकांच्या आवडीच्या बंगाली, गुजराथी यासह विविध ठिकाणच्या जवळजवळ ५०० हुन अधिक स्वीट पदार्थ व मिठाई हल्दीरामने उपलब्ध करून दिल्या आहेत. कोल्हापूरच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
कोल्हापूरचे लोक हे खाण्याला अधिक महत्व देतात.म्हणूनच आम्ही हल्दीरामचे विविध स्वीट पदार्थ कोल्हापूरकरांसाठी घेऊन आलो आहे.ज्यात बंगाली मिठाई,छोले बटोले हेही असणार आहे असे हल्दीरामचे ओनर नीरज अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अग्रवाल यांनी यावेळी बोलताना आता गणेशोत्सव, दसरा आणि दिपावली सणही आले आहेत या सणांच्या कालावधीत माफक दरात आम्ही पदार्थ ग्राहकांना देणार असल्याचेही सांगितले.शिवाय कोल्हापूर हे हेरिटेज शहर मंदिरे, सुंदर ठिकाणे आणि येथील पाककृती यासाठी व मिसळ, भेळ, भडंग आणि लोकप्रिय गुळासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. या शहरात, अधिक चव वाढवण्यासाठी हल्दीरामचे पहिले आउटलेट आले आहे.
हल्दीराम हे स्नॅक्स, मिठाई, मसालेदार पदार्थांसह संपूर्ण भारतातील घरोघरी आवडते आहे. हे शुद्धता, ताजेपणासह परंपरेची चव पकडते आणि अत्यंत गुणवत्ताही.कोल्हापुरातील नवीन हल्दीरामचे आउटलेट हे भारतातील प्रमुख शहरांमधील हल्दीरामच्या इतर आउटलेटमध्ये आणखी एक यशस्वी भर पडेल येथे, कोल्हापुरातील लोकांना उबदार आणि स्वागतार्ह वातावरणात चविष्ट पौष्टिक शाकाहारी पदार्थ चाखायला मिळतील असा विश्वास यावेळी हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​ संचालक नीरज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.कुटुंब असो, मित्र असोत किंवा कार्यालयातील सहकारी असोत, नवीन हल्दीरामच्या आउटलेटमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी ऑफर ही असणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments