Thursday, December 26, 2024
Home ताज्या बालकामगार विरोधी मोहिमेत आढळलेली ३३ बालके मूळ राज्यात परतली

बालकामगार विरोधी मोहिमेत आढळलेली ३३ बालके मूळ राज्यात परतली

बालकामगार विरोधी मोहिमेत आढळलेली ३३ बालके मूळ राज्यात परतली

रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले विशेष प्रयत्न

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांची माहिती

कोल्हापूर, दि. १८ (जिमाका) : बाल कामगार शोध मोहीमेत आढळून आलेल्या 33 बालकांना पश्चिम बंगाल व ओडीसा राज्यातील त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. या ३३ बालकांना मूळगावी पाठवण्यासाठी तिकिटे उपलब्ध होत नसताना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून राखीव कोट्यातून तिकीट उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे या बालकांना आपापल्या गावी जलदगतीने पाठविणे शक्य झाले.
बालमजुरी निर्मुलनासाठी असलेल्या बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियमानुसार बालकामगार विरोधी कृतीदल धाडसत्र बैठक घेण्यात आली होती, या बैठकीत जिल्हा बाल कामगार विरोधी कृतीदलाने जिल्ह्यात बालकामगार शोध मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या होत्या. यानुसार प्रियदर्शनी पॉलीसॅक्स व महालक्ष्मी पॅकिंग, शिरोली येथे टाकण्यात आलेल्या धाडीत १२३ बाल कामगार आढळून आले होते. बाल कल्याण समितीने बालकांचे प्रत्यक्ष अवलोकन करुन सर्वसाधारण १८ वर्षावरील ६४ बालकांना वयाची निश्चिती करुन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. तर उर्वरीत ५९ बालकांचे वय १८ वर्षाच्या आतील असण्याची शक्यता गृहित धरून त्यांना तात्पुरत्या निवारणासाठी बालगृहात दाखल केले होते. या ५९ बालकांचे शासकीय वैद्यकीय सेवेमार्फत वय निश्चित करण्यात आल्यानंतर १६ बालकांचे वय १८ वर्ष पूर्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांना कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले, तर १० बालकांना वयाचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
उर्वरित ३३ बालके पश्चिम बंगाल व ओरिसा येथील असल्याने ती पुन्हा बाल मजुरीच्या चक्रात अडकू नयेत , यासाठी त्यांना या राज्याच्या संबंधित मूळ जिल्ह्यातील बाल कल्याण समितीकडे पाठवून या समिती मार्फत पालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश कोल्हापूर बाल कल्याण समितीने दिले होते. यानुसार जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने योग्य नियोजन करुन २३ बालके पश्चिम मेदनापूर (पश्चिम बंगाल) तर ८ पूर्व मेदनापूर (पश्चिम बंगाल) व २ बालकांना ओरिसा राज्यातील बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आल्याचे शिल्पा पाटील यांनी सांगितले.यासाठी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले, बाल कल्याण समितीचे सदस्य शिल्पा सुतार, अश्विनी खाडे, पद्मजा गारे, संजय मुंगळे, तसेच संस्था अधिक्षक, भिमराव कांबळे, अवधूत घाटगे, अक्षय जगताप, रामचंद्र पाटील, काळजीवाहक, शशिकांत कामत, दत्तात्रय नाईक, स्वप्नील शिर्के, सुरेश लोहार, पोलीस अंमलदार तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments