Thursday, December 26, 2024
Home ताज्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती व वीज निर्मितीचा उच्चांक

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती व वीज निर्मितीचा उच्चांक

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती व वीज निर्मितीचा उच्चांक

डिस्टिलरी व कोजन हंगाम समाप्त

सेनापती कापशी/प्रतिनिधी :  बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती व वीज निर्मितीमध्ये उच्चांक निर्माण केला आहे, अशी माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. कारखान्याच्या या यशात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे, असेही ते म्हणाले.
कारखान्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांचा सत्कार झाला. यावेळी हंगाम समाप्ती निमित्त सत्यनारायणाची पूजाही बांधण्यात आली होती.
भाषणात श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कारखान्याचा डिस्टीलरी हंगाम ता. २० ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाला व हा हंगाम ता. १७ जुलै २०२२ रोजी समाप्त झाला. या २६० दिवसांमध्ये एकूण एक कोटी, चार लाख, ४० हजार लिटर इथेनॉल व १४ लाख, ८० हजार लिटर स्पिरिट उत्पादन असे एकूण उत्पादन १, १९, २१,००० लिटर्स होऊन एक उच्चांक निर्माण झाला. तसेच, सहवीज प्रकल्पामधून १९ कोटी, ५० लाख, ६८ हजार युनिट वीज हंगामामध्ये उत्पादित झाली. त्यापैकी, तीन कोटी, २४ लाख, ९३ हजार युनिट वीज कारखान्याला व डिस्टिलरी साठी वापरण्यात येऊन आठ कोटी, २७ लाख युनिट वीज महावितरणला निर्यात केली. हाही कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकच निर्माण केला आहे. पुढील हंगामामध्ये एक लाख केएलपीडी इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारवाढ करणार असून ज्यूसपासून इथेनॉल करण्याबाबतचे काम सुरू झाले आहे. पुढील हंगामामध्ये असेच उच्चांक निर्माण करण्याचे आवाहनही अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केले.यावेळी सर्व विभागप्रमुख प्रमुख अधिकारी, कर्मचारी व शेतकरी सभासद उपस्थित होते.
स्वागत संतोष मोरबाळे यांनी केले. जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी प्रास्ताविक केले. आभार मिलिंद पंडे यांनी मानले.बेलेवाडी काळम्मा ता. कागल – सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती व वीज निर्मितीमध्ये उच्चांक केल्याबद्दल अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचा सत्कार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments