Wednesday, January 15, 2025
Home ताज्या पूराचा सामना करण्यासाठी दक्ष रहा - आमदार जयश्री जाधव

पूराचा सामना करण्यासाठी दक्ष रहा – आमदार जयश्री जाधव

पूराचा सामना करण्यासाठी दक्ष रहा – आमदार जयश्री जाधव

पूरग्रस्त भागाचा दौरा – नागरिकांशी संवाद दिला दिलासा

कोल्हापूर /प्रतिनिधी : पूराची आपत्ती टाळता येत नसली तरी अशा आपत्तींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी असली तरी त्यावर मात करून जीवित व वित्तहानी टाळता येते. पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शहरातील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज आणि सतर्क आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, पूराचा सामना करण्यासाठी दक्ष रहावे असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.
संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका प्रशासनासह पूरग्रस्त भागाचा आज दौरा केला व नागरिकांशी संवाद साधत दिलासा दिला.बापट कॅम्प, जाधववाडी, साळोखे पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, वागळे मळा, रमण मळा परिसरास आमदार जाधव यांनी भेट दिली.
बापट कॅम्प येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याबरोबरच गणेशमुर्ती सुरक्षितस्थळी नेण्याची व्यवस्था करावी अशी सूचना आमदार जाधव यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. पूराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनाची वाट न पाहता स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
पूरग्रस्तांच्या स्थलांतरीत ठिकाणांची प्राथमिक सुविधा व आरोग्य सुविधासह पार्किंग व जनावरांची सोय करावी अशी सूचना आमदार जाधव यांनी महापालिका प्रशासनास दिले.आमदार जाधव म्हणाल्या, तमाम कोल्हापूर शहरवासीयांना विनंती आहे, कोणताही धाडसी निर्णय अथवा कृती करू नका. कोरोना व महापूराच्या संकटाचा सामना करताना प्रशासनाला सहकार्य करा.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे,अग्नीशमन दलप्रमुख तानाजी कवाळे आरोग्याधिकारी विजय पाटील यांच्यासह महापालिकेचे आरोग्य निरीक्षक मुकादम व कर्मचारी उपस्थित होते.याचबरोबर माजी नगरसेवक प्रकाश कुंभार, सागर तहसीलदार, पिंटू बोरपाडळेकर, उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव,मुकुंद खाडे, पंकज काटकर, नीलेश भोसले, मारुती कांबळे, अथर्व चौगुले, प्रदीप डकरे, संपत चौगुले, माजी नगरसेवक अर्जुन माने, राजाराम गायकवाड, संदीप ऊर्फ पप्पु सरनाईक, गणेश शिंदे, अँड. रवी जानकर, विशाल कांबळे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments