Thursday, December 26, 2024
Home ताज्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार दालन खुले

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार दालन खुले

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार दालन खुले

कोल्हापूर /प्रतिनिधी : बांधकाम क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा व घटकांची एकत्र माहिती देणाऱ्या क्रीडाई- कोल्हापूर आयोजित ‘ दालन २०२२ ‘ प्रदर्शनाचा प्रारंभ शाहूपुरी जिमखाना मैदानावर उद्या , शुक्रवारी सायंकाळी ६ वा . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे . अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ असतील खासदार संजय मंडलिक , संभाजीराजे छत्रपती आमदार पी . एन पाटील , ऋतुराज पाटील आदी उपस्थित असणार आहेत.
प्रदर्शनात १६० संस्था सहभागी होणार असून , यात वन बी एच के ते पेंट हाऊस , रो – बंगलो ते सेकंड होम पर्यंतच्या क्षेत्रातील व गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे . निकांसह सांगली , सातारा बेळगांव , कोकण , गोव्यातील नागरिकांसाठीही पर्वणी असेल खास कोल्हापुरी ते दाक्षिणात्य खाद्यपदार्थाच्या स्टॉलचीही मेजवानी आहे .या प्रदर्शनाचे प्लॅटिनम प्रायोजक महालक्ष्मी टीएमटी बार असून कजारिया टाईल्स व शिंडलर लिफ्टस् हे गोल्ड प्रायोजक आहेत . सहभागी बँकांसह वित्तीय संस्था ग्राहकांना कमी कागदपत्रात अर्थसहाय्य उपलब्ध करणार आहेत . नियोजनासाठी क्रीडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर , उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर , चेतन वसा , सचिव प्रदीप भारमल यांच्यासह खाजानिस गौतम परमार , दालन उपाध्यक्ष अजय डोईजड , सचिव सोमराज देशमुख , खजिनदार संदीप मिरजकर , श्रीधर कुलकर्णी , निखिल शहा , पवन जामदार , स्टॉल समिती प्रमुख संदीप पवार , जनसंपर्क समिती प्रमुख विक्रांत जाधव आदरातिथ्य समिती प्रमुख संग्राम दळवी , संग्राम पाटील , रवी माने , गंधार डिग्रजकर आदी कार्यरत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments