Tuesday, November 12, 2024
Home ताज्या गोकुळचे संस्‍थापक व शिल्‍पकार स्‍वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८४ वी जयंती   गोकुळमध्‍ये...

गोकुळचे संस्‍थापक व शिल्‍पकार स्‍वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८४ वी जयंती   गोकुळमध्‍ये साजरी

गोकुळचे संस्‍थापक व शिल्‍पकार स्‍वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८४ वी जयंती   गोकुळमध्‍ये साजरी

कोल्हापूर ता.०७ एप्रिल : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) चे संस्‍थापक व शिल्‍पकार  स्‍वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांची  ८४ वी जयंती कार्यक्रम संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे चेअरमन विश्वास पाटील, संचालक व अधिकारी यांच्‍या उपस्थित साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) म्‍हणाले की, गोकुळ दूध संघाच्‍या उभारणी व वाटचालीत स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे फार मोलाचे योगदान  आहे. १९६३ साली ७०० लिटर दूध संकलन सुरु झालेले गोकुळ दूध संघाचे आज १६ लाख लिटर दूध संकलन पार केले असून या सर्व गोकुळच्या प्रगती मध्ये स्वर्गीय चुयेकर साहेबांचे योगदान कदापि विसरता येणार नाही. त्यांची दूध उत्पादक शेतकऱ्याप्रती असणारी तळमळ हि आम्हाला वाखाणण्याजोगी होती. त्यांनी घेतलेले अनेक धाडसी निर्णयामुळे आज गोकुळ या यशोशिखरावर पोहचलेले आहे. ‘कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगावी धवल क्रांती निर्माण करून गोकुळच्या माध्यमातून ग्रामीण जीवन समृद्ध बनविले’.चुयेकर साहेबांच्या या आचार विचारावर गोकुळची  वाटचाल भविष्यात हि चालू राहिल.
यावेळी स्वर्गीय चुयेकर साहेबांना अभिवादन करून संघाचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर,अजित नरके,प्रकाश पाटील,अमरसिंह पाटील,बयाजी शेळके यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.पी.पाटील यांनी केले तर आभार संचालक बाबासाहेब चौगले यांनी मानले.याप्रसंगी गोकूळचे चेअरमन विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित  तायशेटे,अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, प्रशासन व्यवस्थापक डी.के.पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक यु.व्ही.मोगले, संघाचे आजी-माजी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी...

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त...

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर...

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे...

Recent Comments