केआयटी बायोटेकच्या दोन विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड प्रतीक पाटील आणि संदीप बेर्गल कोरोना लस उत्पादन विभागामध्ये रुजू
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील केआयटीच्या अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयामधील बायोटेक्नोलॉजी विभागाच्या प्रतीक पाटील आणि संदीप बेर्गल ह्या विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनी मध्ये निवड झाली. हे विद्यार्थी कोरोना लसीचे उत्पादन विभागामध्ये रुजू झाले. याबद्दलची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील कुलकर्णी , उपाध्यक्ष श्री साजिद हुदली तसेच सचिव श्री दीपक चौगुले ह्यांनी दिली.
सध्याच्या कोरोना काळात बायोटेक सेक्टर मधील संशोधनाचे महत्व कोरोना लसीमुळे सर्व जगासमोर आले. त्या निमित्ताने बायोटेक मधील कामाचे स्वरूप आणि कंपनी सर्व जगासमोर आल्या. बऱ्याच फार्मासुटिकल कंपनी कोरोना लसीचे उत्पादन करण्यातही पुढे आल्या आहेत. अश्या विविध कंपन्यांमध्ये बायोटेकनॉलॉजि इंजिनिर्स ची गरज असते. त्यामध्ये सध्या कोविशील्ड लसीमुळे चर्चेत असलेली कंपनी म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया.
ह्या सर्व प्लेसमेंट्स चे समन्वयन विभागाचे ट्रैनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक ऋतुपर्ण करकरे ह्यांनी केले. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये केआयटीचे डीन आणि ट्रैनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ अमित सरकार तसेच बायोटेक विभागप्रमुख डॉ पल्लवी पाटील आणि के आय टी चे प्रभारी संचालक आणि रजिस्ट्रार डॉ मनोज मुजुमदार ह्यांचे मार्गदर्शन लाभले. के आय टी च्या अध्यक्ष श्री सुनील कुलकर्णी , उपाध्यक्ष श्री साजिद हुदली तसेच सचिव श्री दीपक चौगुले ह्यांनी जॉब प्लेसमेंट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.