श्री ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्राचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश
कोल्हापूर/प्रतिनिधी : सांगली येथील शिवपार्वती सांस्कृतिक हॉल येथे झालेल्या ओपन राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कोल्हापुरातील गंगावेस येथील ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्राच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य व पाच कास्यपदक असे घवघवीत यश संपादन केले. या खेळाडूंना कराटे प्रशिक्षकांबरोबरच आई-वडिलांचे मार्गदर्शन मिळाले.विजेते खेळाडू असे – मुले – अब्दुल सनदी (सुवर्णपदक), ओम मुळे, वेदांत खाडे, शाहीद शेख (कास्यपदक), मुली – रिद्धी राजाध्यक्ष (सुवर्णपदक), साक्षी कवडे गवळी (रौप्यपदक), भक्ती कदम, सानिया (कास्यपदक).