Sunday, January 12, 2025
Home ताज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शासकीय योजनेचा थेट लाभ - आ. चंद्रकांत दादा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शासकीय योजनेचा थेट लाभ – आ. चंद्रकांत दादा पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शासकीय योजनेचा थेट लाभ –
आ. चंद्रकांत दादा पाटील

कोल्हापुर (प्रतिनिधी) : राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जनतेसाठी मंजूर केलेल्या निधीपैकी एक रुपयातील फक्त पंधरा पैसे थेट लाभार्थ्या पर्यंत पोहचायचे ,पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट निधी पोहचवण्याचा निर्णय घेऊन तो प्रभाविरीत्या आमलात आणला त्यामुळे केंद शासनाच्या विविध लाभकारी योजनांचा १०० टक्के थेट लाभ लाभार्थ्यांना झाला
भाजप सरकारचे हे लक्षणीय यश आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या राजारामपुरी मंडळ आणि साईक्स एक्सटेंशन विभागाच्या वतीने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतंर्गत लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव हे होते . भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे , जिल्हा सरचिटणीस विजय जाधव , अशोक देसाई ,भाजपा कोल्हापूर महानगर चिटणीस सुनील चव्हाण , भाजपच्या राजारामपुरी मंडळ महिला अध्यक्ष आघाडीच्या अध्यक्षा सुषमा गर्दे, कल्पना इंगवले , सौ संगीता देवकर , रेखा राजगुरू ,ज्येष्ठ उद्योजक अब्दूलमाजिद जमादार , भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आजम जमादार, भाजपचे महानगर चिटणीस सुनील सिंह चव्हाण भारतीय भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्च्यांचे जिल्हाध्यक्ष आजम जमादार ,सौ. जसमिन जमादार , दिलीप बॉंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला .
या कार्यक्रमात पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चापर्यंतच्या उपचाराची सुविधा करून देणाऱ्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या गोल्डन कार्डचे वाटप आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणार्थ योजनांची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी दिली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपच्या राजारामपुरी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र मुतगी , भाजपचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आजम जमादार, सौ . जसमिन जमादार , भाजपचे राजारामपुरी मंडळ चिटणीस अभिजित शिंदे , राजारामपुरी युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष ओंकार घाटगे , नाजीम अत्तार , सागर केंगारे ,नीता मकोटे, स्मिता गायकवाड , दीपाली दळवी , कविता निप्पानिकर , सौ. अमिना नदाफ , मीना मकोटे , झाकीर जमादार ,विद्या साळोखे , विद्या शेलार , भाग्यश्री ढवळे , सौ सायरा नदाफ , मुस्कान जमादार , छाया साळुंखे यांनी केले.

Previous articleराजाराम चौक मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला अटक कोल्हापूर/प्रतिनिधी : गणेशोत्सव काळात राजाराम चौक मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुयश उर्फ अरुण महेश हुक्केरी (रा.राजाराम चौक) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीचे सुमारे ६४ हजार ९०७ रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. गणेशोत्सव काळात टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने १५ सप्टेंबर रोजी रात्री चोरीला गेले होते. याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. आज राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने चोरणाऱ्या याच परिसरात राहणाऱ्या सुयश उर्फ अरुण हुक्केरी यांला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे ६४ हजार ९०७ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केलेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अजय गोडबोले, किशोर डोंगरे, विजय कारंडे, किरण गावडे, कुमार पोतद्दार, प्रदीप पवार, पांडुरंग पाटील यांनी मिळून केली आहे.
Next articleहे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे पळपुटे सरकार! भाजपचा ठाकरे सरकारवर ठपका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments