Saturday, December 21, 2024
Home ताज्या पावसामुळे कोसळलेले गरीब महिलेचे घर पुन्हा बांधून देत कृष्णराज महाडिक यांनी जपली...

पावसामुळे कोसळलेले गरीब महिलेचे घर पुन्हा बांधून देत कृष्णराज महाडिक यांनी जपली सामाजिक बांधिलकी

पावसामुळे कोसळलेले गरीब महिलेचे घर पुन्हा बांधून देत कृष्णराज महाडिक यांनी जपली सामाजिक बांधिलकी

कोल्हापूर/प्रतिनिधी : ऊन, वारा, पावसापासून बचाव करत, उभे राहीलेले वर्षानुवर्षाचे जुने घर मुसळधार पावसामुळे कोसळले आणि अगोदरच दारिद्रयाच्या खाईत सापडलेल्या त्या माऊलीवर जणू आभाळच कोसळले. दोन खोल्यांचे घर, त्यात गुडघाभर चिखल, अर्ध छत कोसळलेले, उर्वरीत कधी कोसळेल याचा नेम नाही, अशा अवस्थेत हताश आणि निराश झालेल्या त्या माऊलीला आधार दिला तो कृष्णराज महाडिक यांनी. कोल्हापुरातील उजळाईवाडी जकात नाक्याजवळ राहणार्‍या मंगल कानडे या महिलेचं पावसामुळं कोसळलेलं घर पुन्हा बांधून देवून, महाडिक यांनी सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाची परंपरा कायम राखलीय.मागील महिन्यात आलेल्या जोरदार पावसाने अनेकांच्या घरादाराचे मोठे नुकसान झाले. कोटयवधी रूपयांचे नुकसान झाले. या तडाख्यात अनेक गोरगरीबही सापडले. कोल्हापुरातील उजळाईवाडी इथल्या शाहू जकात नाक्याजवळ राहणार्‍या मंगल कानडे या महिलेचे जेमतेम दोन खोल्यांचे जुने घर, मोलमजुरी करून, मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरणार्‍या मंंगल कानडे यांच्यावर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडयात जणू आकाश कोसळले. मुसळधार पावसामुळे कानडे यांच्या घराचे छत कोसळले आणि त्यांनी उभा केलेला किडूक मिडूक संसारही अक्षरशः पाण्यातून वाहून गेला. घरामध्ये गुडघाभर चिखल झाला, दारिद्रयाने अगोदरच पिचलेल्या कानडे यांच्या घराची दुर्दशा पाहून अनेकजण हळहळले. कानडे यांच्या डोळयातील अश्रुंच्या धाराही थांबत नव्हत्या. राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर जायचे कुठे, अशी म्हण त्यांच्या बाबतीत सत्य ठरली होती. घरात अन्नधान्याचा कण नाही, डोक्यावर छप्पर नाही, अशा अवस्थेत हताश झालेल्या मंगल कानडे यांच्या मदतीसाठी कृष्णराज महाडिक धावून गेले. त्यांनी स्वखर्चानं ८ दिवसात मंगल कानडे यांचे घर पुन्हा बांधून दिले आणि त्यांच्या हक्काचा निवारा त्यांच्याकडे सुपुर्द केला. नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमध्ये  समाजाच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक घराण्याची परंपरा आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवत, समाजसेवेच्या कार्यात आणखी एक अध्याय यानिमित्ताने जोडला.

Previous articleमहापालिकेच्या पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनीक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद
Next articleराजाराम चौक मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला अटक कोल्हापूर/प्रतिनिधी : गणेशोत्सव काळात राजाराम चौक मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुयश उर्फ अरुण महेश हुक्केरी (रा.राजाराम चौक) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीचे सुमारे ६४ हजार ९०७ रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. गणेशोत्सव काळात टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने १५ सप्टेंबर रोजी रात्री चोरीला गेले होते. याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. आज राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने चोरणाऱ्या याच परिसरात राहणाऱ्या सुयश उर्फ अरुण हुक्केरी यांला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे ६४ हजार ९०७ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केलेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अजय गोडबोले, किशोर डोंगरे, विजय कारंडे, किरण गावडे, कुमार पोतद्दार, प्रदीप पवार, पांडुरंग पाटील यांनी मिळून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments