महापालिकेच्या पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनीक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद
कोल्हापूर/ प्रतिनिधी : महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास सार्वजनिक मंडळांनी प्रतिसाद देत २१८ मुर्ती पर्यावरणपुरक अर्पण केल्या. तर ८५९ मुर्ती सार्वजनिक मंडळांनी स्वत: इराणी खण येथे विर्सजीत केल्या. इराणी खण येथे अशा एकूण १०७७ मुर्ती पर्यावण पुरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास शहरातील अनेक मंडळांनी प्रतिसाद देवून गणेशमुर्ती अर्पण केल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे अभिनंदन करण्यात आले आहे.
यावेळी १०७७ सार्वजनिक गणेशमुर्त्या इराणीखण येथे विसर्जन करण्यात आल्या. त्यापैकी २१८ मुर्त्या अर्पण तर ८५९ गणेशमुर्त्या थेट इराणी खणीमध्ये विसर्जीत करण्यात आल्या. घरगुती १६४५ मुर्ती अर्पण करण्यात आल्या तर १७७ घरगुती मुर्ती नागरीकांनी स्वत: विर्सजीत केल्या. अशा चारही विभागीय कार्यालयअंतर्गत एकूण १८२२ घरगुती मुर्ती इराणी खण येथे पर्यावण पुरक विसर्जीत करण्यात आल्या.
विभागीय कार्यालय क्रं.१ गांधी मैदान अंतर्गत २३२ सार्वजनिक गणेशमुर्त्या इराणीखण येथे विसर्जन करण्यात आल्या. त्यापैकी १२ मुर्त्या अर्पण तर २२० गणेशमुर्त्या मंडळांनी स्वत: विर्सजीत केल्या. घरगुती ३४३ मुर्ती कृत्रिम कुंडामध्ये विसर्जीत करण्यात आल्या. विभागीय कार्यालय क्रं.२ छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत ३५९ सार्वजनिक गणेशमुर्त्या इराणीखण येथे विसर्जन करण्यात आल्या. त्यापैकी ५७ मुर्त्या अर्पण तर ३०२ गणेशमुर्त्या मंडळांनी स्वत: विर्सजीत केल्या. घरगुती २९२ मुर्ती कृत्रिम कुंडामध्ये विसर्जीत करण्यात आल्या. विभागीय कार्यालय क्रं.३ राजारामपूरी अंतर्गत २९२ सार्वजनिक गणेशमुर्त्या इराणीखण येथे विसर्जन करण्यात आल्या. त्यापैकी २६ मुर्त्या अर्पण तर २६६ गणेशमुर्त्या मंडळांनी स्वत: विर्सजीत केल्या. घरगुती ३६३ मुर्ती कृत्रिम कुंडामध्ये विसर्जीत करण्यात आल्या. विभागीय कार्यालय क्रं.४ ताराराणी मार्केट अंतर्गत १९४ सार्वजनिक गणेशमुर्त्या इराणीखण येथे विसर्जन करण्यात आल्या. यापैकी १२३ मुर्त्या अर्पण तर ७१ गणेशमुर्त्या मंडळांनी स्वत: विर्सजीत केल्या. घरगुती ३७४ मुर्ती कृत्रिम कुंडामध्येविसर्जीतकरण्यातआल्या.महापालिकेकडून सर्व विसर्जन ठिकाणी व विर्सजन मार्गावर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच रस्त्यांची डागडूजी करण्यात आली होती. अतिक्रमण व अडथळे हटविण्यात आले होते. तसेच विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग, वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले होते. इराणी खण येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून विर्सजन स्थळी तातडीने स्वच्छता करण्यात येत होती. याठिकाणी वैद्यकिय पथके नेमण्यात आली होती. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
आरोग्य विभागाकडून विर्सजन ठिकाणी आलेले ३० मे.टन. निर्माल्य डंपरद्वारे गोळा करण्यात आले. हे निर्माल्य वाशी येथे खत तयार करण्यासाठी एकटी संस्थेस महापलिकेच्यावतीने पोहच करण्यात आले. अवनि संस्थेमार्फ़त निर्माल्यांचे विलगीकरण करून खत करण्यात येत आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी विसर्जन व्यवस्थित पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा. आयुक्त विनायक औंधकर, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, वर्कशॉप अधिक्षक चेतन शिंदे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, केएमटीचे व विद्युत विभागाचे कर्मचारी, अग्निशमन जवान, व्हाईट आर्मीचे जवान, जिवन ज्योती रेक्यू फोर्स, मराठा कमंडो आदी उपस्थित होते.