Thursday, November 21, 2024
Home ताज्या ६३ वर्षाच्या महिलेने दोन्ही गुडघा बदलीच्या शस्त्रक्रियेनंतर ३,५०० किमी नर्मदा परिक्रमा पायी...

६३ वर्षाच्या महिलेने दोन्ही गुडघा बदलीच्या शस्त्रक्रियेनंतर ३,५०० किमी नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली

६३ वर्षाच्या महिलेने दोन्ही गुडघा बदलीच्या शस्त्रक्रियेनंतर ३,५०० किमी नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली

कोल्हापूर/प्रतिनिधी- आपल्याला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल आणि आपला ती गोष्ट साध्य करण्यावर विश्वास असेल तर ती गोष्ट आपण नकीच साध्य करतो. नर्मदा परिक्रमा पूर्ण करणे ही पवित्र अशी गोष्ट मानली जाते. नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यावर ती तीर्थयात्रा केल्याचे पुण्य देते. परंतु ३,५०० किमी प्रदक्षिणा पूर्ण करणे सर्वांना शक्य होत नाही यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. लोक जेव्हा नर्मदा परिक्रमा पूर्ण करतात तेव्हा त्यांना आपण विजयी झाल्याची भावना निर्माण होते. कल्पना करा अशी एक महिला आहे जी तिच्या वयाच्या साठीमध्ये आहे, जीची गुडघा बदलीची शस्त्रक्रिया झाली आहे अशी व्यक्ती जर ही खडतर परिक्रमा पूर्ण करत असेल तर विश्वास बसणार नाही परंतु सुलभा चंद्रकांत कुलकर्णी यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता हे दाखवून दिले.
६३ वर्षांच्या सुलभा चंद्रकांत कुलकर्णी या २००९ पासून गुडघेदुखीने त्रस्त होत्या रोजची दैनदिन जीवनातील कामे देखील करताना त्यांना त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांना गुडघा बदलीची शस्त्रक्रिया सांगितली होती परंतु त्या सरकारी कर्मचारी असल्याने आणि घरगुती कामामुळे त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार नव्हत्या. २०१५ मध्ये जेव्हा त्या सेवा निवृत्त झाल्या तेव्हा त्यांना गुडघेदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास जाणवू लागला म्हणून त्यांनी गुडघा बदलीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. साई श्री हॉस्पिटल येथे सुप्रसिद्ध रोबोटिक जॉईट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नीरज आडकर यांच्या नेतृत्वात सुलभा कुलकर्णी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
सुलभा यांच्या याच सकारात्मक विचारांमुळे त्यांनी गुडघा बदलीच्या शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांच्या आत राजस्थान, गिरनार आणि चार धामची यात्रा पूर्ण केली. तसेच त्यानी कारने प्रवास करून आपली नर्मदा परिक्रमा देखील पूर्ण केली. इतर प्रवाशां कडून प्रेरणा घेऊन त्यांनी दुसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण करण्याचे ठरविले. हे एक अवघड असे कार्य होते येथे तुमची शारीरिक तसेच मानसिक परीक्षा होते. २ नोहेंबर २०१९ ला त्या पुण्याहून निघाल्या आणि त्यांनी ५ नोव्हेंबर २०१९ ला नर्मदा परिक्रमा करण्यास सुरुवात केली. त्या दररोज सकाळी लवकर उठून चालण्यास सुरुवात करायच्या आणि संध्याकाळ होईपर्यंत जवळपास १५-३० किमी अंतर पार पाडायच्या. त्यानी आपली संपूर्ण नर्मदा परिक्रमा १९ मे २०२० पर्यंत पूर्ण केली.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ नीरज आडकर म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेच्या पद्धतीमध्ये प्रगती झाल्यामुळे रुग्णाला हॉस्पिटल मध्ये कमी वेळ राहावे लागते तसेच कमी वेळा मध्ये सांध्यांची चांगली हालचाल देखील करता येते. ज्यांना असे वाटते की शस्त्रक्रिये नंतर आपले आयुष्य संपले त्यांच्यासाठी सुलभा चंद्रकांत कुलकर्णी प्रेरणा आहेत . त्यांनी अनेकांना मार्ग दाखवला आहे. अखेर ‘जीवन म्हणजे गतिशीलता आणि गतिशीलता म्हणजे जीवन’होय.
यावेळी बोलताना सुलभा चंद्रकांत कुलकर्णी म्हणाल्या, “सर्व प्रथम मी डॉ नीरज आडकर आणि साईश्री हॉस्पिटल मधील सर्व टीमचे आभार मानते. संपूर्ण शस्त्रक्रिया पार पडे पर्यंत त्यांनी मला खूप सहकार्य केले. हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ हा अतिशय काळजी घेणारा आणि मनमिळाऊ आहे.” या सर्व बाबींमुळे त्यांना शत्रक्रिये दरम्यान व नंतर खूप मदत मिळाली व त्यांना त्यांचे जीवन परत मिळाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments