कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधीलकी जपणे गरजेचे
गांधीनगर/प्रतिनिधी : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधीलकी जपणे गरजेचे असल्याचे मत श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आशिष कदम यांनी व्यक्त केले . रिलायन्स फौंडेशन व श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन अन्नसेवा या उपक्रमाअंतर्गत धान्य किट वाटप प्रसंगी ते बोलत होते .
कोरोनमुळे संपूर्ण देशावरच संकट ओढवले असून अशा काळात एक सामाजिक जबाबदारी म्हणून रिलायन्स फौंडेशनच्यावतीने गरजू व्यक्तिना मदत व्हावी या हेतूने मिशन अन्नसेवा हा उपक्रम संपूर्ण देशभर सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हयात या उपक्रमासाठी श्री . चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ सहकार्य करीत असून आतापर्यंत कोल्हापूर शहरासह उपनगरातील सुमारे दोनशे कुटुबियांना सदरची मदत पोचविण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या काळात या दोन्ही सामाजीक संस्था मदत नाही कर्तव्य या भावनेने आपले कार्य करीत आहेत. आतापर्यंत सुमारे दोनशे कुटुबियांना या उपक्रमार्तंगत सहकार्य करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने आपली नोकरी गमावलेले कामगार, रस्त्यावर व्यवसाय कसणारे फेरीवाले, वॉचमन, , घरगुती मोलकरणी, तृतीयपंथी, गवंडी, सेंट्रीग कामगार, जेष्ठ नागरिक, बेघर यांचा समावेश आहे.
सुमारे एक हजार गरंजू पर्यत सदरची मदत पोचविण्याचे या संस्थांचे उद्दीष्ट असून भविष्यात इतर वर्गासाठी सहकार्य करण्याचा मानस असल्याचे आशिष कदम यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विनायक पाटील, राजेंद्र मकोटे, अनिल निगडे, विशाल फुले, रविंद्र कोमटी, जितेंद्र कुबडे, बाबा नेर्ले, राजेंद्र शिंदे, दिपक शिंदे, युवराज तिवले, सौरभ सावंत, सतीश हवालदार, विशाल पवार, राजू आडनाईक, निशांत सुतार, अमर देसाई यांचेसह अनेक सदस्य सध्या कार्यरत आहेत.