Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक कोल्हापूर/प्रतिनिधी : नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ देत कोल्हापूर जिल्हा…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे   कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यभरातून जोरदार विरोध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्या…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर कोल्हापूर/प्रतिनिधी : भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक, ज्येष्ठ…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिगमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा  …

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या काळात बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यतेलांमध्ये रिफायलिंग केमिकल…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा कोल्हापूर/प्रतिनिधी  : महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा आयुक्त…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्ट कारवाईचा…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक;…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसांच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान जयसिंगपूर/प्रतिनिधी : इचलकरंजी येथील लायन्स क्लबतर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने…

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक, ज्येष्ठ विचारवंत, राजकीय समीक्षक व निर्भिड पत्रकार विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी २८ मे रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृती चिन्ह, रोख पाच हजार रुपये, माधवराव बागल चरित्र प्रत असे पुरस्काराचे स्वरुप आहे.भाई माधरावजी बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ॲड अशोकराव साळुंखे, कार्याध्यक्ष टी.एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची माहिती दिली.
गुरुवारी २८ मे रोजी भाई माधवराव बागल यांची १३० वी जयंती आहे. शाहू मिल चौकातील भाई बागल यांच्या पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता भाई माधवराव बागल पुरस्काराचे वितरण होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजय चोरमारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.डॉ. चोरमारे यांचा वृत्तपत्रसृष्टीतील प्रदीर्घ अनुभव असून ते चौफेर लिखान करत आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या विषयांवर त्यांनी सडेतोड लिखान केले आहे. दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, दैनिक प्रहार, दैनिक महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात त्यांनी काम केले आहे. स्वतंत्र बाण्याचे महाराष्ट्र दिनमानचे ते संपादक आहेत. राजकीय, सामाजिक विषयावर ते निर्भिडपणे आपली मते व्यक्त करतात.
पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांना १९९२ पासून दरवर्षी पुरस्काराचे वितरण केले जाते. यापूर्वी कॉ.संतराम पाटील, चित्रकार गणपतराव वडणगेकर, प्रा. एन.डी.पाटील, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे, कॉ. यशवंत चव्हाण, दलितमित्र बापूसाहेब पाटील, पद्मश्री कुमार केतकर, क्रांतीसिंह नागनाथअण्णा नायकवडी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, निळू फुले, डॉ. आ.ह.साळुंखे, प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, पद्मश्री लक्षण माने, आचार्य शांतराम गरुड, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपुरकर, उल्का महाजन, शमशुद्दीन मुश्रीफ, किशोर बेडकीहाळ, पुष्पा भावे, डॉ. भारत पाटणकर, कॉ. आनंद मेणसे, प्रसाद कुलकर्णी, लोकमतचे वसंत भोसले, निरंजन टकले,आनंदराव बहिर्जी पाटील यांना आजवर बागल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

*डॉ. विजय संभाजी चोरमारे यांच्याविषयी*

विजय चोरमारे हे गेली चार दशके पत्रकारितेमध्ये आहेत. केसरी, सकाळ, लोकमत, प्रहार, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमधून वार्ताहरापासून संपादकापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्र दिनमान’ या यू ट्यूब आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत. राजकीय विश्लेषक म्हणून मराठी, हिंदीतील नामवंत वृत्तवाहिन्यांवरून आपली मते ठोसपणे व्यक्त करीत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे होत असताना पत्रकारितेमध्ये ठाम भूमिका घेऊन काम करणारे मोजके पत्रकार आहेत, त्यामध्ये विजय चोरमारे यांचा समावेश होतो. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेशी बांधिलकी मानून काम करणारे पत्रकार-साहित्यिक आणि कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तळागाळातील घटकांच्या, उपेक्षितांच्या लढयांना ते पाठबळ देण्यामध्ये अग्रेसर असतात. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून गेली वीस वर्षे या परिसरातील साहित्य चळवळ पुरोगामी विचारधारेने प्रवाही ठेवण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
त्यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित आहेत. भाई माधवराव बागल विद्यापीठासाठी त्यांनी ‘कोल्हापूरः आर्थिक प्रवाह’ ( नाना गद्रे स्मृतिग्रंथ) आणि ‘स्वातंत्र्योतर महाराष्ट्रातील परिवर्तन’ (बाबूराव धारवाडे गौरव ग्रंथ) या दोन ग्रंथांचे संपादन केले आहे. याशिवाय चार कवितासंग्रह, एक अनुवादित कवितासंग्रह प्रकाशित आहे. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’, ‘महाराष्ट्राचे राजकारणः नवे प्रवाह’, ‘शरद पवार आणि महाराष्ट्र हे संपादित ग्रंथ आहेत. ‘संभ्रमित काळाच्या नोंदी’ हे मोदीकाळातील घटनांच्या विश्लेषणाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. अभिनेते चंद्रकांत मांडरे, शाहीर पिराजीराव सरनाईक, डॉ. डी. वाय. पाटील आणि प्रा. एन. डी. पाटील यांच्या आत्मचरित्रांचे शब्दांकन करून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दस्तावेजीकरणाचे महत्त्वाचे काम केले आहे. ‘बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटाच्या विकासातील योगदान’ या विषयावर त्यांना सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची पीएच. डी. मिळाली आहे. पत्रकारितेसाठी तसेच कवितेसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार तसेच फेलोशिप मिळाल्या आहेत.

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिगमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : आधुनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून मानवतेची खरी सेवा आहे. परिचारिकांनी संवेदनशीलता, संयम आणि समर्पणाच्या भावनेतून कार्य करत समाजाच्या आरोग्यव्यवस्थेला बळ द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सौ.हसमत हवेरी यांनी केले.डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिग मध्ये मंगळवार, दि. १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
सौ. हसमत हवेरी यांनी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका मिस.फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या कार्याचा आढावा घेत परिचारिका क्षेत्रातील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले. परिचारिका या रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा असतात. कोविडसारख्या संकट काळात परिचारिकांनी जीवाची पर्वा न करता दिलेली सेवा संपूर्ण समाज कधीही विसरू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या.तसेच आजच्या काळात नर्सिंग क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध होत असून, विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक मूल्ये आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील सेवा-सुविधांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी काळानुरूप बदल स्वीकारत आधुनिक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. नर्सेसशिवाय कोणतेही हॉस्पिटल प्रभावीपणे चालू शकत नाही. उपचार प्रक्रियेतील त्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत, असे त्यांनी नमूद केले.प्राचार्य डॉ. उमारणी जे म्हणाल्या, नर्सेस केवळ रुग्णालयात सेवा देत नाहीत, तर देशनिर्मितीतही त्यांचा मोठा वाटा आहे. रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आज नर्सिंग क्षेत्र हे ‘व्हॅल्युएबल इन्व्हेस्टमेंट’ म्हणून उदयास येत आहे, असे सांगितले.
उपप्राचार्या एम. बिजापूर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी रेड रिबीन उपक्रमांतर्गत आयोजित रॅली, रोल प्ले आणि पोस्टर स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. सुनील आवटे, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच नर्सिंग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या काळात बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यतेलांमध्ये रिफायलिंग केमिकल प्रोसेसिंग आणि भेसळी बाबत ग्राहकांमध्ये चिंता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत संजीवनने ग्राहकांसाठी नैसर्गिक, शुद्ध आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून आपले प्रीमियम कुकिंग सादर केले आहे. अशी माहिती साई जीवन ऑइलचे सर्वेसर्वा उत्तम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रंजीत जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना उत्तम जाधव यांनी एक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या आमच्या संजीवन मध्ये आम्ही नैसर्गिक पद्धतीने मोहरी, डाळिंब,तीळ, जवस, सूर्यफूल, करडई, शेंगदाणा, आणि खोबऱ्यापासून खोबरेल तेल अशा विविध पद्धतीचे तेल तयार करत आहोत यासाठी लागणाऱ्या सर्व मशनरी या ठिकाणी आम्ही उभ्या केल्या असल्याचे सांगितले.
साईजीवन ऑइल हे नैसर्गिक हायड्रोलिक कोल्ड- प्रेस्ड तंत्रज्ञाने तयार केले जाते ज्यामुळे तेलातील नैसर्गिक पोषक घटक चव आणि सुगंध कायम राहतो कोणतेही रसायन कृत्रिम मिश्रण किंवा अनावश्यक प्रोसेसिंग न करता तयार केलेले हे तेल आज आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांची पहिली पसंती बनत असल्याचे उत्तम जाधव म्हणाले.
साईजीवन ऑईलची खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कोणतीही भेसळ किंवा मिश्रण नाही कोणतेही केमिकल वापरलेले नाही इतर तेलांच्या तुलनेत कमी वापरात अधिक चव आहे. नैसर्गिक विटामिन ई मुफा आणि पूफासारखे पोषक घटक यामध्ये आहेत. शिवाय शुद्ध स्वाद नैसर्गिक सुगंध आणि उत्तम कुकिंग अनुभव यात आहे.
आज ग्राहक केवळ तेल विकत घेत नाही तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची निवड करत आहेत, साईजीवन ऑइल हे शुद्धता विश्वास आणि आरोग्य यांचे प्रतीक आहे.आमचे ध्येय प्रत्येक घरापर्यंत नैसर्गिक आणि सुरक्षित तेल पोहोचणे हेच असल्याचे उत्तम जाधव म्हणाले.साईजीवन ऑइल महाराष्ट्रातील ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळवत असून येत्या काळात संपूर्ण राज्यभर वितरण,विस्तार आणि नेटवर्क अधिक मजबूत करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे उत्तम जाधव यांनी विश्वास व्यक्त केला.

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

कोल्हापूर/प्रतिनिधी  : महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी घेतला. यामध्ये अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग इमारत व भक्त निवास संकुल, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, हॉकी स्टेडियम, शाहू मिल येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक तसेच गाडी अड्डा पार्किंग व्यवस्था या ठिकाणी सध्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला.
हॉकी स्टेडियम येथे रंगरंगोटीची शिल्लक राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच किरकोळ राहिलेली सर्व कामे दर्जेदार पद्धतीने व लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अंबाबाई मंदिर परिसरात पार्किंगची कमतरता लक्षात घेता गाडी अड्डा येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था सुरू करण्यासाठी मंजूर निधीतून संरक्षक भिंत, कंपाउंड, सोलर लाईट, स्वच्छतागृह, काँक्रीटीकरण, बॅरिकेट्स, दिशादर्शक फलक तसेच पार्किंग मार्किंगचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांना दर्जेदार पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. शेंडा पार्क येथे महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूंना साजेशी हेरिटेज लूक असलेली उत्कृष्ट इमारतीचे डिझाईन तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. इमारतीला दगडी वास्तूचा आकर्षक लुक देण्याच्या सूचनाही दिल्या.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, नगररचना, प्रोजेक्ट व पाणीपुरवठा विभागासाठी मानधनावर घेण्यात येणारे अभियंते दर्जेदार घेतले जातील. या अभियंत्यांच्या भरती प्रक्रियेत गुणवत्ता व गुणवत्ता क्रमांकाच्या आधारेच निवड केली जाईल. यातील दर्जेदार अभियंते प्रकल्पांसाठी देऊ. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व अभियंत्यांच्या वॉर्डनिहाय स्वतंत्र बैठका घेऊन आढावा घेतला जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील तसेच कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे उपस्थित होते.

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्ट कारवाईचा इशारा

कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या अमृत १ व अमृत २ अंतर्गत पाणीपुरवठा योजना तसेच मलनिस्सारण योजनेच्या कामांचा आढावा आज आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली.या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी अमृत १ योजनेअंतर्गत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या. शहरातील १२ पाणीटाक्यांपैकी ९ टाक्यातून सध्या पाणीपुरवठा सुरू असून उर्वरित ३ टाक्यांचे टेस्टिंग सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच क्रॉस कनेक्शन चेंबर, चेनलिंक फेन्सिंग, कळंबा फिल्टर हाऊस येथील संप दुरुस्ती, पाइपलाइन खुदाईनंतरचे रोड रिस्टोरेशन आदी अपूर्ण कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ठेकेदारांनी मायक्रो प्लॅनिंग करून संभाव्य काम पूर्णत्वाच्या तारखांसह नियोजन सादर करावे, अन्यथा ब्लॅकलिस्टची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. टाक्यांच्या कंपाउंड वॉलच्या कामाचा लाईनआऊट सोमवारपर्यंत देण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र पथके वाढवून मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवावी, अशा सूचना दिल्या. अमृत १ योजनेतील प्रलंबीत कामाबाबत प्रशासकांनी नाराजी व्यक्त करत सोमवारपासून सर्व कामे सुरू झाली पाहिजेत, असे स्पष्ट केले. याबाबत पुन्हा एका महिन्यानंतर आढावा घेतला जाणार आहे. जुन्या पाच टाक्यांपैकी चार टाक्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून एका टाकीचे काम अद्याप अपूर्ण आहे. ते तात्काळ पुर्ण करावे.
मलनिस्सारण योजनेअंतर्गत ७८ कि.मी. ड्रेनेज लाईन पैकी ६८ कि.मी. काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी अडथळे नाहीत, तेथे तात्काळ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. दोन्ही योजनांची मुदत २०२० अखेरपर्यंत होती, मात्र अद्याप कामे अपूर्ण असल्याने विलंबाची कारणे विचारण्यात आली. काही ठिकाणी कामाचे स्वरूप व डिझाईन बदलणे, विद्युत खांब स्थलांतर आणि खाजगी जागामालकांचा विरोध यामुळे विलंब झाल्याचे जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुरेश पाटील, प्रज्ञा गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता मुरलीधर भोसले, सहाय्यक अभियंता योगेश उलपे, दास ऑफ शोर लिमिटेड मुंबई चे प्रतिनिधी इनामदार, कुलकर्णी, नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी मदने व शेट्टी उपस्थित होते.

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक; रखडलेल्या योजने विरोधात संताप

कोल्हापूर/प्रतिनिधी : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुधार गांधीनगर प्रादेशिक १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील विलंब, निकृष्ट कामे आणि सतत खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ ७ मे रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, कावळा नाका येथे भव्य धडक घागर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील करणार असून तेरा गावांतील जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
कणेरी जलशुद्धीकरण केंद्र येथे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना हाकलून लावल्यानंतर ग्रामस्थांचा रोष अधिकच तीव्र झाला आहे. चार वर्षांनंतरही केवळ सुमारे ५१ टक्केच काम पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उकरलेले रस्ते, वारंवार होणारी पाईपलाईन गळती आणि १०-११ दिवस पाणीपुरवठा बंद राहणे यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेली जुनी पाणीपुरवठा योजना देखील वारंवार बंद पडत असून गळती, मोटार पंप बिघाड आणि दुरुस्तीस विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे “नवीन योजना रखडली तरी चालेल; मात्र जुन्या योजनेतून तरी नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवावा,” अशी ठाम मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महिलांचा मोठा सहभाग

मोर्चात महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार असून अधिकाऱ्यांना घेराव घालणे अथवा ताळेबंदी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने कामे पूर्ण करून सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना

मुंबई/प्रतिनिधी : देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार व संशोधन केंद्र असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे निदान व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग प्रणाली (एपीटीएल) या तीन प्रगत यंत्रणांची यशस्वी स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या नव्या प्रणालींमुळे नमुन्यांचे अचूक लेबलिंग आणि बारकोडिंग स्वयंचलित पद्धतीने होणार असून, मानवी त्रुटी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी, निदान प्रक्रियेत अचूकता वाढणार असून रुग्णांच्या सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होईल. तसेच, रुग्णालयातील क्लिनिकल वर्कफ्लो अधिक सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे.विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये निदानातील अचूकता आणि वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. एपीटीएल प्रणालीमुळे नमुने हाताळण्यातील गोंधळ, विलंब आणि चुकीची ओळख यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील. त्यामुळे डॉक्टरांना अधिक विश्वासार्ह अहवाल मिळून उपचार प्रक्रियेत गती येईल.

जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवांकडे आणखी एक पाऊल

या उपक्रमामुळे रुग्णालयातील प्रयोगशाळा व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होऊन, जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांकडे आणखी एक पाऊल टाकले गेले आहे. सीएसआर च्या माध्यमातून अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांची उभारणी केल्याने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत होत आहे. या उपक्रमासाठी इंडियन ऑइल कंपनीने सहकार्य केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले.

निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “टाटा मेमोरियल रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक एपीटीएल प्रणालीमुळे निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि गती वाढणार आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची ही दिशा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. सीएसआर च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात होणारी ही गुंतवणूक भविष्यात अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी मोलाची ठरेल.”

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज बुधवार दि. सहा मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.याबाबत अधिक माहिती अशी, पुंगाव ता. राधानगरी येथील श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्था आणि गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल आणि आज अशी दोन दिवस सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने पुंगावच्या श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची याचिका मंजूर केली. या याचिकेवरच गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिले. तसेच; गोकुळच्या संचालकांनी महाराष्ट्र सरकारने जो कायदा बदललेला होता, त्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोकुळच्या संचालकांना उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागण्याची मुभा असल्याचे स्पष्ट केले. तसेच; या याचिकेच्या माध्यमातून संचालकांनी उपस्थित केलेले मुद्दे व हरकती न्यायास अनुसरून असल्याने त्यांचा विचार करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाला दिले आहेत.
काल व आज झालेल्या सुनावणीमध्ये गोकुळ दूध संघाच्या संचालकांच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. अभिषेक मनु सिंघवी, ॲड. आनंद लांडगे व ॲड. भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. वरिष्ठ वकील ॲड. मुकुल रोहतगी यांनी श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची बाजू मांडली. श्री महादेव दूध संस्थेच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. श्री. तळेकर तर महाराष्ट्र सरकारच्यावतीने ॲड. श्री. धर्माधिकारी यांनी काम पाहिले.

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

जयसिंगपूर/प्रतिनिधी : इचलकरंजी येथील लायन्स क्लबतर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना ‘लायन्स गौरव’ पुरस्कार २०२५-२६ प्रदान करण्यात आला.
उगार शुगर वर्क्स लि.चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सोहन शिरगावकर यांच्या हस्ते विनायक भोसले व पत्नी सौ संगीता भोसले यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री भोसले यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भोसले यांचे कुटुंबीय, घोडावत शैक्षणिक संकुलातील सहकारी उपस्थित होते. पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना श्री भोसले म्हणाले, उद्योगपती संजय घोडावत यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेली साथ यावरच आत्तापर्यंतचे कार्य करू शकलो आहे.आई-वडिलांचा आशीर्वाद, पत्नी सौ संगीता यांनी उचललेली घराची व मुलांची जबाबदारी, संस्थेतील सहकाऱ्यांची मदत यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेत काम करत असताना केवळ वरिष्ठ या भूमिकेत न राहता लीडर म्हणून कार्य करत असल्याचे समाधान व्यक्त केले.पुरस्कारामुळे औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत राहण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, एल निनोच्या व आय.ओ.डी.च्या प्रभावामुळे यावर्षीचा उन्हाळा लांबणार असल्याने व पर्जन्यमानामध्ये घट होणार असल्याने धरणातील उपलब्ध पाणी साठयाचा पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. परिणामी, काळम्मावाडी व शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणी उपसा मर्यादित ठेवणे आवश्यक झाले आहे. उपलब्ध पाणी साठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवण्यासाठी महानगरपालिकेने शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, दि. ३० एप्रिल २०२६ पासून शहरातील विविध भागांमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ए व बी वॉर्ड तसेच सलग्नीत भाग :

दिनांक ३० एप्रिल २०२६ पासून पुढे एक दिवस आड पुईखडी जलशुध्दीकेंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकर नगर, जरगनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजीपेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपिंग परिसर, शेंडापार्क टाकी परिसर, जवाहर नगर, वाय. पी. पोवार नगर, मिरजकर तिकटी आदी भागांमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा होईल.

ई वॉर्ड व सलग्नीत भाग :

दिनांक ३० एप्रिल २०२६ पासून पुढे एक दिवस आड कसबा जलशुध्दीकेंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, कसबा बावडा, रमणमळा, नागाळा पार्क, लाईन बाजार, हिम्मतबहाद्दुर, जाधववाडी, कारंडे मळा, ताराराणी पुतळा, न्यू शाहूपुरी, बसंत बहार टॉकीज परिसर, कलेक्टर कार्यालय, न्यू पॅलेस, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, बापट कॅम्प, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, महाडीक वसाहत, टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी (१ ते १३ वी गल्ली), मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीन पार्क, शाहूपुरी (१ ते ४ थी गल्ली), व्यापार पेठ आदी भागांचा समावेश आहे.

सी व डी वॉर्ड (दि. १ मे २०२६ पासून) :

दिनांक १ मे २०२६ पासून पुढे एक दिवस आड चंबुखडी जलशुध्दीकेंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, आझाद गल्ली, मटन मार्केट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी ५ ते ८ वी गल्ली, कामगार चाळ, सुभाष रोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, कुंभार गल्ली, भवानी मंडप, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी, महालक्ष्मी नगर, टेंभी रोड, सावित्रीबाई फुले दवाखाना, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब्रम्हेश्वर बाग, तटाकडील तालीम, चंद्रेश्वर, फुलेवाडी, रंकाळा टॉवर परिसर, शिवाजीपेठ (काही भाग), गुजरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोरले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी आदी भागांचा समावेश आहे.तरी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेच्या प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.