Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

Tile List

View All
माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​ याचिकाकर्त्या पुंगावच्या श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेचा इशारा अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणावर ठेवला ठपका…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन ​ अजित पवार यांची जयंती…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख -- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यात "एकात्मिक आरोग्यवर्धिनी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला तर भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी नागरी वस्तीत…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद   कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर महानगरपालिकेची आजची…

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची…

My Marathi देश पुणे प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

शासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण कोल्हापूर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले   भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण कागल/प्रतिनिधी : महात्मा…

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

तर भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी नागरी वस्तीत असू नये नगरसेवकांनी धरले प्रशासनाला धारेवर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारित मंजूर विकास योजनेतील कसबा करवीर रि.स.नं.६२५/१ व २ येथील खेळाचे मैदान वाचनालय व आरक्षण ऐवजी रहिवास विभागात बदल व्हावे या ऑफिस प्रस्तावावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये नगरसेवकांनी जोरदार चर्चा केली. नगरसेवकांनी हा विषय विरोध दर्शवत हाणून पाडला आणि यात कोणताही बदल न करता या ठिकाणी खेळाचे मैदान व वाचनालय असेच आरक्षण राहील असे जाहीर केले.सुमारे ९० गुंठे जागेची ७० कोटींची किंमत असताना हा प्रस्ताव लँड माफियांना लाभ देण्यासाठी आणला असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हायकोर्टाच्या आदेशाची भीती दाखवत प्रशासन सभागृहावर दबाव आणत असल्याचाही आरोप करण्यात आला. संबंधित वकील सभागृहात येऊन खुलासा करेपर्यंत निर्णय घेऊ नये, अशी भूमिका सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी घेतली. वकील समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्याने अखेर सद्यस्थिती कायम ठेवत वाचनालय आणि खेळाचे मैदान आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.१९८६ पासून प्रलंबित असलेल्या आरक्षणाबाबत टाऊन प्लॅनिंग विभागाने काय काम केले, असा सवाल उपस्थित करत २०२२ मधील प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
आज झालेल्या सभेमध्ये झूम प्रकल्पाच्या येथे भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी करणे या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले. आणि भटक्या कुत्र्यांचे शेल्टर नागरी वस्तीमध्ये न उभारता महानगरपालिकेच्या असणाऱ्या अधिकृत जागेवर उभारावे अशी मागणी जोर धरली.
कोल्हापूर महानगरपालिकेची आज पाचवी सर्व साधारण सभा राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये महापौर.सौ. रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेमध्ये विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
मुळात हा जागेचा विषय सभेमध्ये का काढला अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली.या सभेमध्ये नगरसेवकांनी म्हणजेच आदिल फरास, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर या सर्वांनी जागा आरक्षण असताना रहिवास विभागात केली जात असेल तर आरक्षण बदलाला आमचा विरोध कायम राहील असे ठणकावून सांगितले. महानगरपालिकेच्या ४० जागा वर्ग झालेल्या आहेत अशामध्ये टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट महानगरपालिकेला लुटत असल्याचा आरोप नगरसेवक जयंत पाटील यांनी केला. यामध्ये नियोजन करण्याची जबाबदारी या विभागाची आहे मात्र ते जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नगरसेवक जयंत पाटील यांनी केला मी आणि नगरसेवक विनायक फाळके शिवाजी विद्यापीठाच्या जागेसाठी पाच वेळा मुंबईला जाऊन आलो आहे मात्र एकाही अधिकाऱ्याने मुंबईला जाण्याचे धाडस केले नाही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. ही जागा टाऊन प्लॅनिंग विभागाच्या निष्क्रियतेमुळे हातून गेली असल्याचे जयंत पाटील म्हणाले यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदारीने काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा असे काँग्रेसचे गटनेते राजेश लाटकर यांनी सभेमध्ये सांगितले.
ज्या ज्या जागा महापालिकेच्या आहेत त्या सर्व जागांवर महानगरपालिकेचा बोर्ड लावा अशी मागणी लाटकर यांनी केली अधिकारी हायकोर्टाचे नाव घेऊन नगरसेवकांना पुढे करत आहेत अशा अनेक जागांबाबत योग्य भूमिका नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी घेतली असल्याचे आदिल फरास यांनी निदर्शनास आणून दिले आरक्षण हटवून वेगळे काहीतरी करणे ही भूमिका नेत्यांची नव्हती कोल्हापुरी क्रीडा नगरी आहे शाहू महाराजांनी याठिकाणी खेळांची मैदानी दिली आहेत त्या ठिकाणी वेगळा काहीतरी करण्याचा घाट घातला जात असेल तो आम्हाला कदापि मान्य नाही अशी भूमिका आदिल फरास यांनी घेतली.यावेळी सभेमध्ये नगरसेविका पूर्वा राणे यांनी लोकांचे मत विचारात न घेता रहिवास उभारणी केली जात असेल तर याचा निषेध करतो अशी भूमिका मांडली हा विषय सभागृहात का आणला असे म्हणत नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शारंगधर देशमुख यांनी अधिकारी दुकान चालविण्याचे काम करत असल्याचा आरोप केला
नगरसेविका स्वाती यवलुजे यांनी झूम प्रकल्पाच्या शेजारील जागेत भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभा राहत असेल तर त्यास मान्यता दिली जाणार नाही, या विषयावर बोलताना नगरसेवक अर्जुन माने यांनी बिगर वस्तीच्या ठिकाणी कुत्र्यांचे शेल्टर उभारावे असे सांगितले.लाटकर यांनी एक हजार कुत्र्यांचे शेल्टर तयार करा मात्र ते महानगरपालिकेच्या अधिकृत जागेवर असावे आणि नागरी वस्तीत असू नये असे सुचित केले या विषयावर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी नागरी वस्तीमध्ये कुत्र्यांचे शेल्टर असू नये असा सूर आहे. हलसवडे येथे कुत्र्यांची शेल्टर उभारण्यासाठी याआधी विचार झालेला आहे मात्र जागा निश्चिती झाली नाही असे स्पष्ट केले.कुत्र्यांचे शेल्टर कोल्हापूर शहरांमध्ये उभ्या करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत लवकरच बैठक लावली जाईल असे महापौरांनी यावेळी सांगितले. शिवाय महापौरांनी सुरुवातीलाच ‘ड’ वर्ग महापालिका ‘क’ वर्गात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगून स्मार्ट कोल्हापूरसाठी स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे घोषित केले आणि नगरसेवकांना इंदौरचा अभ्यास दौरा करण्याचे नियोजन केले जाणार आहे या अभ्यास दौऱ्याअंतर्गत त्या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाविषयी माहिती नगरसेवकांना होईल आणि त्या पद्धतीने कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये काही करता येईल का याचा विचार होईल असे सांगितले.
शिवसेना गटनेते प्रतिज्ञा उत्तुरे यांनी शहरात वैशिष्टपूर्ण कोणकोणते प्रोजेक्ट सुरु आहेत याची सभागृहात माहिती देण्याची माहिती मागितली. यावेळी प्रशासनाकडून आगामी महासभेपुर्वी याची लेखी माहिती सभागृहात द्यावी अशी महापौरांनी सूचना केली.याशिवाय, लाड समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी, तृतीयपंथीयांसाठी विशेष कोटा, तसेच दिव्यांग भवनाच्या जागी विरंगुळा पार्क उभारण्यास मंजुरी देण्यात आली. एकूणच, विविध मुद्द्यांवर प्रशासनावर टीका आणि जोरदार चर्चा होत आजची महासभा गाजली.
सभेच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका स्वर्गीय आशा भोसले आणि गौतम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर गौरी चौगुले, तेज पाटील, झिजा फराकटे, स्मिता सावंत आणि अथर्व जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड रजेवर असल्याने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी कामकाज पाहिले.
आजच्या सभेमध्ये माजी महापौर स्वाती यवलुजे, जयश्री चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका माधुरी नकाते, पूर्वा राणे, नेहा तेंडूलकर यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनाला धारेवर धरलं.

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्याकडून बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे सोमवार, दि.20 एप्रिल 2026 रोजी विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा अशुध्द / शुध्द जल व नागदेववाडी अशुद्ध जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा बंद राहणार असून या केंद्राकडील पाणी उपसा पूर्णपणे बंद रहाणार आहे. त्यामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असणारा चंबुखडी टाकीवरून वितरीत होणा-या भागामध्ये सोमवार, दि.20 एप्रिल 2026 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार, दि.21 एप्रिल 2026 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही. संपूर्ण सी डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवल क्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तरी या कालावधीत नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्याकडून बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे सोमवार, दि.२० एप्रिल २०२६ रोजी विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा अशुध्द / शुध्द जल व नागदेववाडी अशुद्ध जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा बंद राहणार असून या केंद्राकडील पाणी उपसा पूर्णपणे बंद रहाणार आहे. त्यामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असणारा चंबुखडी टाकीवरून वितरीत होणा-या भागामध्ये सोमवार, दि.२० एप्रिल २०२६ रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार, दि.२१ एप्रिल २०२६ रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही. संपूर्ण सी डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवल क्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी ५,६,७,८,  वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.तरी या कालावधीत नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर महानगरपालिकेची आजची स्थायी समिती सभा चांगलीच वादळी ठरली. आज झालेल्या स्थायी समिती सभेत ऐनवेळी विषय घुसविण्यात आले आणि त्यास विरोधी सोडून बाकीच्या सदस्यांनी मंजुरी दिली यात आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी ऐनवेळी विषय घुसवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत विरोधक सदस्यांनी स्थायी समिती सभापती आणि प्रशासनाचा निषेध नोंदवत सभात्याग केला. विशेष म्हणजे, विरोधक बाहेर पडल्यानंतर विषयपत्रिकेसह ऐनवेळी मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वराज्य संस्थापिका ताराराणी सभागृहात सातवी स्थायी समितीची सभा वादग्रस्त झाली.सभेमध्ये विषय पत्रिकेवरील रेसकोर्स नाका, टिंबर मार्केट येथील जीर्ण व धोकादायक झालेली कमान व जकात नाका इमारत निष्कासित करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला. तसेच नागरिक व ठेकेदारांकडून विविध कारणांसाठी जमा झालेल्या अनामत रक्कम परत करण्याबाबतचे प्रस्तावही स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. त्यानंतर स्थायी समिती मधील विरोधी पक्षाच्या सदस्यांशी कोणतेही चर्चा न करता सभापतीनी अचानक चार-पाच विषय घुसवण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी आलेल्या विषयांमध्ये सरस्वती गाळेधारकांना गाळे देणे, आरोग्य विभागासाठी जेसीबी, ट्रक्टर ट्राली यासह विविध उपकरण खरेदी करणे आणि तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल हे विषय घेण्यात आले. पण विरोधक सदस्यांनी या विषयावर अभ्यास करून पुढच्या सभेत मंजुरी घेवू असे सांगितले. मात्र, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी “ माझा आदेश आहे, सर्व विषय मंजूर करा” असा सभेमध्ये आदेश दिला. त्यामुळे विरोधक सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी सभात्याग केला. विशेष म्हणजे, विरोधक बाहेर पडल्यानंतर विषयपत्रिकेसह ऐनवेळी मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यावर माध्यमांशी बोलताना, आम्ही कोल्हापूरच्या विकासाच्या अजेंड्यावरील विषय आणले होते. मात्र विरोधी सदस्यांनी चर्चा न करता सभा त्याग केल्याचे सांगत सभापती शिराळे यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी विरोधक सदस्यांचा निषेध नोंदवला.
तर सभापती विशाल शिराळे हे नेमकं कोणाच्या हातचे बाहुले आहे. त्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीच शहराचे महत्वाचे विषय ऐनवेळी घुसवून मंजूर का केले. त्यांचा आम्ही निषेध करतोय असे काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तर ऐनवेळी आर्थिक बजेट असलेली विकास कामं अचानक सभेत आणुन त्यांना नेमकं काय हितसंबंध जपायचे आहेत असा करत आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सभापतींचा निषेध नोंदवला.
ऐनवेळच्या विषयांवर चर्चा व्हायला हवी. कोटीचे विषय आणून मंजूर करणाऱ्या सभापतींच्या मनमानी कारभाराचा नगरसेवक अमर समर्थ यांनी निषेध नोंदवला.तर पस्तीस लाख रुपये भाड्याचे टँकर घेण्यापेक्षा महापालिकेने स्वतः टँकर खरेदी करावेत अशी आमची भूमिका आहे.म्हणून आम्ही सभात्याग केला असे नगरसेवक प्रताप जाधव यांनी सांगितले.सभेत ऐनवेळचे विषय आणण्यापूर्वी गटनेत्यांच्या बरोबर चर्चा व्हायला हवी होती. पण असे न करता आमच्यावर विषय लादण्याचा प्रयत्न केल्यामुळे नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी निषेध नोंदवला.तर विरोधक सदस्य म्हणून आम्ही ऐनवेळी आलेल्या विषयांना अभ्यास केल्याशिवाय मंजुरी देऊ शकत नाही त्यामुळे आम्ही सभात्याग केल्याचे प्रवीण सोनवणे यांनी सांगितले.
एकूणच, ऐनवेळी विषय घुसवून मंजुरी घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा विरोधकांचा आरोप असून, पारदर्शक कामकाजाची मागणी करत त्यांनी सभात्याग केला. आता या वादाचे पडसाद पुढील होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उमटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची केली पाहणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार असून, खासगी कंत्राटदारांमार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी घेणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शासन निधीतून बांधण्यात आलेल्या चार नूतन बसस्थानकांच्या उद्घाटनासाठी मंत्री सरनाईक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छता गृह, उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि प्रवासी कक्षांची बारकाईने पाहणी केली. प्रवाशांशी थेट संवाद साधताना त्यांनी अवाजवी पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली. बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छता गृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत; त्यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
बस स्थानकावरील उपाहारगृहात गरजूंसाठी ३० रुपयांत चहा आणि नाश्ता देण्याची योजना कागदावरच असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही योजना २४ तासांत पूर्ववत करून त्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश त्यांनी दिले, अन्यथा संबंधित उपाहारगृह चालकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी एम. टी. तेगनमन्नी पेपर स्टॉललाही भेट दिली. स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या पाहणी दौऱ्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या (पुणे प्रदेश) प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी अनिल मेहतर यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छतेबाबत आणि विनाशुल्क सुविधांबाबत जर कोणी हलगर्जीपणा केला किंवा प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले, तर विभागीय परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

शासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

कोल्हापूर विभागाला १२० नवीन बसेसची घोषणा

कोल्हापूर विभागात गेल्या दोन वर्षांत २३ पैकी १७ बस स्थानकांचे नूतनीकरण पूर्ण, उर्वरीत स्थानकांना मंजुरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण व विस्तारित बसस्थानकांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऊन, वारा, पाऊस सहन करत एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी हे निवारे म्हणजे जणू आधारवड ठरणार आहेत. हे निवारे केवळ उभे राहणार नाहीत, तर ते २४ तास देखभालीखाली, सुसज्ज आणि सजीव असतील. त्याठिकाणी छोटेखानी कॅन्टीनची सुविधा असेल. त्यामुळे महिला बचत गट आणि तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.
आज झालेल्या उद्घाटन प्रसंगी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य परिवहन महामंडळाच्या (पुणे प्रदेश) प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी अनिल मेहत्तर, कोल्हापूर आरटीओ संजीव भोर, कार्यकारी अभियंता पुणे प्रदेश नागेश कुलकर्णी, विभाग नियंत्रक कोल्हापूर अभय देशमुख, विभागीय अभियंता कोल्हापूर सुरेश मोहिते यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना त्यांनी कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेस देण्याची घोषणा केली. यासह शासन आणि खाजगी संस्था यांनी एकत्र येऊन (PPP तत्त्वावर) जिल्ह्यातील सहा बसस्थानकांचा विकास केला जाणार आहे. जयसिंगपूर बसस्थानकाच्या पुढील विस्तारीकरणासाठी प्रवाशांच्या सोयीकरिता याच आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्याचेही जाहीर केले.कोल्हापूर विभागात एकूण २३ बस स्थानके आहेत आणि त्यापैकी तब्बल १७ बस स्थानकांचे नूतनीकरण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले. उर्वरित स्थानकांच्या आधुनिकीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात सर्व बसस्थानके नव्याने उभारलेला, अत्याधुनिक कोल्हापूर हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरणार आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

पीपीपी मॉडेल कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकावर राबवावे- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी परिवहन मंत्र्यांच्या कार्यकाळात या विभागासाठी चांगले काम झाल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक, महिलांना मोफत प्रवास हा चांगला निर्णय असल्याचे सांगितले. कर्मचारी, प्रवासी यांच्याबाबत चांगले निर्णय घेतले. त्यातून राज्यात एसटी फायद्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले. आता पीपीपी मॉडेल कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकावर राबवून बदल व्हावा, जिल्ह्याला नवीन गाड्या वाढवून मिळाव्यात, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आमदार चंद्रदीप नरके यांनी ७ एकर जागेत असणाऱ्या संभाजीनगर बस स्थानकावर ११७ बसेस ये-जा करतात त्यामुळे या ठिकाणी अधिक महत्व प्राप्त झाले असल्याचे सांगितले.

संभाजीनगर येथील बसस्थानकाचे उपकामासह नवीन बांधकाम अत्याधुनिक संकल्पनेतून पूर्ण

या प्रकल्पास २३ डिसेंबर २०२० रोजी ९ कोटी ८० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती, तर प्रत्यक्ष निविदा रक्कम ७ कोटी २० लाख इतकी आहे. एकूण २८,३०० चौ.मी. जागेपैकी १८१३ चौ.मी. क्षेत्रफळावर हे भव्य बसस्थानक साकारण्यात आले असून, प्रवाशांच्या सुलभतेसाठी येथे एकूण ११ फलाटांची सोय करण्यात आली आहे.या नूतन बसस्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विविध विभागांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रशस्त प्रवासी प्रतीक्षालाय, स्थानक प्रमुख कार्यालय, पास व आरक्षण कक्ष आणि ४ दुकान गाळ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मातांसाठी हिरकणी कक्ष आणि गरजूंसाठी स्वस्त दरात औषधे मिळण्यासाठी जनऔषधी केंद्राचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी, उपाहारगृह, पार्सल कार्यालय आणि पिण्याच्या पाण्याची दर्जेदार व्यवस्था येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाठार आणि पेठवडगाव येथे उत्साहात स्वागत

वाठार बसस्थानक येथे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांनी मंत्री सरनाईक यांचे स्वागत केले. यावेळी आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद सभापती शितल यादव, सरपंच सचिन कांबळे यांच्या उपस्थितीत फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. वाठार येथे ४ फलाट आणि ४०५ चौ.मी. क्षेत्रफळाचे आधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. त्यानंतर पेठवडगाव बसस्थानकावर नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. १.४४ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या या स्थानकात ५ सुसज्ज फलाट आणि ४७९ चौ.मी.चे प्रशस्त बांधकाम करण्यात आले असून, यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

जयसिंगपूर बसस्थानकासाठी अतिरिक्त निधीची घोषणा

जयसिंगपूर बसस्थानकाचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार यड्रावकर यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. नागरिकांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या भागात विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. जयसिंगपूर बसस्थानकाच्या विस्तारीकरणाची मागणी लक्षात घेता, त्यांनी अतिरिक्त दोन मजल्यांच्या कामाला मंजुरी दिली. तसेच याच वर्षी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले. जयसिंगपूरच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात आता एकूण ८ फलाट, १७ दुकान गाळे आणि पोलीस चौकी अशी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य शासन भविष्यातील गरजा ओळखून सर्वच बसस्थानकांचे आधुनिकीकरण करत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास दादा पाटील, जिल्हा परिषद सभापती श्रद्धाताई गायकवाड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ च्या सभापतीपदी अनुक्रमे वैभव अविनाश कुंभार, अनुराधा सचिन खेडकर, संजय मोहिते व विशाल शिवाजी चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. प्रभाग समिती क्रमांक १ गांधी मैदान, क्रमांक २ छत्रपती शिवाजी मार्केट, क्रमांक ३ राजारामपुरी जगदाळे हॉल आणि क्रमांक ४ छ. ताराराणी मार्केट या विभागीय कार्यालयांसाठी सभापती पदाकरिता प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.
बैठकीच्या प्रारंभी विभागीय कार्यालयनिहाय सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करून सर्व अर्ज वैध असल्याचे घोषित केले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. मात्र, एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने सर्व चारही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, महापौर सौ. रुपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, गटनेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते शारंगधर देशमुख, आदील फरास, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसचिव सुनिल बिद्रे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.

मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार

महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे “मानव हा सर्वात मोठा धर्म आहे” ही भूमिका. त्यांनी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. त्यांच्या लेखनात आणि कृतीतून सतत दिसून येते की, समाजातील अन्याय आणि विषमता दूर केल्याशिवाय खरी प्रगती होऊ शकत नाही. त्यांनी मांडलेली समतेची संकल्पना ही केवळ तात्त्विक नव्हती, तर ती प्रत्यक्ष कृतीतून साकारलेली होती.

शिक्षणाची ज्योत : अज्ञानातून मुक्तीचा मार्ग

महात्मा फुले यांनी घेतलेला सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्यांनी प्रथम स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि त्यानंतर १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनीही समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःला शिक्षणासाठी वाहून घेतले. शेण गोट्याचा मार सहन करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. जोतीबा आणि सावित्री या दांपत्याच्या त्या काळातील सामाजिक बंडामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली.त्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही त्यांनी मागे हटणे स्वीकारले नाही. शिक्षण हेच शोषणाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ही त्यांची धारणा होती. या कार्यातून त्यांनी समाजातील अज्ञानाची बेडी तोडण्याचा प्रयत्न केला.अविद्या हेच शोषणाचे मुख्य कारण आहे हे सांगताना त्यांनी समाजाला याबाबतचा कठोर संदेश दिला…

विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले…

अन्यायाविरुद्ध बंड

त्या काळातील समाज रुढी-परंपरांच्या कठोर बंधनात अडकलेला होता. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रीदास्य आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथांनी समाजाला जखडून ठेवले होते. महात्मा फुले यांनी या सर्व प्रथांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थळे उभारली, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या कृतीतून समाजातील महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळाली.

सत्यशोधकांचा मार्ग : समतेची संघटित चळवळ

सन १८७३ मध्ये त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद,अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध संघटित लढा उभारला. सत्यशोधक समाजाने समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. ज्यामध्ये सत्य, समता आणि बंधुता यांना केंद्रस्थानी ठेवले आहे.सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी एक समांतर विज्ञानवादी भूमिका समाजापुढे मांडली.तत्कालीन ब्राह्मण्यवादाला झुगारून नव्या चालीरीती समाजाला दिल्या.

शेतकऱ्यांचा आवाज : अन्यायाविरुद्धचा प्रहार

महात्मा फुले यांनी केवळ सामाजिकच नव्हे, तर आर्थिक विषमतेवरही भाष्य केले.त्यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाचे अत्यंत वास्तव चित्रण केले आहे. महसूल व्यवस्थेतील अन्याय, सावकारशाहीचे शोषण आणि प्रशासनातील दुर्लक्ष यावर त्यांनी कठोर टीका केली. शेतकरी हा समाजाचा कणा असूनही त्याचे जीवन दारिद्रयात का अडकले आहे, हा प्रश्न त्यांनी समाजासमोर उभा केला.

विचारांची शस्त्रे : लेखनातून घडवलेले परिवर्तन

महात्मा फुले हे केवळ कृतीशील समाजसुधारक नव्हते, तर प्रभावी लेखकही होते. “गुलामगिरी” या ग्रंथातून त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर प्रहार केला, तर “सार्वजनिक सत्यधर्म” मधून मानवतावादी धर्माची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य झाले. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट होते.याशिवाय त्यांनी गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न,सार्वजनिक सत्य धर्म,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा लिहून शिवरायांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख करून दिली.रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीची स्वच्छता केली.शिवाजी महाराजांच्या स्मृती पुनरुज्जीवनाच्या प्रारंभीच्या प्रयत्नांपैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांना मानले जाते.

सार्वजनिक जीवनातील योगदान

महात्मा फुले यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेच्या कार्यातून त्यांनी नागरी प्रश्नांवर काम केले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांनी ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधून सामाजिक प्रश्न मांडले आणि वंचित घटकांसाठी न्यायाची मागणी केली. शासन कोणतेही असो, ते न्याय्य आणि लोकहितकारी असले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती.हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी निवेदन सादर केले.सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला.

सामाजिक सुधारणा स्वीकारल्या

इंग्रजांच्या काही सामाजिक सुधारणांना स्वीकारताना त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक नीतीवर सडकून टीका केली. एवढेच काय इंग्रजांना समजेल अशा भाषेत त्यांनी त्याची उत्तरे दिली. कोणताही पहिला प्रयोग स्वतःच्या घरी, स्वतःच्या कुटुंबावर करून ‘बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले’, असा आदर्श त्यांनी समाजामध्ये निर्माण केला आहे. स्वतःच्या पत्नीला शिकवले. स्वतःची विहिर मागास वर्गीयांसाठी खुली केली. ब्राह्मण्यवादाचा आयुष्यभर विरोध करुनही त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.त्या मुलाचे आंतरजातीय लग्न लावून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. महात्मा जोतीबा फुले यांनी घेतलेले निर्णय अशा प्रकारे कायम प्रेरणादायी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह करणारे पहिले पालक ठरले आहेत. काळाची पावले ओळखून नवनव्या प्रयोगाद्वारे सामाजिक सुधारणा करण्यात भारतातल्या सर्व सामाजिक सुधारणा करणाऱ्या थोर पुरुषांमध्ये त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले वेगळे ठरले आहेत.

यशस्वी व्यावसायिक

सामाजिक कार्य, संघटना सुरु ठेवण्यासाठी आर्थिक स्त्रोत मजबूत असणे आवश्यक असते. त्यासाठी अंगी व्यावसायिक कसब बाळगणे खूप गरजेचे असते. संघटना, चळवळी, सुधारणांचा डोलारा चालविण्यासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी आदर्श पद्धतीने व्यवसाय करुन स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सोदाहरणासह मांडून ठेवले. त्यांनी कंत्राटदार म्हणून अतिशय उत्तमपणे काम केले. आजही त्यांच्या सहभागात तयार झालेल्या वास्तू प्रेरक आहेत. पूल, धरणे, कालवे या बांधकामात कंत्राटदार म्हणून त्यांनी काम केले.

आजच्या काळातील विचारांची प्रासंगिकता

महात्मा फुले यांच्या कार्याला दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही तितकीच आहे. शिक्षणातील विषमता, सामाजिक भेदभाव आणि स्त्रीसमानतेचे प्रश्न अद्यापही पूर्णतः संपलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार आणि आचरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास केल्यास समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेली दृष्टी मिळते.

ज्योतिराव परिवर्तनाची अखंड प्रेरणा

महात्मा ज्योतिराव फुले हे एक व्यक्तिमत्त्व नसून एक चळवळ, एक विचारधारा आणि एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या कार्यातून राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणा घेतली.त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्राला फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख प्राप्त झाली आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ आदर व्यक्त करणे नव्हे, तर त्या मूल्यांना आपल्या जीवनात रुजवण्याचा संकल्प करणे होय.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष समिती स्थापन केली असून वर्षभर महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याला साजेशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे.

प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर
9702858777

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण

कागल/प्रतिनिधी : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले.यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ऐतिहासिक गैबी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या पुतळ्यानाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, बच्चन कांबळे, रुपेश वाघमारे, अभिजित कांबळे, अंकुश कांबळे, सागर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.