Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

Thumbnail

View All
माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हयातील शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे   कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यभरातून जोरदार विरोध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन ​ अजित पवार यांची जयंती…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

माय मराठी

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी :…

माय मराठी

शक्तीपीठ विरोधात आज २३ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

शक्तीपीठ विरोधात आज २३ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या २३ फेब्रुवारीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात…

माय मराठी

कैलासगडची स्वारी मंदिराच्या६६ वा वर्धापनदिन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सत्यजित जाधव यांची माहिती

कैलासगडची स्वारी मंदिराच्या६६ वा वर्धापनदिन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सत्यजित जाधव यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठ, खासबाग येथील…

माय मराठी

कॅन्सरचे औषध देतो असे सांगून महिलेवर अत्याचार करणा-या आरोपीस अटक

कॅन्सरचे औषध देतो असे सांगून महिलेवर अत्याचार करणा-या आरोपीस अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनांक १६/०२/२०२६ रोजी…

माय मराठी

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला व्हिएतनाममधील परिषदेत‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला व्हिएतनाममधील परिषदेत‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’ तळसंदे /प्रतिनिधी : व्हिएतनाम येथे झालेल्या सातव्या आशिया…

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न अतिग्रे/कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने…

माय मराठी

काँग्रेसकडून देशाची होणारी बदनामी खपवून घेणार नाही: शिवसेनेचा इशारा

काँग्रेसकडून देशाची होणारी बदनामी खपवून घेणार नाही: शिवसेनेचा इशारा.. दिल्ली येथील ए आय इम्पॅक्ट समिट मध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा शिवसेनेकडून…

माय मराठी

डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेते

डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेते   कोल्हापूर/प्रतिनिधी : डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय…

माय मराठी

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ…

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

अतिग्रे/प्रतिनिधी : जे.ई.ई. मेन्स फेज -१ मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये संजय घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमी च्या अथर्व खोत याने ९९.९४ पर्सेटाईल गुण मिळवून अभुतपुर्व यश संपादन केले.संस्थेच्या सहिम पटवेगार (९९.८१) उपेंद्र तेलसंग (९९.८०) विवेक तोडकरी (९९.७९) अथर्व निर्वाणे (९९.७८), तनय दागा (९९.७६) पर्सेटाईल गुण मिळवून विद्यार्थ्यानी उल्लेखनीय कामगिरी केली . सहिम पटवेगार या विद्यार्थ्याला फिजिक्स या विषयामध्ये १०० पर्सेटाईल गुण मिळाले.
संस्थेच्या २२ विद्यार्थ्यानी ९९ पर्सेटाईल च्या वरती गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक श्री वासू सर यांनी अभिनंदन केले आहे. या प्रसंगी बोलतात ते म्हणाले की, सातत्य म्हणजेच यशाची गुरुकिल्ली आहे. योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

शक्तीपीठ विरोधात आज २३ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

शक्तीपीठ विरोधात आज २३ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या २३ फेब्रुवारीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या बैठकीत शनिवारी करण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील नेत्यांची ऑनलाईन झूम मीटिंग काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज पार पडली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुढे रेटण्यासाठी कृतिशील असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर बारा जिल्ह्यांतील शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठकीत २३ फेब्रुवारी रोजी राज्यभर जिल्हास्तरीय आंदोलन छेडण्याचा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत गोलमेज परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, गरज नसलेला शक्तीपीठ सरकारने करू नये, लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही भूमिका बदलल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गासाठीचा निधी सध्याच्या खड्डेमय रस्त्यांवर खर्च करावा, मोजणीला विरोध करावा आणि ग्रामसभांचे ठराव करावेत, असे आवाहन त्यांनी केले . २३ फेब्रुवारीला राज्यभर आंदोलन छेडणार असून विधिमंडळातही आम्ही ठाम भूमिका मांडू, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणी आणि लातूरमधील घटनेचा निषेध केला. कोणतेही नेतृत्व नसताना शेतकरी रस्त्यावर उतरले, यावरून शक्तीपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. काही जण गैरसमज पसरवत असून प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होणार असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. महामार्ग खाजगीकरणातून राबवला जात असून स्थानिकांना त्याचा फायदा होणार नाही, उलट २०-२५ फुट भरावामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल असे ते म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत सर्व संघटनांची बैठक घेऊन विधानसभेत आणि बाहेरही जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला. नाशिक ते अक्कलकोट दरम्यान प्रस्तावित महामार्गावर प्रचंड खर्च होणार असल्याचा आरोप करत, सरकारनं महामार्ग बंदचा निर्णय जाहीर करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार कैलास पाटील यांनी बाधित प्रत्येक गावातून ठाम विरोध व्हायला हवा, असे सांगत आतापर्यंतची भूमिका कायम ठेवण्याचं आवाहन केले.माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग महायुती सरकार राबवत असल्याचा आरोप करत कडाडून विरोध केला. करवीर तालुक्यातील अनेक गावे या मार्गामुळे प्रभावित होणार आहेत. लोकांचा रोष सरकारने लक्षात घ्यावा. ताकदीने मोठं आंदोलन उभे करून सरकारला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार राजेश पाटील यांनी बीडमधील घटनेचा निषेध करून चंदगड तालुक्यातील १० गावांमधून मार्ग जात असल्याने सुमारे ५०० एकर शेतजमीन बाधित होणार असून इको-सेंसिटिव्ह झोनमधूनही मार्ग नेला जात असल्याचा त्यांनी आरोप केला. हा प्रकल्प उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवला जात असल्याचा आरोप करत, गडहिंग्लज परिसरातून कडाडून विरोध करण्याचा इशारा दिला. महामार्ग रद्द करण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा पाठींबा राहील, असंही त्यांनी स्पष्ट केले.समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी परभणी येथील घटनेचा निषेध करत या शक्तीपीठ विरोधात मोठे आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. २३ फेब्रुवारी रोजीच्या आंदोलनाची दिशा त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी परभणीतील घटनेचा तीव्र निषेध केला. कोणतेही नेतृत्व नसताना महिला पुढं आल्या, हे महत्त्वाचं असल्याचं सांगत नोटीस दिल्याशिवाय शेतात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला. यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख,दिगंबर कांबळे,लातूरमधून अॅडव्होकेट गजेंद्र येळकर,बीडचे व्यंकटराव ढाकणे,नांदेडचे सुभाष मोरलवार व हिंगोलीचे बापूराव ढोरे यांनी सहभाग घेतला.धाराशिवचे संभाजी फरताडे यांनी आभार मानले.

*डॉ. संजय डी. पाटील: एक दूरदर्शी कुलपती!*

*डॉ. संजय डी. पाटील: एक दूरदर्शी कुलपती!

प्रा. रवी मा. सातपुते, तळसंदे

 

 

 वयाच्या फक्त अठराव्या वर्षात मा. डॉ. डी. वाय. पाटील साहेबांनी बावडा इंजिनीअरिंग कॉलेजची जबाबदारी मा. कुलपती यांच्याकडे दिली होती. नवीन जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पेलेल याची त्यांना पूर्ण खात्री होती. कारण जिद्द आणि चिकाटी हे दोन्ही पैलू व्यक्तिमत्वात झळकत होते. लहानपणापासूनच आई-वडिलांकडून स्व कर्तृत्वाचे धडे मिळाले होते. ध्येयवादी कर्माची उर्जा नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. हे सर्व एकत्र येऊन त्यातून जे काही निर्मित झालं ते नेत्रदीपक, अद्भूत आणि अलौकिक आहे.“डी. वाय. पाटील संस्था मोठी होण्यामागे फक्त माझे कष्ट नसून संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. सर्वांच्या सहकार्याने आणि शुभ आशीर्वादाने घडलेले आहे.” असे स्पष्ट मत डॉ. संजय डी. पाटील यांचे आहे. याचा उल्लेख करायला ते कधीच विसरत नाहीत. समूहाच्या सुरुवातीच्या काळात २००-३०० लोकं काम करत होती. आज हाच आकडा ४५०० च्या घरात गेलेला आहे. याचे सर्व श्रेय ते समूहातील सर्व लोकांना देतात. घराची आणि व्यवसायाची घडी बसवत असताना अनेक संकटे आली. कित्येकदा मन निराश झालं. पण आपल्याला यातून काहीही करून पुढे जायचं आहे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.   सध्या समूहाची धुरा अध्यक्ष तथा कुलपती सन्माननीय डॉ. संजय डी. पाटील सांभाळत आहेत. तसेच मा. उपाध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शक आणि छोटे बंधू मा.सतेज उर्फ बंटी डी. पाटील आहेत. “संजय-सतेज” म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी! मोठा भाऊ म्हणून वडीलधारा माणूस, मार्गदर्शक, गुरु आणि एक चांगला मित्र या सर्व भूमिका एकाच वेळीपार पाडत आलेले आहेत. व्यवसायापेक्षा शेतीत आवड असल्याने चांगल्या शेतीच्या शोधात असताना ‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ या उक्तीनुसार कोल्हापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर वाठार नजीक असलेल्या ‘तळसंदे’ गावात शेती घेतली. शेती घेणे मोठी गोष्ट नव्हती पण त्या जमिनीचा विकास करणं हेच खूप मोठं आश्वासन त्यांच्यापुढे आवासून उभं होतं. कारण, ही जमीन पक्क्या स्वरुपाची नव्हती. फक्त माळरान असल्याने सुपिकतेचा गंध देखील नव्हता. तसेच ही २०५ एकर जमीन कुणा एका मालकीची नव्हती.

अनेक लोकांना एकत्र आणून मनातील विचार पटवून देणं अवघड होतं. अगदी सुरुवातीच्या काळात या माळरानावर एक इंच देखील मातीचा थर पाहायला मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून शेकडो मातीचे ढीग ओतून हि उणीव दूर केली. गतकाळात याच खडकाळ माळाचे रुपांतर डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे मध्ये करून कृषी, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक क्षेत्रात खूप मोठा सकारात्मक बदल केला गेला. या ठिकाणी हजारों विद्यार्थ्यांचे भविष्य फुलताना दिसत आहे. हाच खडकाळ माळ आज प्रभावी शिक्षण, हजारों तरुणांच्या हाताला काम आणि शेकडो संसारांना हातभार लावत आहे. त्या काळात ‘तळसंदे’ च्या माळ रानावर ‘कृषी विज्ञान केंद्र’ उभारून पुढील काळात जागतिक दर्जाचे कृषी विद्यापीठ असाव अशी मनी मनीषा बाळगली. डॉ. पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार देखील देण्यात आले. शासनाच्या विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बघून ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आलं. डॉ. पाटील शेतीची सुरुवातीपासून त्याना आवड असल्याने त्यांनी हे शिवधनुष्य पेललं. १९९४ साली पाण्याचो सोय करून खडकाळ मातीला जीवित करण्याचं काम केलं. शेतीचे नवनवीन प्रयोग करून अशक्य गोष्टी शक्य केल्या. डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे खूप कमी काळात प्रसिद्धीस उतरल्याने महाराष्ट्रातील विविध भागातील लोक भेट देऊन मार्गदर्शन घेत आहेत. कुणी विचारही केला नसेल कि या जाग्यावर एक ‘कृषी विद्यापीठ’ उभा राहू शकतं. मा. कुलपती आठवणी सांगताना म्हणतात की, “ या सर्व गोष्टी सत्यात आणत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे”. पण मी थांबलो नाही. काम करत राहिलो; मार्ग मिळत गेला.” संपूर्ण राज्यभर पसरलेल्या समूहाचे सर्वेसर्वा असून देखील अंगी आहे कमालीची नम्रता!

डी. वाय. पाटील समूह दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात आपले अधिपत्य गाजवत आहे. जगाच्या पाठीवर कोल्हापूर जिल्हा ‘अतिथी आदरतिथ्य’ या बाबतीत नेहमीच पुढे असतो.. ‘अतिथो देवो भवं!’ या उक्तीला प्रमाण मानून पंचतारांकित ‘हॉटेल सयाजी’ची स्थापना करण्यात आली. इथं देखील जास्तीत जास्त तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा हाच ध्यास होता. जगाच्या सबंध भागातून येणाऱ्या अतिथी वर्गाला उत्तम सेवा देण्यात सयाजी कधीही मागे हटले नाही. हे सर्व घडत असताना ‘ऋणानुबंध’ हा निकष अग्रभागी होता. एका बाजूला प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत असताना समाजाप्रती असणारे ऋण अदा करण्यासाठी डी. वाय . पाटील प्रतिष्टानची (ट्रस्ट) स्थापना केली. लहान मुले ,तरुण, वृध्द या सर्वच वयोगटातील लोकांना कैक मार्गाने आधार देण्याचं काम प्रतिष्टान करत असते. कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांना मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी पुणे, मुंबई किंवा बेळगाव अशा ठिकाणी जावं लागायचं. समाजातील ही उणीव भरून काढण्यासाठी सन १९८९ साली कसबा बावडा, कोल्हापूर येथे ‘डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजची स्थापना केली. डॉक्टर आणि संशोधक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही संस्था निमित्त झाली. गेल्या तीन दशकात हजारों डॉक्टर्स या कॉलेजने घडवले. देशात आणि परदेशात संस्थेचे प्रतिनिधित्व करत आहेत. सन २००३ साली कोल्हापूर येथील कदमवाडी येथे ‘स्वार्थ आणि परमार्थ’ या दोन तत्वावर ८१० बेडचे सुसज्ज आणि अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले. मा. कुलपती यांचे योग्य व्यवस्थापन, अचूक मार्गदर्शन आणि भक्कम आधार यामुळे डी. वाय. पाटील हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर मानलं जातं. लाखो लोकांच्या जीवनात नव संजीवनी देण्याचं काम या हॉस्पिटलने करत आलेलं आहे. मेडिकल कॉलेज, कसबा बावडा सुरुवातीच्या काळात खूप तोटा सहन करावा लागला. या पडत्या काळात माझ्या लोकांनी मला आधार दिला म्हणूनच मी आज यशस्वीपणे उभा आहे. त्या सर्व व्यक्तींचे मानावे तितके आभार कमीच आहेत. आज देशाच्या विविध राज्यात आणि परदेशात आपले विद्यार्थी आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्यावेळेस आपल्या महाविद्यालायातून शिकून गेलेला विद्यार्थी खूप मोठं यश संपादन करतो त्याचवेळी काम करण्यास आणखी हुरूप येतो. आयुष्यात मोठं होण्यासाठी संयमी असणं किती गरजेची आहे याचं जीवंत उदाहरण म्हणून डॉ. पाटील यांच्याकडे पाहता येईल. विदेशी गाड्यांचा ताफा सोबत शेकडो ड्रायव्हर असताना देखील स्वतः गाडी चालवताना बहुतांश वेळा दिसत असतात. जगाच्या इतिहासात ज्या ज्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत. त्यांची कार्ये आणि वर्तन आपल्याला अचंबित करत असतात. एखाद्या कर्मचारी सोबत जिव्हाळ्याचे सबंध कसे असावेत याची कल्पना येते. यासाठी कष्ट आहेच पण सर्वात महत्वाची इथे नमूद करणं गरजेची आहे ती म्हणजे ज्या ज्या वेळी डॉ. संजय डी. पाटील आपल्या भाषणात समूहाचा उल्लेख करत असताना ‘माझा समूह’ न म्हणता ‘आपला समूह’, आपला ग्रुप, आपले कॉलेज, आपले हॉस्पिटल असाच उल्लेख करतात. परिणामी, समूहात काम करत असणाऱ्या लोकांना देखील आपुलकी वाटते, त्यांना समूह आपला वाटतो. डी. वाय. पाटील समूह एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे आपण सर्वजण सदस्य आहोत. या कुटुंबात कोणीही मोठा नाही, कोणीही लहान नाही. संस्थेत काम करत असताना संस्थापक म्हणून कायद्यावर बोट असतं; पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला प्रेरणेची शाबासकी नेहमीच मिळत असते. आपण सर्वजण समान आहोत. या सर्व गोष्टी त्यांच्या बोलण्यातून नेहमीच अनुभवण्यास मिळतात. आपल्या कुटुंबाबरोबरच डी. वाय. पाटील समूहाचा पालक म्हणून नेटाने जबाबदरी पेलत आहेत. शैक्षणिक , सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली कामाचा ठसा उमटवत आहेत.

फक्त आर्थिक पाठबळामुळे कित्त्येक विदयार्थी- विद्यार्थिनी अभियांत्रिकी शिक्षणापासून आज देखील वंचित आहेत. याला कायम स्वरूपी पर्याय म्हणून मा. चेअरमन यांच्या ‘सामाजिक तळमळ’ कल्पनेतून जन्मलेली ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ म्हणजे होतकरू आणि कष्टाळू विदयार्थ्यांना त्यांच्या कष्टाची मिळालेली पोच पावती म्हणावी लागेल. फक्त मेरीटला महत्व देऊन यासारख्या होतकरू विद्यार्थी वर्गाला, न्याय देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डी. वाय. पाटील समूहाचे मा. विश्वस्त आणि कोल्हापूर दक्षिणचे लाडके आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून ही करोडो रुपयांची स्कॉलरशिप सन २०२२ सालापासून चालू केली आहे. आज देखील डी. वाय. पाटील समूहाच्या इतिहासात ज्या-ज्या विद्यार्थ्यांना शिकायचं आहे, शिकण्याची इच्छा खूप आहे पण परिस्थिती आड येत असेल पैशाविना धाडस करता येत नाही. मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की माणुसकी आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची तळमळ पाहून अनेक विद्यार्थ्यांना फ्री मध्ये प्रवेश दिल्याचे दाखले संस्थेच्या इतिहासात आहेत. पण मा. अध्यक्ष यांच्याकडून या ‘निस्वार्थी’ गोष्टींचा उल्लेख देखील केला जात नाही कारण डॉ. संजय डी. पाटील यांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष पाहिला आहे. शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे. आपल्या कष्टाच्या सामर्थ्यावर एवढं सगळं साम्राज्य निर्माण करून देखील ‘पाटील’ कुटुंबातील प्रत्येक सदस्याने “Down to Earth” या सिद्धांताला कधीही फाटा दिलेला नाही. असामान्य व्यक्तिमत्वे असून देखील सामान्यच राहणे नेहमी पसंत केलं आहे. एक वेळ अशी होती की कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटीच्या समोरील चौकात उभारून विकलेल्या उसाच्या वाड्याच्या पेंड्या या सर्व गोष्ट आज देखील स्मरणात आहेत. त्यामुळे आपल्यामुळे कुणी वंचित राहता कामा नये याकडे जास्त लक्ष असतं. भूतकाळ विसरणारी मानसं भविष्यकाळ सोनेरी करूच शकत नाही. एकेकाळी बजाज कंपनीची M-AT दुचाकी ते करोडो रुपयांच्या गाड्या ताफ्यात आल्या तरी ‘माणूस’ मात्र बदलला नाही.

कैलासगडची स्वारी मंदिराच्या६६ वा वर्धापनदिन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सत्यजित जाधव यांची माहिती

कैलासगडची स्वारी मंदिराच्या६६ वा वर्धापनदिन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
अध्यक्ष सत्यजित जाधव यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठ, खासबाग येथील कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६६ वा वर्धापनदिन सोहळानिमित्त रविवार दिनांक २२ फेब्रुवारी ते सोमवार दिनांक ३ मार्च २०२६ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष व नगरसेवक सत्यजित जाधव आणि उपाध्यक्ष केशव पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६६ वा वर्धापनदिनानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी दि. २२ रोजी सायंकाळी सहा वाजता इस्कॉन नित्यानंद नगर संकीर्तन भक्तवृंद मंदिरच्या वतीने भगवद गीता पाठ कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे. सोमवारी दि. २३ पासून व ह.भ.प.रामचंद्र यादव महाराज यांचे कृपाशिर्वादाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. पारायणाची सांगता रविवार दि. १ मार्च रोजी काल्याचे किर्तन व प्रसाद वाटपाने होणार आहे.
सोमवारी ता. २ रोजी रात्री १० वा. शिवालय भजनी मंडळ यांचे भजन व मध्यरात्री १२ वा.रुद्र महाभिषेक व श्रींचे दर्शन आशीर्वाद धार्मिक विधीवत पुरोहितांच्या उपस्थितीत व भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच मंगळवार दि. ३ रोजी सकाळी ११ वाजता सत्यनारायण पूजा व प्रसाद वाटप आणि सायंकाळी ४.३० वा. मर्दानी खेळ व ५.३० वाजता पालखीचे सोहळ्यास सुरुवात होणार आहे. पालखी पूजन जगद्‌गुरु श्री श्री विद्या नृसिंह भारती शंकराचार्य महाराज (करवीर पीठ) यांच्या हस्ते व शिवसेना उपनेते माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शिवालय भजनी मंडळ यांचे भजन, धनगरी ढोल, झांजपथकाच्या गजरात पालखी सोहळा असून, पालखी समोर भव्य आतिषबाजी करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, निलांबरी साळोखे, माधुरी नकाते, जयश्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसाद वितरण सोहळा होणार आहे. स्वारींच्या आशिर्वादाने सर्व विश्वस्त व भागातील सर्व महिला व भक्तांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी महादेव महाराज यादव, सेक्रेटरी विलास गौड, श्रीमती पद्मावती बबेराव जाधव, वैष्णवी शिवाजी जाधव, मंदिराचे पुजारी विठ्ठलराव जाधव व गणेश भोसले, उदय कारंजकर, दीपक जाधव, मंजुश्री गोखले, अरुण आवटे, कुलदीप भोसले, अजित जाधव, रामचंद्र यादव, ओंकार जाधव, अशोक कांबळे, संतोष मोरे, रोहित कारंडे, कमलाकर भोसले, प्रदीप मराठे, राजू जाधव, आदी उपस्थित होते.

कॅन्सरचे औषध देतो असे सांगून महिलेवर अत्याचार करणा-या आरोपीस अटक

कॅन्सरचे औषध देतो असे सांगून महिलेवर अत्याचार करणा-या आरोपीस अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनांक १६/०२/२०२६ रोजी १५.३० वा ते १७.३० वा चे दरम्यान मुदतीत एक पिडीतेस तुझ्या बहिणीसाठी कॅन्सरचे औषध देतो असे सांगून कोल्हापूर शहरातील एका ठिकाणी बोलावून घेवून तिला कळंबा येथील एका लॉजिंगवर नेवून पिडीतेवर तीचे संमतीशिवाय, जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवून घडले प्रकाराबाबत कोणास काही सांगितलेस तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिलेने जुना राजवाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ७८/२०२६ बीएनएस ६४,६५ (१), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता. गुन्हा दाखल झालेपासून यातील निष्पन्न आरोपी प्रतिक मुळे रा.लक्ष्मीपूरी हा आपले अस्तित्व लपवून वावरत होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी गुन्हयातील आरोपीस सत्वर अटक करणेच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिलेल्या होत्या. त्यास अनुसरुन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन केले होते.सदर आरोपीचा सर्वत्र शोध सुरु असताना आरोपी प्रतिक मुळे हा पन्हाळा ते बोरपाडळी रोडवर येणार असलेची बातमी तपास पथकाला मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे प्रतिक चंद्रकांत मुळे वय ३८, रा.१७८४ सी वॉर्ड, लुगडी ओळ, लक्ष्मीपूरी, कोल्हापूर यास तावेत घेवून त्याचेकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने गुन्हयाचे कबूली दिलेली आहे. आरोपीस गुन्हयाचे पुढील तपास कामी जुना राजवाडा पोलीस ठाणेच्या ताबेत देणेत आलेले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, युवराज पाटील, अरुण धनगर यांचे पथकाने केलेली आहे.

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला व्हिएतनाममधील परिषदेत‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला
व्हिएतनाममधील परिषदेत‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’

तळसंदे /प्रतिनिधी : व्हिएतनाम येथे झालेल्या सातव्या आशिया युवा शिखर परिषदेत डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला ‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.व्हिएतनामच्या हो ची मिन्ह सिटीमध्ये
१ ते ४ फेब्रुवारी दरम्यान ‘कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे जागतिक परिवर्तन : तंत्रज्ञान, शिक्षण आणि व्यक्ती यांची सांगड’ या विषयावर सातवी आशिया युवा शिखर परिषद उत्साहात पार पडली. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारतातून केवळ तीन प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती आणि त्यामध्ये शोएब घोडीमार याचा समावेश होता.आशिया खंडातील विविध देशांतील युवा प्रतिनिधी, विद्यार्थी, संशोधक, उद्योजक आणि शैक्षणिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शिक्षण, उद्योग, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि सामाजिक विकास क्षेत्रात जागतिक स्तरावर परिवर्तन कसे घडवून आणता येईल, यावर सखोल व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा आणि सादरीकरणे घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी युवकांना नवकल्पना, नेतृत्वगुण, जागतिक सहकार्य आणि शाश्वत विकास याबाबत मार्गदर्शन केले.या परिषदेत शोएब घोडीमार याने ‘ह्युम्यानिटी सेंटर्ड ए आय’ हा प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाची प्रभावी मांडणी आणि सामाजिक उपयुक्तता याची दखल घेऊन ‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.या उल्लेखनीय यशामुळे डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शैक्षणिक कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. या परिषदेकरिता संस्थेमार्फत त्यांना अंशतः आर्थिक सहाय्य देण्यात आले होते.टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. उमेश पाटील आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. शोएब तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले.या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी शोएब घोडीमार यांचे अभिनंदन केले.

 

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

अतिग्रे/कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा  अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.या कार्यशाळेत एकूण २६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध विभागांतील ३० संघांनी आपापली समस्या निवेदने (प्रॉब्लेम स्टेटमेंट) शॉर्टलिस्ट करून त्यांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता आणि सामाजिक भान यांचे उत्कृष्ट दर्शन या सादरीकरणांतून घडले. कार्यशाळेची सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण झाली.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधीर एम. अराळी,  सीईओ, के आय टी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, कोल्हापूर  यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारणीची संकल्पना, समस्या ओळख व त्यावर उपाययोजना, व्यवसाय मॉडेल कॅनव्हास, निधी संधी आणि नवउद्योजकतेतील आव्हाने याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे व्हा” असा प्रेरणादायी संदेश दिला.कार्यशाळेचे अध्यक्ष  इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी प्रमुख मार्गदर्शकांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्टार्टअप व इनोव्हेशनचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन आणि संस्थेच्या हब उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेचे संयोजन इन्स्टिट्यूटच्या EDP & TBI सेलतर्फे करण्यात आले. सेलचे प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली  प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा.  रईसा मुल्ला, प्रा. वंदना शहा तसेच अभियांत्रिकी डिप्लोमा तृतीय वर्षातील सर्व विभागांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेची प्रेरणा निर्माण करणारी ठरली असून भविष्यातील यशस्वी स्टार्टअप्सची पायाभरणी यामधून होईल, अशी भावना आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सुहाना चौगले हिने केले, तर प्रा. अजय कोंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संजय घोडावत विद्यापीठ चे चेअरमन संजय घोडावत तसेच विश्वस्त विनायक भोसले यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसकडून देशाची होणारी बदनामी खपवून घेणार नाही: शिवसेनेचा इशारा

काँग्रेसकडून देशाची होणारी बदनामी खपवून घेणार नाही:
शिवसेनेचा इशारा..

दिल्ली येथील ए आय इम्पॅक्ट समिट मध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा शिवसेनेकडून निषेध..

कोल्हापूर/प्रतिनिधी :दिल्ली येथे सुरु असलेल्या एआय इम्पॅक्ट समीट येथे जाऊन युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी देशाची जागतिक प्रतिमा मलिन करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नाचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध करत असे प्रकार करणाऱ्या देश विरोधी कृतीचा निषेध करण्यात आला.          “राहुल गांधी कोण रे पायताण मारा दोन रे”, देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो अशा घोषणानी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडण्यात आला. यानंतर गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होत असताना तसेच भविष्य काळाचा विचार करून एआय इम्पॅक्ट समिट भारतात होत असताना आणि जागतिक पातळीवर या समेटचं कौतुक करण्यासाठी जगभरातून प्रतिनिधी आलेले असताना अशाप्रकारे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करणे, ही देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असून याचा निषेध करत असल्याचे सांगितले.
तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास गाठ शिवसेनेशी आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
आंदोलनात शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव,जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, उपमहापौर अक्षय जरग,जिल्हा समन्व्यक सत्यजित कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख,अजय इंगवले,अश्किन अजरेकर,सत्यजित जाधव,अभिजीत खतकर, वैभव मोरे, नगरसेविका सौ. मंगल साळोखे, सौ. प्राजक्ता जाधव,श्रीमती अनुराधा खेडकर, सौ. कौसर बागवान, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले,किशोर घाडगे,तुकाराम साळोखे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष दिपक चव्हाण,महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे,माजी नगरसेवक अजित मोरे,महिला आघाडीच्या श्रीमती पूजा भोर, सौ. पूजा कामते, सौ. गौरी माळदकर, सौ. भोपळे,युवतीसेना शहरप्रमुख सौ. नम्रता भोसले,धनाजी दळवी, गजानन भुर्के,अंकुश निपाणीकर,सुशील भांदीगरे, सुनिल देशपांडे,राकेश पोवार, मंदार तपकीरे,नेपोलीयन सोनुले,शिवतेज खराडे,रणजित मंडलिक, अर्जुन आंबी,युवासेनेचे मंदार पाटील,कपिल पोवार,मंगेश चितारे,वैभव मोरे,सौरभ कुलकर्णी, विपुल भंडारे,जयदीप सरवदे आदी.

डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेते

डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेते

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेसिडेंट कप’ क्रिकेट स्पर्धेत पुरुष गटात डी वाय पाटील हॉस्पिटल तर महिला गटात डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाना सन्मानित करण्यात आले.                                                           डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २०१८ पासून प्रोजेक्ट टीमकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रकाशझोतात खेळविण्यात असलेल्या या स्पर्धेत यंदा पुरुष गटात डी. वाय पाटील ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या एकूण २८ संघांनी तर महिला गटात ८ संघानी सहभाग घेतला होता.बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष गटात डी. वाय. पाटील हॉस्पिटल संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अजिंक्यतारा संघावर विजय मिळवत विजेतेपद मिळवले. अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ षटकात तीन विकेट गमावत ८३ धावा केल्या. त्यानंतर अजिंक्यतारा संघाला चार बाद ६० या धावसंख्येवर हॉस्पिटल संघाने अजिंक्यपद मिळवले. २ षटकात ८ धावा देऊन ३ गाडी बाद करणाऱ्या अमर त्रिपाठी यांना ‘मॅन ऑफ द मॅच’, तर स्पर्धेत १३२ धावा करणाऱ्या व ५ गडी बाद करणाऱ्या ऋषिकेश पाटील यांना ‘मॅन ऑफ द सिरीज’ ने गौरविण्यात आले.                                        महिला गटात डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) संघाने विजेतेपद मिळवले. या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकात एक विकेट गमावत ५३ धावा केल्या. मात्र डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल संघ १ विकेट गमावून केवळ ४५ धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात २६ धावा व एक बळी मिळवणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तन्वी पाटील हिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ तर स्पर्धेत ६२ धावा करून ३ विकेट मिळवणारी मेडिकल हॉस्पिटल संघाच्या तृप्ती केसरकर यांना ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ किताब प्रदान करण्यात आला.विजेते, उपविजेते संघ व उत्कृष्ट खेळाडूंना डॉ. संजय डी पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.                                                       यावेळी उपस्थित मान्यवर व सर्व खेळाडूंनी डॉ. संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डी वाय पाटील आकुर्डीचे कॅम्पस संचालक अमित विक्रम, डॉ. सदानंद सबनीस, तानाजी जाधव, स्पोर्ट्स डायरेक्टर शंकर गोनुगडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख व खेळाडू उपस्थित होते.                                                  या स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी, एकोपा आणि क्रीडास्पर्धेची भावना अधिक दृढ होईल याचा विश्वास आहे. या पुढील काळातही अशा स्पर्धा सुरूच राहाव्या यासाठी आवश्यक ते पाठबळ देण्यात येईल अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवर व खेळाडूंनी डॉ. संजय डी. पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर, तळसंदे व आकुर्डीचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ६२ वा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी मोठी केली होती.

शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. संजय डी. पाटील आणि त्यांच्या स्नुषा डी. वाय. पाटील ग्रुपच्या अॅडव्हायझर सौ. पूजा ऋतुराज पाटील या दोघांचाही एकाच दिवशी वाढदिवस असल्याने कुटुंबीयांकडून वाढदिवस एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दोघानाही माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय. पाटील आणि सौ. शांतादेवी डी. पाटील यांनी डॉ. संजय डी. पाटील आणि सौ. पूजा ऋतुराज पाटील यांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, सत्यजित पाटील बेनाडीकर, अभिजित पाटील बेनाडीकर, अर्जुन व आर्यमन पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ. संजय डी. पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी आणि कदमवाडी येथील मेडिकल कॉलेज सभागृहात उपस्थिती लावली. यामध्ये माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, देवराज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. ए. एन. जाधव, उद्योजक दिलीप मोहिते, आनंद माने, प्रताप उर्फ भैय्या माने, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. मंजिरी मोरे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रताप पाटील, डॉ. सचिन पवार, डॉ. संदीप पाटील, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र घाटगे, सोहन शिरगावकर, दौलत देसाई, क्रीडाईचे अजय डोईजड, राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह कोल्हापूर महानगर पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, कॉंग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, श्रीराम सोसायटीचे उपसभापती सुभाष गदगडे व सर्व आजी माजी संचालक, शिवाजी विद्यापीठाचे अधिकारी, महालक्ष्मी मंदिर कर्मचारी, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप पाटील व संचालक, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. व्ही. व्ही. भोसले, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॅम्पसचे डायरेरेक्टर अमित विक्रम व प्राचार्य, सी.एच.आर. ओ. श्रीलेखा साटम, सीए. अमित गावडे, ऍड अजित पाटील, ऍड अभिषेक मिठारी यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विविध प्रसारमाध्यमांचे संपादक, अधिकारी, पत्रकार, शिक्षण, सहकार, राजकीय, सामाजिक व औद्योगिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी डॉ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे डॉ. पाटील व सौ. पूजा पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

दुर्मिळ माहिती संग्रह प्रदर्शन
डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकल कॉलेजच्यावतीने दुर्मिळ माहिती संग्रह प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले कोल्हापूरमधील विविध ठिकाणे, वैशिष्ट्ये याची माहिती देणारी कात्रणे मांडण्यात आली होती.

.