कॅन्सरचे औषध देतो असे सांगून महिलेवर अत्याचार करणा-या आरोपीस अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनांक १६/०२/२०२६ रोजी १५.३० वा ते १७.३० वा चे दरम्यान मुदतीत एक पिडीतेस तुझ्या बहिणीसाठी कॅन्सरचे औषध देतो असे सांगून कोल्हापूर शहरातील एका ठिकाणी बोलावून घेवून तिला कळंबा येथील एका लॉजिंगवर नेवून पिडीतेवर तीचे संमतीशिवाय, जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवून घडले प्रकाराबाबत कोणास काही सांगितलेस तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिलेने जुना राजवाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ७८/२०२६ बीएनएस ६४,६५ (१), ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता. गुन्हा दाखल झालेपासून यातील निष्पन्न आरोपी प्रतिक मुळे रा.लक्ष्मीपूरी हा आपले अस्तित्व लपवून वावरत होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी गुन्हयातील आरोपीस सत्वर अटक करणेच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिलेल्या होत्या. त्यास अनुसरुन पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन केले होते.सदर आरोपीचा सर्वत्र शोध सुरु असताना आरोपी प्रतिक मुळे हा पन्हाळा ते बोरपाडळी रोडवर येणार असलेची बातमी तपास पथकाला मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे प्रतिक चंद्रकांत मुळे वय ३८, रा.१७८४ सी वॉर्ड, लुगडी ओळ, लक्ष्मीपूरी, कोल्हापूर यास तावेत घेवून त्याचेकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने गुन्हयाचे कबूली दिलेली आहे. आरोपीस गुन्हयाचे पुढील तपास कामी जुना राजवाडा पोलीस ठाणेच्या ताबेत देणेत आलेले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, युवराज पाटील, अरुण धनगर यांचे पथकाने केलेली आहे.

