Monday, December 2, 2024
Home ताज्या गोकुळ दूध संघ हा नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील - आमदार सतेज...

गोकुळ दूध संघ हा नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील – आमदार सतेज उर्फ बंटी पाटील

गोकुळ दूध संघ हा नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील – आमदार सतेज उर्फ बंटी पाटील

“फर्टीमीन व फर्टीमीन प्लस” नवीन ५ किलो पॅकिंग व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचा शुभारंभ

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा ५ किलो पॅकिंग मधील विक्री शुभारंभ व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचे उद्घाटन माजी गृह राज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभहस्ते व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थित संपन्‍न झाले.या उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले कि, गोकुळ दूध संघ हा नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील असून पशुखाद्य हा दुग्ध व्यवसायाचा पाया असल्याने सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे ९० ते ९५ % लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे या भावनेतून सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेत आहोत. गोकुळ संघ मातृ संस्था असून दूध उत्पादकांच्या हितासाठी नवनवे उपक्रम राबवत असते उत्पादकांनी मागणी केलेले पशुखाद्य वेळेत पोहोच व्हावे यासाठी गोकुळने पशुखाद्य मागणीचे मोबाईल ॲप आजपासून सुरु केले आहे. या ॲप चा फायदा प्राथमिक दूध संस्थांना नक्कीच होईल व कामकाजात सुसूत्रता येईल असे मनोगत व्यक्त केले. यावेळी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमूडशिंगी व कागल एम.आय.डी.सी. येथे प्रतिदिनी ६०० टन इतके उत्पादन घेतल्यामुळे येथील कर्मचारी यांचे आमदार सतेज पाटील यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, फर्टीमीन व फर्टीमीन प्लस ५ किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध व्हावे अशी मागणी संपर्क सभे मधून आल्याने त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन फर्टीमीन व फर्टीमीन प्लस ५ किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध करून दिले आहे. तसेच पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून पशुखाद्याची मागणी नोंद करणे, मागणीची स्थिती, क्रेडीट मेमो, येणे देणे रक्कम, खाते उतारा अशी सविस्तर माहिती दूध संस्थांना समजणार आहे. सर्व संस्थांनी या मोबाईल ॲप चा वापर करावा असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक, बाबासाहेब चौगले, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर,नंदकुमार ढेंगे, अमरसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, आर.के.मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments