किशोर बेडकीहाळ यांचे “भारतीय लोकशाहीची बदलती रुपे” या विषयावर व्याख्यान
कोल्हापूर /प्रतिनिधी : थोर स्वातंत्र्य सेनानी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार देशभक्त पद्मश्री रत्नाप्पाण्णा
कुंभार यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त उद्या शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी जेष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ (सातारा) यांचे “भारतीय लोकशाहीची बदलती रुपे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीने दरवर्षी रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.अशी माहिती पत्रकार परिषदेत सचिव डॉ.विश्वनाथ मगदूम यांनी दिली आहे.
यावर्षी या व्याख्यान मध्ये श्री किशोर बेडकीहाळ हे स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लोकशाहीच्या बद्दलत्या रूपांची मांडणी करणार आहेत. या व्याख्यानाचे अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष सौ. रजनीताई मगदूम असणार आहेत. यावेळी प्रसिद्ध उद्योजक श्री बसवराज आजरी यांचा चांद्रयान मोहिमेतील सहभागाबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कॉमर्स कॉलेजच्या प्रा. पुष्पा देशपांडे सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता व्याख्यान होणार आहे.व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कौन्सिल ऑफ एज्युकेशन चे सचिव डॉ.विश्वनाथ मगदूम आणि डी. आर.के.कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ.व्ही. ए. पाटील यांनी केले आहे.