दूध संकलन वाढीसाठी उत्पादक, दूध संस्था व गोकुळ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे – चेअरमन गोकुळ दूध संघ अरुण डोंगळ
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज मंगळवार दि.२२/०८/२०२३ इ.रोजी आर.के.मंगल कार्यालय, बामणी, ता.कागल येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि संघाने राबविलेल्या सर्व योजनांचा दूध संस्था व दूध उत्पादकांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा. संघ सद्या सरासरी १५ लाख लिटर्स इतके दूध संकलन करीत असून संघाने २० लाख लिटर्स दूध संकलनाचे उध्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला असून तो पुर्ण करणेसाठी दूध उत्पादक,दूध संस्था व गोकुळ यांनी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच कागल तालुक्यातील दुधाची गुणवत्ता हि चांगली असून ती टिकवून ठेवणेसाठी दूध उत्पादकांनी वैरण बँकेच्या माध्यमातून जनावरांना उपयुक्त अशी वैरण तयार केली पाहिजे.भविष्यात शासनामार्फत वैरण बी-बियाणे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
संघाचे संचालक नविद मुश्रीफ म्हणाले की दूध उत्पादकांनी गोकुळच्या सेवा सुविधाचा लाभ घेऊन किफायतशीर दुग्ध व्यवसाय करावा, कागल तालुक्यातील दूध संस्था आणि उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. असे मनोगत व्यक्त केले.यावेळी संपर्क सभेवेळी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे सचिव विश्वास पाटील म्हणाले कि दूध संकलन केंद्रावर खरेदी-विक्री करता दहा ग्रॅम अचूकतेची इलेक्ट्रॉनिक वजन काटे वापरण्यासंबंधीचा निर्णयामुळे प्रत्यक्षातील कामकाज जिकिरीचे होणार आहे. शिवाय सगळी प्रक्रिया वेळखाऊ तसेच शेतकऱ्यांचे नुकसान करणारी आहे व या निर्णयामुळे जिल्हातील सर्व दूध संस्थाचे वजन काटे बदलावे लागणार असुन यामुळे नविन वजन काटे खरेदीमुळे दूध संस्थानावरती आर्थिक बोज्या पडणार आहे यासर्व गोष्टीचा विचार करूण शासनामार्फत मदत मिळावी, किवा इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामधील त्रुटी दूर कराव्यात यासंदर्भात संघटना व गोकुळ दूध संघाने शासनाकडे पाठपुरावा केला त्यानुसार मा.मंत्री महोदयानी यासंदर्भात बैठक घेऊन योग्य तो निर्यण घेण्याचे आश्वासन दिले होते. तसेच गोकुळ दुध संघाने दहा ग्रॅम अचूकतेची इलेक्ट्रॉनिक वजन काटे न वापरण्यासंबंधीचा कोणताही आदेश संघाशी सलग्न प्राथमिक दूध संस्थाना दिलेला नाही.असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक संचालक नविद मुश्रीफ यांनी केले.तसेच माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील,संचालक युवराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तर आभार संचालक अंबरिषसिह घाटगे यांनी मानले.यावेळी संघाच्या दूध वाढ कृती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विस्तार सुपरवायझर यांचा सत्कार करण्यात आले.गोकुळ मार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी तर्फे उतरविण्यात आलेल्या किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले व संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्त, मिल्कोटेस्टर, संगणक, गुणनियंञण व दुध बिल या विभागावर सविस्तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्या प्रश्नांचे निरसण करण्यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील,संचालक बाबासाहेब चौगले,अजित नरके,नविद मुश्रीफ,शशिकांत पाटील –चुयेकर, नंदकुमार ढेंगे,कर्णसिंह गायकवाड,संभाजी पाटील,प्रकाश पाटील,अमरसिंह पाटील,चेतन नरके,राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी तसेच कागल तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन,संचालक,प्रतिनिधी तसेंच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी ,दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.