कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती
कोल्हापूर/प्रतिनिधी – गेल्या अडीच महिन्यापासून रिक्त असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी अखेर के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या २३ ऑगस्टला पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. के. मंजुलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २ जून या दिवशी तत्कालीन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचे पुणे येथे बदली झाल्यापासून कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी कोणचीच नियुक्ती करण्यात आली नव्हती.गेल्या अडीच महिन्यापासून हे पद रिक्त होते आज के.मंजुलक्ष्मी यांची अखेर आयुक्तपदी नियुक्ती ही झालेली आहे.