डॉ .डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक दर्जाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती
कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ .डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या
शैक्षणिक दर्जाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे. दहावीत ९६.४० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला असल्याची माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली.
तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांच्याकडून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या पॉलिटेक्निकला प्रवेश मिळाला, याची यादी वेबसाईटवर जाहीर करण्यात आली. यामध्ये कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमधील सर्व शाखांना गुणवंत विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. गतवर्षीचे तुलनेत यावर्षी पॉलिटेक्निकच्या मेरिटमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ९६.४० टक्के , कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ९४.८० टक्के, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी ९१.२० टक्के ,सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ९१.६० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ तर्फे या पॉलिटेक्निकल व्हेरी गुड मानांकन देऊन गौरवण्यात आले होते.या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता अभिनंदन केले आहे .उपप्राचार्य प्रा.एम.पी.पाटील रजिस्ट्रार प्रा. सचिन जडगे, ऍडमिशन प्रमुख प्रा. बी.जी.शिंदे, प्रा.महेश रेणके,प्रा. नितीन माळी,प्रा.पी.के.शिंदे,प्रा अक्षय करपे यांच्यासह स्टाफ हे प्रवेश प्रक्रियेचे काम पाहत आहेत.