डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील ‘इन्फिनिटी’ उत्साहात
कसबा बावडा/प्रतिनिधी : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्यावतीने ‘इन्फिनिटी २के२३’ ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्याना त्यांचे तांत्रिक कौशल्य, ज्ञान आणि नेटवर्क दाखवण्यासाठीचे संधी यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये देशभरातून सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थी सहभाग झाले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, फाउंड्री क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व इंद्रजीत दळवी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले. या इव्हेंटमध्ये बॉक्स फुटबॉल, रोबो रेस, रोबो वॉर, कॅड मास्टर, टेक्निकल फोटोग्राफी आणि मेकाथॉन (हॅकॅथॉन) अशा विविध तांत्रिक स्पर्धांचा समावेश होता. मेकॅनिकल इंजिनीअरिंग मधील मेकॅथॉन स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. यामध्ये आयोजकांनी सामाजिक व तांत्रिक विषयांवरील काही समस्यांचे निराकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.विविध स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.
स्पर्धेसाठी फोरजी जिम, अमृता इंडस्ट्री, एविसन इंडस्ट्री, केल्सन इंडस्ट्री, हर्षराज इंजिनिअरिंग वर्क्स,मटका बिर्याणी, मॅडम स्टुडिओ यांचे पारीतोषिकासाठी मोठे योगदान लाभले. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मेकॅनिकल डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी परिश्रम. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, विभाग प्रमुख डॉ. सुनील रायकर, दीपक सावंत यांचे सहकार्य लाभले.