गडहिंग्लज मधील हिरण्यकेशी जलविहार मंडळाचा उपक्रम स्तुत्य
आमदार हसन साहेब मुश्रीफ यांच्याकडून गौरवोद्गार
हिरण्यकेशी चषक पोहण्याच्या स्पर्धेत उत्साहात प्रारंभ
गडहिंग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लजमधील हिरण्यकेशी जलविहार मंडळाने आरोग्यासाठी राबवलेले विविध उपक्रम स्तुत्य आहे असे गौरवोद्गार आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी काढले. हिरण्यकेशी जलविहार मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करू असेही ते म्हणाले. येथील हिरण्यकेशी जलविहार मंडळ व आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पोहण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. एकूण सात गटांमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री मुश्रीफ उपस्थित होते. आमदार श्री मुश्रीफ म्हणाले, व्यायामाच्या अनेक प्रकारांपैकी पोहणे हा एक अत्यंत उपयुक्त व्यायाम प्रकार आहे. या व्यायामाला वयाची बंधने नाहीत हिरण्यकेशी जलविहार मंडळाला जलविहार स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू आमचे फाउंडेशन नेहमीच या मंडळाच्या पाठीशी असेल.यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरणआण्णा कदम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणेकर, उदयराव जोशी, वसंतराव यमगेकर, सुनील चौगुले, प्रा अनिल कुराडे, नागेश चौगुले, गुंडेराव पाटील महेश सलवादे अशोकराव मेंडुले, सुरेशआण्णा कोळकी, राहुल शिरकोळे, रश्मीराज देसाई, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, अमर मांगले, जवाहर घुगरी, सहदेव काडपुरे, काडापुरे मामा, बाळासाहेब सुतार, बाळेशा हिरेमठ, आप्पासो बस्ताडे, सुभाष देवगोंडा, लग्माना भमानगोळ, राजन पेडणेकर, भिमगोंडा पाटील, जयसिंग पोवार, बसवानी मगदूम, तमन्ना हत्ती, मारुती खोत, आनंदा देवेकर, हेमंत भोईर, अशोक नारापगोळ, महादेव मांगले, डॉ.नंदकुमार पाटील, सिकंदर तवंदीकर, उत्तम देसाई, किरण कुंभार, लक्ष्मण देवार्डे, विश्वनाथ मगदूम, संभाजी कुरळे, चेतन चिमणे आदी उपस्थित होते.