`स्मॅक` च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, उपाध्यक्षपदी एम. वाय. पाटील यांची फेर निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : स्मॅक भवन शिरोली एमआयडीसी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर [स्मॅक] च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, तर उपाध्यक्षपदी एम. वाय. पाटील यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली.शिरोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व कामगारांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत `स्मॅक` या संस्थेच्या संचालक मंडळाची ४९ वी सभा शुक्रवारी अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष दीपक पाटील होते.यावेळी २०२२-२३ सालाकरिता `स्मॅक`च्या अध्यक्षपदी आर. ए. पी. इंडस्ट्रीजचे दीपक पाटील तर उपाध्यक्षपदी रत्ना उद्योगचे एम. वाय. पाटील यांची फेर निवड करण्यात आली.तर ट्रेजरर पदी चौगले सिमेंट पाईप कं. चे जयदीप चौगले व ऑ. सेक्रेटरी पदी शुभम कास्टिंग्स प्रा. लि., शामसुंदर तोतला, `स्मॅक` आयटीआयच्या चेअरमनपदी आर.एन.डी इंडस्ट्रीज चे राजू पाटील व शिरोली सॅण्ड रेक्लेमेशन प्लांट चेअरमन पदी श्रीराम फाउंड्री ग्रुप चे निरज झंवर यांची सर्वानुमते फेर निवड निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या.या निवडीनंतर नंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.दीपक पाटील यांनी आपल्या कारकिर्दीतील कामकाजाचा केलेला आढावा, `स्मॅक` चे काम आणि सर्व संचालक, स्वीकृत संचालक व निमंत्रित सदस्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी नूतन अध्यक्ष दीपक पाटील यांनी भविष्यातील असोसिएशनच्या कामाविषयी मनोगत व्यक्त केले.
दीपक पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख सर्वांनी केला व त्यांचे अभिनंदन केले.`स्मॅक` ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी उद्योगांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत उद्योग क्षेत्राशी निगडित असलेले अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.यावेळी स्किल ट्रेड प्रमोशन कमिटीचे चेअरमन अमर जाधव, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन सचिन पाटील, संचालक सुरेन्द्र जैन, अतुल पाटील, प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, भरत जाधव, स्वीकृत संचालक रवी डोली उपस्थित होते.आभार एम. वाय. पाटील यांनी मानले.