Friday, September 20, 2024
Home ताज्या 'साथ सोबत' १३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणा

‘साथ सोबत’ १३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणा

‘साथ सोबत’ १३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणा

कोल्हापूर/प्रतिनिधी : टिझरपासून ट्रेलर रिलीज होईपर्यंत कायम चर्चेत राहिल्याने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारा ‘साथ सोबत’ हा मराठी चित्रपट १३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवाद, नयनरम्य लोकेशन्स, वास्तवदर्शी चित्र, मनमोहक कॅमेरावर्क, सहजसुंदर दिग्दर्शन, कसदार अभिनय आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे बनवलेल्या ‘साथ सोबत’ला प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळत आहे. राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या दिग्दर्शक रमेश मोरे यांनी ‘साथ सोबत’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या ‘साथ सोबत’ या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. दिग्दर्शनासोबतच ‘साथ सोबत’चं लेखनही दिग्दर्शक रमेश मोरे यांनीच केलं आहे. वितरणाच्या माध्यमातून पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहेत. कोकणातील वास्तव मांडणारा या चित्रपटात ग्लोबल विषय पहायला मिळणार आहे. त्याला एका सुरेख प्रेमकथेची किनार जोडण्यात आली आहे. गाव-पातळीवरील वास्तव चित्र किती भयाण आहे आणि कोकणासारख्या भागात काय परिस्थिती आहे याचं सत्य दर्शवणारा हा चित्रपट आहे. रमेश मोरे यांनी नेहमीच समाजाभिमुख विषयांवर चित्रपट बनवण्याला प्राधान्य दिलं आहे. ‘साथ सोबत’ही त्याला अपवाद नाही. मोहन जोशींनी साकारलेले वयोवृद्ध डॅाक्टर आणि संग्राम समेळ ने समीरच्या रूपातील तरुण डॅाक्टर बरंच काही शिकवणारे आहेत. त्यांना मृणाल कुलकर्णीनं नवोदित असूनही सुरेख साथ दिली आहे. अनिल गवस यांनी साकारलेला पिता तसेच ९०व्या वर्षी राजदत्त यांना अभिनय करताना पहाणं म्हणजे आजच्या पिढीच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे. सर्वच कलाकारांची अचूक भट्टी जमल्यानं मोरेंचा हा चित्रपटही पुरस्कार सोहळ्यांमधील गणितं बदलणारा ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पत्नी यशश्री मोरे यांच्यासोबत रमेश मोरेंनी लिहिलेली अर्थपूर्ण गाणी कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारी आहेत. संगीतकार महेश नाईक यांनी या गाण्यांना सुरेल संगीत दिलं आहे. कोकणातील चिपळूण-सावर्डे आणि आसपासचा निसर्ग मनाला मोहिनी घालणारा आहे. डिओपी हर्षल कंटक यांच्या सिनेमॅटोग्राफीची आणि अभिषेक म्हसकर यांच्या संकलनाची कमाल यात आहे. चिरेबंदी घरांसोबतच जुनं ते सोनं म्हणत आजही ताठ उभी असणारी मातीची घरंही चित्रपटाचं सौंदर्य खुलवणारी आहेत.
संगीतकार महेश नाईक यांनीच पार्श्वसंगीतही दिलं आहे. संतोष चारी आणि सतिश भावसार यांनी रंगभूषा केली असून, यशश्री मोरे यांनी यांनी वेशभूषा केली आहे. कला दिग्दर्शन प्रकाश कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं असून, मीनल घाग यांनी नृत्य दिग्दर्शन व केशभूषा अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे. कौशिक मारू आणि यशश्री मोरे ‘साथ सोबत’चे कार्यकारी निर्माते आहेत.

Previous article९ जानेवारीला राष्ट्रीय पातळीवर सौदर्य स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : गौरी इव्हेंट्स प्रस्तुत, संजय घोडावत ग्रुप स्पॉन्सर, स्टायलिंग पार्टनर वूमस्ते, क्यूझीन पार्टनर माणिकचंद आटा व सयाजी हॉटेल कोल्हापूर यांच्या सौजन्याने ९ जानेवारी २०२३ ला राष्ट्रीय पातळीवर सौदर्य स्पर्धा हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.अशी महिती गौरी फॅशन क्लबच्या फाऊंडर व डायरेक्ट गौरी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धेमध्ये देशातील नाशिक,औरंगाबाद, धुळे,उस्मानाबाद,लातूर,दिल्ली, हरियाणा,वेस्ट बंगाल,गुजरात,जळगाव,मराठवाडा,पुणे,विदर्भ आदी विविध प्रांतातील विविध स्थरावरील स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला आहे. कोल्हापूर मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर अशी स्पर्धा होत असून कोल्हापूरच्या कलानगरीचा वारसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट, आणि विविध व्यवसायीक पातळीवर पोहचविण्याचा मानस या स्पर्धेतून पुढे येईल अशी माहिती गौरी इव्हेंट्सच्या संचालिका गौरी नाईक यांनी दिली. या पत्रकार परिषदेसाठी संजय घोडावत ग्रुप तर्फे विवेक गिरी तसेच गौरा इव्हेंट्स च्या संचालिका गौरी नाईक व संचालक जयंत पाटील उपस्थित होते.
Next article`स्मॅक` च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, उपाध्यक्षपदी एम. वाय. पाटील यांची फेर निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments