प्रश्न नोटांचा नाही तर सर्वसामान्यांच्या पोटाचा प्रश्न सोडवावा संभाजी ब्रिगेड ने केली जोरदार निदर्शने
कोल्हापूर/प्रतिनिधी : जय जिजाऊ भारत देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे डॉलरच्या तुलनेत रुपया पडत आहेत दोन दिवसापासून अनेक राज्यकर्ते सत्ताधारी भारतीय नोटांवरील फोटोवरून राजकारण करत आहे लोकांच्या प्राथमिक समस्या राहिल्या बाजूला ठेवून सामान्य जनतेला या अशा अनेक गोष्टीत गुंतवून ठेवत आहेत महागाई प्रचंड वाढली आहे पेट्रोल डिझेल गॅसचे दर देखील गगनाला भिडलेले आहेत बेरोजगारीची मोठी समस्या आपल्या देशात आहे
सर्वसामान्यांचे प्रश्न ,कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे लक्ष देणे गरजेचे आहे भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे या स्वरूपाची राजकारण न करता लोकांच्या समस्या सोडवणे गरजेचे आहे शेतकऱ्यांवर आज पावसामुळे खूप मोठी दुखत परिस्थिती उद्भवली आहे सरकारने याकडे देखील लक्ष देऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे सर्वसामान्य जनतेने समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सर्वांनी सत्तेत बसवले असते आहे तरी सत्ताधीशांनी नोटांचे राजकारण न करता लोकांच्या पोटाचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली दसरा चौक येथे जोरदार निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. प्रश्न नाही नोटांचा …प्रश्न आहे पोटांचा…. नोटांचा राजकारण करणाऱ्या या या राज्यकर्त्यांचा करायचं काय …..खाली डोकं वर पाय… देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड अशा घोषणांनी दसरा चौक येथील परिसर दणाणून गेला यावेळी जिल्हा संघटक निलेश सुतार शहराध्यक्ष अभिजीत भोसले जिल्हा कार्याध्यक्ष भगवान कोइंगडे, विकास भिऊंगडे, साई लाखे, दत्ता चौगुले ,विश्वास गायकवाड ,दिनकर पवार ,सचिन गुरव उपस्थित होते