Sunday, July 14, 2024
Home ताज्या गोकुळमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढला -आमदार हसन मुश्रीफ  

गोकुळमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढला -आमदार हसन मुश्रीफ  

गोकुळमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढला -आमदार हसन मुश्रीफ  

वसुबारस कार्यक्रमाद्वारे गोकुळमार्फत संस्कृतीची जपणूक तसेच उत्तम पशुसंवर्धनाचा संदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) ‘दूध उत्पादक शेतकरी हाच आत्मा आहे. त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्यक्रम,हे आमच्या कारभाराचे सूत्र आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून (११ जुलै २०२१) आजपर्यंत सहा वेळा दूध खरेदी दरामध्ये वाढ केली. म्हैस दुधाला प्रति लिटर ८ रुपये तर गाय दुधाला ९ रुपये इतकी ऐतिहासिक वाढ दिली. निवडणुकीच्या कालावधीत आम्ही शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता, त्याची पूर्तता करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे. दुधाला चांगला भाव मिळू लागल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढला.” अशा भावना माजी ग्रामविकासमंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या.
गोवत्स द्वादशी म्हणजेच ‘वसुबारस’ने शुक्रवारी दिवाळी सणास प्रारंभ झाला. यानिमित्त ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात गाय-वासरांचे पूजन करुन, गोडधाड पदार्थांचा नैवेदय दाखविण्यात आला. माजी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन विश्वास पाटील तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित गाय-वासरांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गाय दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित महिला दूध उत्पादकांच्या हस्ते गाय वासराचे पूजन झाले.“आपल्या संस्कृतीची जपणूक तसेच उत्तम पशुसंवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने गोकुळमार्फत वसुबारस कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.”अशा शब्दांत मुश्रीफ यांनी दिवाळीच्या शुभेच्या दिल्या. वातावरणातील बदल, जागतिक तापमान, दुधाची वाढती मागणी आणि वैरणी कमतरता या साऱ्या घटकांचा दूध वाढीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणत आमदार मुश्रीफ यांनी,‘ या स्थितीत गोकुळ दूध संघाने कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. यंदा म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०२ कोटी ८३ लाख रुपये इतकी उच्चांकी अशी रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आली. आम्ही, २० लाख लिटर दूध संकलानाचा संकल्प केला आहे. संचालक मंडळाला विभागवार जबाबदारी दिली असून कर्नाटक व सीमा भागातील सरासरी दीड लाख लिटर दूध उपलब्ध असून संघाच्या संचालकांनी व अधिकाऱ्यांनी दूध संघाकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.’ असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. तसेच दीपावलीच्या दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, “भारतीय संस्कृतीचीही जपणूक व्हावी व यातून दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी गोकुळ नेहमी प्रयत्नशील असतो. भारतीय कृषीसंस्कृती व दुग्धव्यवसायाची सांगड घालण्याचा प्रयत्न आहे. दूध उत्पादन वाढीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संपूर्ण जिल्हात वसुबारस दिवशी दुधाळ जनावरांची पुजा करण्याचे आवाहन परिपत्रकाद्वारे गोकुळ मार्फत केले आहे. त्यास अनुसरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्राथमिक दूध संस्थांचे मार्फत गाय-वासरू पूजनाचा कार्यक्रम हाती घेऊन हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, बाबासाहेब चौगले,अजित नरके, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड,रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील(बापू), विजयसिंह मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

मुश्रीफांकडून चेअरमन व संचालक मंडळाच कौतुक…
“गोकुळच्या निवडणुकीवेळी मी व सतेज पाटील नेहमी सातत्याने एक आश्वासन देत होतो की दूध उत्पादकांना दरवाढ देउ. मी कायम भाषणामध्ये म्हणायचो आम्ही आमच्या दूध उत्पादक माता –भगिनींना सोन्याने मढवू याचा अर्थ आम्ही त्यांच्या कष्टाचा मोबदला जास्तीत–जास्त देण्याचा प्रयत्न करू. सत्तेत आल्यापासून सहा वेळा दूध खरेदी दरात वाढ केली. यासाठी चेअरमन विश्वास पाटील आणि सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभारी आहे. संचालक मंडळाच्या बचतीच्या कारभारामुळे आम्ही दिलेल्या शब्द पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळाली. ”अशा शब्दांत मुश्रीफ यांनी संचालक मंडळांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments