Tuesday, December 3, 2024
Home ताज्या शिवसेनेच्यावतीने उद्या १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिड लाखांची "भगवी" दहीहंडी

शिवसेनेच्यावतीने उद्या १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिड लाखांची “भगवी” दहीहंडी

शिवसेनेच्यावतीने उद्या १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिड लाखांची “भगवी” दहीहंडी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनासंकटाचे सावट असल्याने गेले २ वर्षे सर्वच उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा मात्र मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना – भाजप हिंदुत्ववादी सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने राज्यात दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. हिंदुत्वाचा हा आपला आवडता उत्सव राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शिवसेनेच्या “भगवी दहीहंडी” चे आयोजन करून लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.                                                                       गेली १५ वर्षे अखंडितपणे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ यांच्यावतीने “भगवी” दहीहंडीचे आयोजन करण्यात येते आहे. यंदा ही शिवसेनेची “भगवी” दहीहंडी भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. याकरिता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीकरिता प्रथम क्रमांकाचे रु.१ लाख ५० हजार व मानपत्र बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासह सलामीसाठी, थरांसाठी रोख रक्कमांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी खास “खेळ पैठणी” चा स्पॉट गेमसह आकर्षक बक्षिसेही उपस्थित महिलांना देण्यात येणार आहे. यासह नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. सर्वात वर असणाऱ्या गोविंदाचा सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. दहीहंडी कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी ढोल ताशा पथक असेल. दहीहंडीच्या सुरवातीस श्री शाहू गर्जना ढोल वाद्य पथकाकडून सलामी दिली जाणार आहे. शिवसेनेच्या “भगवी” दहीहंडीचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते दि.१९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता “छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर” येथे होणार आहे.
शिवसेनेच्या या भगवी दहीहंडीचे संयोजन शाखाप्रमुख आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कपिल केसरकर, अध्यक्ष राहुल अपराध, अमित जाधव, रुपेश डोईफोडे, अभिलाष चव्हाण, सागर शिंदे, उदय शिंदे, जयाजी घोरपडे, केदार भुर्के, शाहरुख बागवान, पाप्या बागवान, निहाल मुजावर आदी सर्व शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments