Thursday, December 19, 2024
Home ताज्या १५ ऑगस्टपासून विद्यापीठाची नवी ध्वनी-मालिका "अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना सुरू होणार

१५ ऑगस्टपासून विद्यापीठाची नवी ध्वनी-मालिका “अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना सुरू होणार

१५ ऑगस्टपासून विद्यापीठाची नवी ध्वनी-मालिका “अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना सुरू होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिव-वार्ता’ या दृकश्राव्य युट्यूब वाहिनीपाठोपाठ शिवाजी विद्यापीठाचा जनसंपर्क कक्ष आता ‘शिव-वाणी’ ही युट्यूब ध्वनी- वाहिनी सादर करीत आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते या वाहिनीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या ध्वनी-वाहिनीद्वारे आजादी का अमृतमहोत्सव अर्थात भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना!’ ही एक विशेष ध्वनी- मालिका सादर करण्यात येणार आहे. अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना या ध्वनी-मालिकेतील भाग-१ – स्वातंत्र्यसैनिक दत्ताजीराव जाधव यांचे कार्य यावर असणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण या मालिकेमधून करण्यात येणार आहे. रोज सकाळी ९ वाजता स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे व योगदानाचे स्मरण करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि जनसंपर्क कक्ष यांची ही संयुक्त प्रस्तुती आहे. या मालिकेची सुरवात शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील स्वातंत्र्यसैनिक कै. दत्ताजीराव जाधव यांच्या कार्याच्या माहितीने दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे.सदर भागाची लिंक पुढे देण्यात येणार आहे. तो आपण ऐकावाच, पण त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाची ‘शिव-वार्ता’ युट्यूब वाहिनी आणि नवी ‘शिव-वाणी’ युट्यूब ध्वनी-वाहिनीही सबस्क्राईबही करा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू   तळसंदे/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये...

श्री स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ, नेहरु नगरतर्फे दत्त जयंती निम्मित पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ, नेहरु नगरतर्फे दत्त जयंती निम्मित पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम श्री दत्ताची श्री गुरुचरित्र रुपात बांधण्यात आली होती पूजा   कोल्हापूर/प्रतिनिधी...

Recent Comments