कोल्हापूर मधील राधानगरी धरण ६ नंबर दरवाजा उघडला तर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली
कोल्हापूर/प्रतिनिधी : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर मधील राधानगरी धरणातील ६ नंबरच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी ही ४० फुटावर गेली असून पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे.इशारा पातळी ही ३९ फूट इतकी आहे. तर धोका पातळी ४३ फुट आहे.आज १० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ही चाळीस फुटापर्यंत पोहोचली आहे.तर एकुण पाण्याखालील बंधारे ७२ आहेत.
आज सकाळी राधानगरी धरणाचे ५.३० वाजता स्वयंचलित द्वार क्रं ६ उघडले आहे यातून विसर्ग १४२८ व पाॅवर हाऊसमधूनचा १६०० असा एकूण ३०२८ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.राधानगरी धरणास एकूण ७ दरवाजे आहेत.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.