शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करू
मुख्यमंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी शिवसेनेची क्रांती रॅली – श्री.राजेश क्षीरसागर
एकदिवसीय सदस्य नोंदणीत शिवसेनेची ११ हजार सदस्य नोंदणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे आणि समाजहिताचे काम मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना- भाजप युती शासनाकडून सुरु असून, शिवसेना – भाजप युतीचे स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने केले आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना राज्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा वाढता पाठींबा पहावयास मिळत असून, कोल्हापूर जिल्हा व शहरात केलेल्या एकदिवसीय सदस्य नोंदणीत ११ हजार शिवसैनिकांनी सत्यप्रतिज्ञापत्र संकलित करून मा.मुख्यमंत्री महोदयांना जाहीर पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करून शिवसेनेची ताकद वाढवू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. यासह दि.९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त क्रांती ज्योती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून संकलित केलेली ११,००० सत्यप्रतिज्ञापत्रे आज मा.मुख्यमंत्री महोदयांकडे पाठविण्यात आली. यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोक कधीही पक्षाशी प्रामाणिक वागले नाहीत. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षावरची निष्ठा दुसऱ्याच्या खुंटीला टांगत धनुष्यबाण आणि शिवसेना उमेदवाराला विरोध केला. त्यांना आता निष्ठावंत असल्याचा भास होत आहे. शिवसेना वाढविण्याचे आणि संघटन बांधणीचे काम प्रामाणिकपणे कोणी केली हे जनता आणि शिवसैनिकांना माहित आहे. त्यामुळे खरे निष्ठावंत आपल्या बाजूने असून, गद्दारी केलेले दुसऱ्या बाजूने टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम करत आहेत. अशा गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांती दिनी शिवसेनेच्यावतीने भव्य दुचाकी क्रांती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत १० जेष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. यासह शहराततून ही रॅली मार्गक्रमण करणार असून, यातून शिवसेनेची खरी ताकद दाखवून देण्यासाठी जिल्ह्यासह शहरातील शिवसैनिकांनी सज्ज रहावे, असे आवाहन ही त्यांनी केले.ते पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेस गतवैभव मिळवून देण्याचे व्रत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली समस्त शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी घेतले असून, क्रांती रॅलीतून प्रज्वलित केलेली ज्योत तेवत ठेवत संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. पुढील काळात या कार्यकारणीच्या माध्यमातून शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीस प्राधान्य देवून शिवसैनिकांना न्याय देण्यात येणार आहे. एकदिवसीय सदस्य नोंदणीत ११ हजार शिवसैनिकांनी मुख्यमंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केला असून, पुढील काळात गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या माध्यमातून शिवसेना आणखी मजबूत करण्यास शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी संकलित केलेली सत्यप्रतिज्ञापत्रे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केली.यावेळी सुजित चव्हाण, जयवंत हारुगले, शिवाजी जाधव, रणजीत जाधव, संजय संकपाळ, डॉ.संजय पाटील, ना.नगरसेवक अजित मोरे, किशोर घाटगे, महिला आघाडीच्या सौ.मंगलताई साळोखे, श्रीमती पूजा भोर, सौ.पूजा कामते, सौ.गौरी माळतकर, सौ.मंगलताई कुलकर्णी, सौ.सुनिता भोपळे, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, अश्विन शेळके, ओंकार परमणे, अमर क्षीरसागर, निलेश हंकारे, रियाज बागवान, कपिल सरनाईक, योगेश चौगले, प्रसाद चव्हाण, अविनाश कामते, विश्वदीप साळोखे, दादू शिंदे, विश्वजित चव्हाण, सौरभ कुलकर्णी, शुभम शिंदे, राज अर्जुनीकर, तन्वीर बेपारी, राजू ढाले, आकाश सांगावकर, संतोष रेवणकर, कपिल केसरकर, किरण पाटील, सुरेश माने, यशंवत माने यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.